रोमांचकारक, थरार यांच्या शोधात असलेल्यांसाठी महिंद्राने सादर केली ९.९९ लाख रुपयांपासून सुरू होणारी थारची नवीन श्रेणी

97

मुंबई, ०९ जानेवारी २०२३ : भारतातील एसयूव्ही विभागाचे प्रणेते महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज थारची सर्वात नवीन श्रेणी सादर केली. या नव्या श्रेणीमध्ये रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) प्रकार दोन इंजिन पर्यायांमध्ये आणि फोर व्हील ड्राइव्ह (4WD) प्रकार वर्धित क्षमतांमध्ये समाविष्ट आहे. RWD श्रेणीचे डिझेल प्रकार मॅन्युअल ट्रान्समिशनसह ११७ बीएचपी आणि ३००  Nm टॉर्क (८७.२ kW@३५०० rpm) निर्माण करणारे सर्व-नवीन D११७ CRDe इंजिनद्वारे समर्थित आहेत. RWD श्रेणीच्या गॅसोलीन प्रकाराला शक्ती देणारे mStallion १५० TGDi इंजिन स्वयंचलित ट्रांसमिशनसह १५० बीएचपी आणि ३२० Nm टॉर्क (११२ kW@५००० rpm) निर्माण करते.

  • आता रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) तसेच फोर व्हील ड्राइव्ह (4WD) कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध
  • नवीन रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) श्रेणीसह थार आता 9.99 च्या नवीन प्रारंभिक किंमतीसह व्यापक प्रमाणावरील ग्राहकांसाठी उपलब्ध
  • RWD प्रकारांच्या स्वागतमूल्य किमती पहिल्या 10,000 बुकिंगवर लागू
  • फोर व्हील ड्राइव्ह श्रेणी आता प्रगत इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंशियलसह सुसज्ज
  • ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाईट अशा दोन नवीन रोमांचक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध
  • RWD प्रकारांची डिलिव्हरी १४ जानेवारी २०२३ पासून होणार सुरू

नवीन थार श्रेणी ₹ 9.99 लाख रुपयांच्या आकर्षक किंमतीपासून सुरू होत असून एसयूव्ही  खरेदीदारांच्या व्यापक ग्राहक वर्गासाठी आणि ज्यांना नेहमीच ही प्रतिष्ठित एसयूव्हीची मालकी मिळविण्याची आकांक्षा आहे त्यांच्यासाठी उपलब्ध होत आहे. ‘एक्सप्लोर द इम्पॉसिबल’ या वचनाचे उदाहरण देत थार एक अत्यंत अनोखा ड्रायव्हिंग आणि स्वतःची मालकी असलेल्या गाडीचा अनुभव देते.

4WD प्रकार आता प्रगत इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंशियलसह येतो जो अधिक आक्रमक आहे. बॉशच्या सहकार्याने विकसित केलेले असून ऑफ-रोड उत्साही लोकांना कमी ट्रॅक्शन  परिस्थिती अधिक सहजतेने हाताळण्यास अनुमती देईल. जे अजूनही मेकॅनिकल लॉकिंग डिफरेंशियल (एमएलडी) पसंत करतात त्यांच्यासाठी हे LX  डिझेल 4WD प्रकारांवर पर्याय म्हणून उपलब्ध असेल. 4WD पॉवरट्रेन लाइन-अप अपरिवर्तित आहे. हे 2.0L mStallion 150 TGDi पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असून १५० बीएचपी पॉवर आणि ३२० Nm टॉर्क निर्माण करते आणि 2.2L mHawk १३० डिझेल इंजिन १३० बीएचपी पॉवर आणि ३२० Nm टॉर्क निर्माण करते. ही इंजिने ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह सादर केली जातात.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नाक्रा म्हणाले, “महिंद्रा थार ही केवळ एक सक्षम एसयूव्ही आहे असे नाही तर ती एक भावना आहे. २०२० पासून कोऱ्या करकरीत नवीन थारने एसयूव्ही प्रेमींचे लक्ष वेधून घेतले असून दररोज ८०,००० हून अधिक चाहते अशक्य ते साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमची ऑफर आणखी चांगली करण्यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांचे म्हणणे ऐकले आणि महत्त्वाच्या सुधारणांसह थारची नवीन श्रेणी तयार केली. नवीन RWD प्रकार सादर करून ज्यांना ‘थार लाईफ’ अनुभवायचे होते त्यांच्यासाठी आम्ही ते अधिक सुलभ केले आहे, तर 4WD प्रकारातील आमची जोड खऱ्या ऑफ-रोडर्सना खूश करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. आम्हाला खात्री आहे की थारची नवीन श्रेणी अशक्य गोष्टींचा शोध घेईल आणि थारच्या जीवनशैलीत नवीन उत्साही लोकांची भर घालेल.”

नवीन थार श्रेणी वैयक्तिकरण भागाला पुढील स्तरावर घेऊन जाते. ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाईट असे दोन रोमांचक नवीन रंग पर्याय आता ग्राहकांना निवडण्यासाठी उपलब्ध आहेत. बाह्य आणि अंतर्गत स्टाइलिंग पर्याय समाविष्ट असलेले नवीन अॅक्सेसरी पॅक चार वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये सादर केले आहेत. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन, अॅक्सेसरीज म्हणून फ्रंट आणि रियर आर्मरेस्ट्स सादर केल्या जात आहेत. आर्मरेस्ट अंगभूत स्टोरेजसह येतात. तसेच, मागील आर्मरेस्ट अधिक आराम आणि सोयीसाठी कप-होल्डर आणि यूएसबी  चार्जिंग पोर्टसह सुसज्ज असतील. RWD श्रेणी फक्त हार्ड टॉप पर्यायासह सादर केली जाईल.

नवीन थार श्रेणीबद्दल

  • नवीन रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) प्रकार

डिझेल: मॅन्युअल ट्रान्समिशनसह ११७ बीएचपी आणि ३००  Nm टॉर्क निर्माण करणारे नवीन D११७ CRDe इंजिन

  • गॅसोलीन: mStallion १५०TGDI इंजिन स्वयंचलित ट्रांसमिशन सह १५० बीएचपी आणि ३२० Nm तयार करते
  • प्रगत ब्रेक लॉकिंग डिफरेंशियलसह विद्यमान4WD प्रकारांची वर्धित क्षमता
  • आव्हानात्मक भूभागावर सहजतेने चालवता येण्यासाठी 4WD श्रेणी आता प्रगत इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंशियलसह येते.
  • दोन नवीन रोमांचक रंग
  • ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाईट
  • नवीन अॅक्सेसरी पॅक
  • थारचे एक वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आहे परंतु आता बेस्पोक अॅक्सेसरीजची नवीन श्रेणी सह ते संपूर्णपणे वैयक्तिकृत केले जाऊ शकते
  • चार वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये बाह्य आणि अंतर्गत शैली पॅक
  • आरामशीर ड्राईव्ह मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी फ्रंट आणि रियर आर्मरेस्ट्स स्टोरेजसह येतात. अधिक आराम आणि सोयीसाठी मागील आर्मरेस्ट कप-होल्डर आणि यूएसबी चार्जिंग पोर्टसह सुसज्ज असतील.

किंमत तपशील (एक्स शोरूम) खालीलप्रमाणे

AX (O) RWD – Diesel MT – Hard Top INR 9.99 Lakh
LX RWD – Diesel MT – Hard Top INR 10.99 Lakh
LX RWD – Petrol AT – Hard Top INR 13.49 Lakh

*स्वागतमूल्य किमती पहिल्या 10,000  बुकिंगवर लागू

ऑल न्यू थार बद्दल

अविस्मरणीय स्थान, वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन, नेहमीचा आरामदायी अनुभव, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षितता वैशिष्ट्यांसह चित्तथरारक कामगिरी यांसह २०२० मध्ये सादर केलेले स्वतःचे एक श्रेणी निर्माते थारने ग्राहकांना आणि उत्साहींना आकर्षित केले आहे

  • अविस्मरणीय स्थान: आधुनिक वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन असलेली ऑल-न्यू थार विशालता आणि वैशिष्ट्यपूर्णता यांनी जिथे जाते तिथे वेगळी उठून दिसते.
  • आरामशीरपणे संस्मरणीय सहली करा: प्रत्येक सहलीला आरामदायी आणि मजेदार बनवण्यासाठी अत्याधुनिक नवीन इंटीरियरमध्ये सर्वकाही आहे. स्पोर्टी फ्रंट सीट्स, रिक्लाइनिंग रिअर सीट्स, रूफ-माउंट स्पीकर यांनी सुसज्ज आहे.
  • नवीन तंत्रज्ञानासह रेट्रो कूल: ऑल-न्यू थार तंत्रज्ञानाने भरलेले आहे जे ग्राहकांना त्यांच्या थार, मित्र आणि बाहेरील लोकांशी जोडलेले ठेवते. यात प्रतिसादात्मक टचस्क्रीन, टायरेट्रॉनिक्स आणि बरेच काही समाविष्ट आहे.
  • उत्कृष्ट सुरक्षितता: ईएसपी, रोल केज, एबीएस आणि एअरबॅग्जसह ग्लोबल NCAP द्वारे प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेमध्ये ४ स्टार मानांकन असून थार अशक्य गोष्टी साध्य करण्यासाठी सर्व सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज आहे.