महिंद्रा ने पीथमपूर येथे संपूर्ण कृषी यंत्रांना समर्पित कारखाना सुरू केला

80

पीथमपूर, नोव्हेंबर १७, २०२२: महिंद्र अँड महिंद्रा फार्म ईक्विपमेंट सेक्टर (एफ इ एस), महिंद्रा ग्रुप चा एक भाग, यांनी आज मध्य प्रदेश मधील पीथमपूर येथे अधिकृतपणे त्यांच्या पहिल्या पूर्णपणे शेती यंत्रांसाठी समर्पित (ट्रॅक्टरस् च्या शिवाय) अशा कारखान्याचे उद्घाटन केले.

नवीन कारखान्याचे उद्घाटन भारत सरकारचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री माननीय श्री. नरेंद्र सिंह तोमर यांनी केले. यावेळी राज्याचे प्रमुख अधिकारी, मान्यवर, प्रमुख नेतेमंडळी आणि महिंद्रा अँड महिंद्रा चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

· ‘मेड इन् इंडिया’ कृषी यंत्र उत्पादनाच्या माध्यमातून पुढील ५ वर्षात आपला शेती यंत्रांचा व्यवसाय (ट्रॅक्टरच्या शिवाय) दहा पटीने वाढविण्याच्या महिन्द्राच्या धाडसी योजनेतील हा एक भाग आहे.

· हा नवीन कारखाना शेती यंत्रांचे मध्यप्रदेश मधील सर्वात मोठे केंद्र असेल

· माननीय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उद्घाटनाच्या वेळी मुख्य भाषण केले.

· यावेळी राज्याचे प्रमुख अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

महिंद्राचा हा नवीन शेती यंत्रांचा कारखाना पीथमपूर या औद्योगिक शहरात आहे जेथून विविध पुरवठादारांपर्यंत पोहोचणे सहज शक्य असल्यामुळे येथून कंपनीला टिकाऊ, उच्च गुणवत्तेचे, किफायदशीर आणि ‘मेड इन् इंडिया फॉर इन् इंडिया’ मंत्र खरे करणारी शेती यंत्रांचे उत्पादन करणे शक्य होणार आहे आणि येथून त्यांची महिंद्रा आणि स्वराज दोन्ही ब्रॅंडना विक्री केली जाईल. या कारखान्यात आशिया, यूरोप, आफ्रिका आणि अमेरिकेतील जगातील बाजारपेठेमध्ये निर्यात करण्यासाठी सुद्धा उत्पादन केले जाईल.

फिनलंड, जपान आणि तुर्कस्तान मधील महिन्द्राच्या ग्लोबल टेक्नॉलॉजी सेंटर ऑफ एक्सीलन्स येथे डिझाईन केलेल्या नवीन उत्पादनांच्या निर्मितीसाठी हा नवीन कारखाना आपल्या सुनियोजित रूपरेषा आणि आराखड्यासह सज्ज आहे. २३ एकर क्षेत्रावर उभारलेल्या या कारखान्याची क्षमता दरवर्षी १२०० कम्बाइन हारवेस्टर आणि ३३०० राइस ट्रान्सप्लॅनटर

उत्पादित करण्याची आहे. पीथमपूर कारखाना आणि त्याचे समर्पित पुरवठादार केंद्र दोन्ही च्या माध्यमातून अंदाजे ११०० जणांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे.

या नवीन शेती यंत्रांच्या कारखान्याच्या उद्घाटनाच्या दरम्यान बोलताना भारत सरकारचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री माननीय श्री. नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, “मध्य प्रदेश मध्ये शेती यंत्रांसाठी महिंद्रा समूहाने उभारलेल्या एका उत्तम सुविधेचे उद्घाटन करताना मला अत्यंत आनंद होत आहे. राज्यामध्ये सर्वात उल्लेखनीय गुंतवणुकीपैकी महिंद्रा ग्रुपच्या गुंतवणुक आहेत; ज्या सामान्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने रोजगार पुरवीत आहेत. आज या पीथमपूर मधील ‘मेड इन् इंडिया’ शेती यंत्रांच्या कारखान्याच्या रूपाने महिंद्रा ग्रुप त्यांची गुंतवणूक अजून वाढवीत आहे. हा केवळ महिंद्रा ग्रुप साठी नाही तर आपल्या शेतकर्‍यांसाठी आणि संपूर्ण देशासाठी एक मैलाचा दगड आहे.” ते पुढे म्हणाले की, “कृषी उत्पादनातील वाढ आणि जास्त अन्न सुरक्षितता यासाठी जगात शेतीमधील यांत्रिकीकरण हा महत्वाचा घटक ठरला आहे. अनेक अभ्यासांनी आणि सर्वेक्षणांनी असे दाखवून दिले आहे की, शेती व्यवसायातील यांत्रिकीकरण आणि वाढीव उत्पन्न यांचा थेट संबंध आहे. २०३० पर्यंत भारतातील शेती व्यवसायातील यांत्रिकीकरण दुप्पट करण्याच्या भारत सरकारच्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी आणि भारतीय शेतीतील यांत्रिकीकरणाला सहाय्य करण्यासाठी शासनाने विविध योजना आणि धोरणे आणली आहेत. कृषी यांत्रिकीकरणामध्ये आत्मनिर्भरता आणणे हा त्यातील एक भाग आहे.”

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म ईक्विपमेंट सेक्टर चे अध्यक्ष श्री. हेमंत सिक्का म्हणाले की, “गेल्या अनेक दशकांपासून महिंद्रा भारतातील ट्रॅक्टर क्षेत्रात अग्रगण्य आहे आणि आता भारतातील शेतीच्या यांत्रिकीकरणाच्या क्षेत्रात ही अग्रगण्य होण्याचे त्याने ठरविले आहे. आम्ही आमचा शेती यंत्राचा व्यवसाय येत्या ५ वर्षात १० पटीने वाढविण्याचे ठरवले आहे आणि या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी हा पीथमपूर मधील नवीन शेती यंत्राचा कारखाना मुख्य स्तंभ होईल.”

महिंद्राचे शेती यांत्रिकीकरणतील भूमिका:

५० हून अधिक देशांमध्ये अस्तित्व असलेल्या महिंद्राची भारतातील शेतजमि‍नींमध्ये यांत्रिकीकरण करण्यात महत्वाची भूमिका आहे. भारतातील शेतकर्यांना उत्तम तंत्रज्ञानाने समृद्ध करण्याचे आणि त्यांना जगातील बाजारपेठेत पुढे यायला सक्षम करण्याचे महिंद्राचे ध्येय आहे.

ट्रॅक्टर उत्पादतील जगातील सर्वात मोठे उत्पादक आणि त्यांचे ‘शेतीत बदल करा, जीवन समृद्ध करा’ हे उद्दिष्टय याने प्रोत्साहन घेऊन महिंद्रा चे फार्म ईक्विपमेंट सेक्टर शेती क्षेत्रातील बदलत्या गरजा पुरविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून तीन जागतिक टेकनोलॉजी सेंटरस् ऑफ एक्सीलन्स च्या माध्यमातून आणि जागतिक बाजारपेठेच्या अनुभवांमधून महिंद्रा सर्व प्रकारची आणि सर्व श्रेणींची शेती यंत्रे आणि सोल्यूशन्सच्या (ट्रॅक्टरच्या शिवाय) उत्पादना मार्फत निरंतर प्रयत्न करीत राहील. या केंद्रांच्या मार्फत महिंद्रा जगभरात मोठ्या भूधारणेमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान भारतातील लहान भूधारक शेतकऱ्यांसाठी कसे किफायतशीर आणि उपयोगी होऊ शकतील याचा अभ्यास करून येथे उत्पादित करणार आहे.

ग्लोबल सेंटरस् ऑफ एक्सीलन्स (सी ओ इ )

जपान – सी ओ इ लाइट वेट ट्रॅक्टर आणि राइस मशीनरी वॅल्यू चैन साठी
फिनलंड – सी ओ इ हार्वेस्टटर आणि फॉरेस्ट मशीनरी साठी
तुर्कस्तान – सी ओ इ फार्म इम्पलिमेन्ट साठी