मुंबई, जानेवारी २, २०२३: महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड च्या फार्म ईक्विपमेंट विभागाने आज त्यांच्या डिसेंबर २०२२ च्या विक्रीचे आकडे जाहीर केले.
डिसेंबर २०२२ मध्ये देशांतर्गत विक्री २१,६४० यूनिटस् झाली, डिसेंबर २०१२ मध्ये १६,६८७ यूनिटस् होती.
डिसेंबर २०२२ मध्ये एकूण ट्रॅक्टर विक्री (देशांतर्गत आणि निर्यात मिळून) २३,२४३ यूनिटस् झाली, जी मागील वर्षी याच काळात म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये १८,२६९ यूनिटस् होती. डिसेंबर २०२२ मध्ये १६०३ ट्रॅक्टरस् निर्यात करण्यात आले.
विभागाच्या कामगिरीबद्दल बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड च्या फार्म ईक्विपमेंट विभागाचे अध्यक्ष श्री. हेमंत सिक्का म्हणाले, “आम्ही डिसेंबर २०२२ मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत २१,६४० ट्रॅक्टरस् ची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०% नी वाढली आहे. रब्बी पिकांची पेरणी यंदा चांगली झाली आहे.
ती गेल्या वर्षीच्या एकरी क्षेत्रापेक्षा जास्त आहे आणि एवढेच नव्हे तर गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा ही जास्त आहे. गहू आणि तेलबियांचे यंदा भरपूर पीक अपेक्षित आहे. मजबूत रब्बी पेरणी, चांगली खरीप खरेदी आणि गव्हाची संभाव्य निर्यात या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रात उत्साह राहिल्याने शेती अवजारांना आणि ट्रॅक्टरस् ना जोरदार मागणी निर्माण झाली. निर्यात बाजारपेठेत सुद्धा आम्ही १,६०३ ट्रॅक्टरस् विकले, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १% नी वाढ झाली आहे.”