मुकुल माधव फाउंडेशन, या फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या सीएसआर विभागातर्फे बालकामगारीवर आधारित विचारांना चालना देणारी, पुरस्कारविजेती शॉर्ट फिल्म ‘बैतुल्लाह’ सादर

72

पुणे, १४ नोव्हेंबर २०२२ – आपल्यापैकी बहुतेक जण बालमजुरीकडे दुर्लक्ष करतात. बैतुल्लाह ही शॉर्ट फिल्म तुमचे नक्कीच या समस्येकडे लक्ष वेधून घेईल. शहरात चहाच्या ठेल्यावर काम करणाऱ्या बैतुल्लाह नावाच्या एका लहान मुलावर चित्रित करण्यात आलेल्या या फिल्ममधून प्रेक्षकांसाठी प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे, तो म्हणजे, ‘तुमच्यासारखं बनण्यासाठी या मुलाला काय करावं लागेल?’. फिल्ममध्ये या प्रश्नाचं उत्तर अवघड शांतता इतकंच असलं, तरी त्यातून प्रेक्षक आणि सुदैवी नागरिकांमध्ये त्यावर चर्चा घडून येईल अशी आशा आहे.

तुम्ही हा लेख वाचू शकताय, हीच गोष्ट तुम्ही सुदैवी असल्याचं दाखवून देणारी आहे. जगभरात विशेषतः भारतात लाखो मुलांचे  शोषण होते आणि बालपणीचा आनंद व हक्क त्यांच्याकडून हिरावून घेतला जातो. त्यांना वर्गाबाहेर ठेवलं जातं आणि कुटुंबासाठी रोजंदारीवर ठेवलं जातं. गरीबीमुळे, जागरूकतेच्या अभावामुळे किंवा केवळ निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळे बहुतेक मुलं चपला, दागिने किंवा फटाक्यांच्या दुकाना घाम गाळत असतात आणि जगापासून लपवली जातात. मात्र, काही अगदी आपल्या समोर असतात. तुमच्या घराजवळच्या चहाच्या ठेल्यावरच्या किंवा खाद्यपदार्थांच्या दुकानात एखादा ‘छोटू’ सहज आढळून येतो.

जितेंद्र राय लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित (मेसर्स मॅथेनो फिल्म्स) या फिल्ममध्ये प्रमुख भूमिका ओम कनोजियानं केली असून त्याच्यासोबत इश्तियाक खान आणि विपिन शर्मा आहेत. या फिल्मला ८५+ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन आणि निवड झाली असून तिने २६ पुरस्कार जिंकले आहेत.

या फिल्मविषयी जितेंद्र राय म्हणाले, ‘दिग्दर्शक या नात्याने आजूबाजूच्या जगाकडे मी डोळसपणे पाहातो. आसपास दिसणाऱ्या बालमजुरीकडे मी दुर्लक्ष करू शकलो नाही. त्याचबरोबर आपण काही करू शकत नसल्याची भावनाही माझ्या मनात निर्माण झाली. दिग्दर्शक या नात्याने ही असहायता, सुस्थितीत असलेल्या इतरांकडे पाहाताना या मुलांच्या डोळ्यात दिसणारी मदतीची आस टिपण्याचे मी ठरवले.’

राय पुढे म्हणाले, ‘मुकुल माधव फाउंडेशनसारखी संस्था या क्षेत्रात करत असलेलं काम पाहून या असहायतेचं आशेत रुपांतर झालं. या फिल्मसाठी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे.’

मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया म्हणाल्या, ‘वंचित व दुर्लक्षित मुलांसह काम करतानाच्या प्रवासात आमच्यापुढे उभा राहिलेला प्रश्न ही फिल्म मांडते. आपण आपल्या आयुष्यात ज्या गोष्टींचा सहजपणे आनंद आहे, तो या मुलांना कधी मिळणार? आम्ही त्या दिशेने हळूहळू प्रयत्न करत आहोत.’

१९९९ मध्ये स्थापन झालेले मुकुल माधव फाउंडेशन भारतातील विविध समाजांत काम करत वंचितांना आशा व सन्मान देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुलांसाठी विशेषतः शोषण, छळ आणि तस्करीमुळे पीडीत मुलांसाठी संस्था करत असलेले काम तळागाळापर्यंत पोहोचत आहे. शिक्षण, पोषण आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रात काम करत मुलांना मदत केली जात आहे. मुलांसाठी हेल्पलाइन, कौन्सेलर्स, कायदेशीर मदत मिळवून दिली जात आहे. शोषित मुलांची सुटका व पुनर्वसन करणे आणि त्यांना परत मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्याचे कामही केले जात आहे. त्याहीपेक्षा समाज अधिकाधिक बळकट केला जात आहे. पालक व तरुणांना आरोग्यसेवा, स्वच्छता, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या जात आहेत. प्रत्येकाला मान दिला जात आहे. मुले सुरक्षित राहाण्यासाठी आधी समाज आर्थिक व भावनिक पातळीवर सुरक्षित असायला हवा या तत्वासह काम केले जात आहे.