मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या फार्म इक्विपमेंट सेक्टर (एफईएस) या महिंद्रा समूहाच्या विभागाने मार्च २०२३ मधील ट्रॅक्टर्स विक्रीची आकडेवारी आज जाहीर केली.
देशांतर्गत विक्री मार्च २०२२ मधील २८,११२ युनिट्सवरून मार्च २०२३ मध्ये ३३,६२२ वर गेली आहे.
ट्रॅक्टरची एकूण विक्री (देशांतर्गत + निर्यात) मार्च २०२३ मध्ये ३५,०१४ युनिट्सवर गेली असून गेल्या वर्षी याच कालावधीत ही विक्री २९,७६३ युनिट्स होती. या महिन्यातील निर्यात १३९२ युनिट्स होती.
कंपनीने आर्थिक वर्ष २३ मध्ये सर्वाधिक वार्षिक विक्री ४,०७,५४५ युनिट्स (देशांतर्गत + निर्यात) केली.
या कामगिरीविषयी महिंद्रा अँड महिंद्रा लि. कंपनीच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले, ‘मार्च २०२३ मध्ये आम्ही देशांतर्गत बाजारपेठेत ३३,६२२ ट्रॅक्टर्सची विक्री केली व गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात यंदा २० टक्क्यांची वाढ झाली आहे. पिकात झालेली वाढ, बाजारपेठेतील स्थिर किंमती, प्रमुख पिकांच्या एमएसपीसाठी सरकारचा पाठिंबा तसेच मनरेगासारख्या योजनांमुळे उत्पन्नात झालेली वाढ अशा घटकांमुळे ग्रामीण भागातील आर्थिक सुरक्षितता वाढली आणि ट्रॅक्टरच्या मागणीला चालना मिळाली. निर्यात बाजारपेठेत आम्ही १३९२ ट्रॅक्टर्सची विक्री केली.’