महिंद्रा रिसर्च व्हॅली ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानात आघाडीवर, गेल्या ६ तिमाहींमध्ये २१० पेटंट्स नोंदवत आघाडीच्या स्थानावर शिक्कामोर्तब

76
Mahindra Research Valley at the forefront of Automotive Technology; seals its leadership with record 210 patents in last 6 quarters

मुंबई : महिंद्रा रिसर्च व्हॅली (एमआरव्ही) या २०१२ मध्ये स्थापन करण्यात आलेले महिंद्रा समूहाचे आर अँड डी आणि इनोव्हेशन सेंटर ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाच्या बाबतीत कायमच आघाडीवर राहिले असून इंडस्ट्रीत नवे मापदंड तयार करणारी, जागतिक स्तरावर नावाजली गेलेली विविध उत्पादने सेंटरच्या नावावर आहेत. एमआरव्हीला २१० पेटंट्स प्रदान करण्यात आली असून गेल्या ६ तिमाहींमध्ये जगभरात कोणत्याही भारतीय ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर (ओईएम) कंपनीला मंजूर करण्यात आलेली ही सर्वाधिक पेटंट्स आहेत. ही कंपनीने केलेले वैविध्यपूर्ण आणि अत्याधुनिक काम तसेच गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाला मिळालेली पावती आहे.

एमआरव्हीकडे तब्बल १९७९ पेटंट अर्ज असून त्यापैकी १४९ पेटंट्स केवळ एका ईव्ही क्षेत्राशी संबंधित आहेत. या पेटंट्सनी आतापर्यंत नवे तंत्रज्ञान खुले करून देत, अत्याधुनिक ग्राहक अनुभव देत तसेच वेगवेगळ्या प्रदेशात ते लागू करत वाहन आणि ट्रॅक्टर क्षेत्रात नवी समीकरणे प्रस्थापित केली आहेत.

एम अँड एम लि. च्या ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान आणि उत्पादन विकास विभागाचे अध्यक्ष आर. वेलुस्वामी म्हणाले, ‘महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये आम्ही खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाची आणि ग्राहकांसाठी सर्वोत्तम असलेली उत्पादने विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. यशस्वी पेटंट अर्जांमुळे नवे मापदंड तयार करणे तसेच अचूकता व गुणत्तेप्रती असलेला आमचा ध्यास दर्शवणारे प्रयत्न करणे शक्य होते. आमचे इंजिनियर्स आमच्या ‘राइज’ या तत्वज्ञानाचे पालन करत सातत्याने आपली कौशल्ये अद्यायवत करून नाविन्यनिर्मिती व पर्यायाने नव्या उत्पादनांसाठी नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी योगदान देतात.’

Mahindra Research Valley at the forefront of Automotive Technology;
seals its leadership with record 210 patents in last 6 quarters

महिंद्रा विविध उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा वापर करत असून त्यात ईव्हीज, ऑटोनॉमस वाहने, स्मार्ट कृषी उपकरणे, प्रीसिजन फार्मिंग यांचा समावेश आहे. त्याशिवाय कंपनी डेटा सायन्स, एआय, आयओटी, मेकाट्रॉनिक्स अशा क्षेत्रांचा विकास करण्यासाठी उत्पादन डिझाइन उंचावत आहे. त्यातून नव्या उत्पादन विकासासाठी हातभार लावण्याचे उद्दिष्ट आहे.

महिंद्रा रिसर्च व्हॅलीने महिंद्राचे वाहन आणि कृषी क्षेत्रासाठीचे अमेरिका (डेट्रॉइट आणि व्हर्जिनिया), इंग्लंड, इटली, फिनलंड, तुर्की आणि जपान येथे पसरलेले ग्लोबल न्यूरल नेटवर्क आहे. एकूण ४००० इंजिनियर्ससह एमआरव्ही डिझाइन इकोसिस्टीमचा भाग असून त्यात मुंबईतील महिंद्रा डिझाइन स्टुडिओ, इटलीतील पिनिनफारिना, महिंद्रा नॉर्थ अमेरिकन टेक्नीकल सेंटर (एमएनएटीसी) आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेले महिंद्रा अडव्हान्स्ड डिझाइन युरोप (एमएडीई) यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

फोक्सवॅगन व्हर्च्युसने जीएनसीएपीच्या इतिहासात मिळवला सर्वोत्तम स्कोअर, ५ स्टार सेफ्टी रेटिंग प्राप्त