पुणे, : महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एम अँड एम) या स्मॉल कमर्शियल व्हिइकल (एसयूव्ही) क्षेत्रात भारतात आघाडीवर असलेल्या कंपनीने आज सुप्रो सीएनजी ड्युओ हे पहिले ड्युएल- फ्युएल वाहन लाँच केले. स्मॉल कमर्शियल व्हिइकल क्षेत्रातील ते पहिले असे वाहन आहे. सुप्रो सीएनजी ड्युओ ग्राहकांना दर्जेदार पे-लोड, चांगले मायलेज आणि सर्वोत्तम कामगिरीसह, जास्तीत जास्त नफा मिळवून देण्यासाठी खास तयार करण्यात आले आहे.
सुप्रो सीएनजी ड्युओची किंमत ६.३० लाख रुपयांपासून सुरू (एक्स शोरूम पुणे) असून त्यात विविध वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. नव्या सुप्रो सीएनजी ड्युओमध्ये देण्यात आलेली वैशिष्ट्ये या क्षेत्रात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. त्यात देण्यात आलेल्या डायरेक्ट-इन-सीएनजी स्टार्टमुळे गाडी सीएनजी मोडमध्ये सुरू करता येते व ग्राहकाच्या पैशांची चांगली बचत होते. त्याशिवाय सुप्रो सीएनजी ड्युओमध्ये सीएनजी गळती होत असल्यास ते सूचित करणारी खास सुविधा देण्यात आली, ज्यामुळे ग्राहकाची सुरक्षितता वाढते. त्याशिवाय सीएनजी आणि पेट्रोल पर्यायही सहजपणे बदलण्याची सोय यात आहे.
एम अँड एमच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे अध्यक्ष विजय नाक्रा म्हणाले, ‘सुप्रो सीएनजी ड्युओचे लाँच महिंद्राच्या नाविन्यपूर्ण आणि विश्वासार्ह व्यावसायिक वाहने तयार करण्याच्या परंपरेचे प्रतीक आहे. ग्राहकांचा अभिप्राय आणि गेल्या दशकभरापासून बाजारपेठेत असलेले आघाडीचे स्थान यांच्या मदतीने हे वाहन तयार करण्यात आले आहे. सुप्रो सीएनजी ड्युओद्वारे कंपनी ड्युएल- फ्युएल क्षेत्रात प्रवेश करत आहे. त्यातून वाहनमालक व चालकांना येणारा वाहनाचा खर्च कमी होईल. लॉजिस्टिक्स, पुरवठा साखळी आणि ई- कॉमर्स कंपन्यांच्या आव्हानात्मक मागण्या पूर्ण करण्याच्या हेतूने या वाहनाची बांधणी करण्यात आली आहे. सुप्रो सीएनजी ड्युओ लाँच करत महिंद्राने व्यवसाय तसेच समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आपले तत्व परत एकदा जपले आहे.’
एम अँड एमच्या ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी आणि उत्पादन विकास विभागाचे अध्यक्ष आर. वेलूसामी म्हणाले, ‘सुप्रो सीएनजी ड्युओ स्मार्ट आणि सहजपणे वापरता येण्यासारखे ड्युएल फ्युएल स्मॉल कमर्शियल व्हिइकल आहे. हे वाहन उत्सर्जन कमी करण्यास मदत करते, शिवाय ते वापरण्याचा खर्चही कमी आहे. यामुळे मोठी बचत करणे शक्य होते. आम्ही नव्या सुप्रो सीएनजी ड्युओमध्ये या क्षेत्रातील सर्वात नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहे. त्यात डायरेक्ट- स्टार्ट सीएनजी, सुरक्षेसाठी सीएनजी लीक डिटेक्शन, ७५० किलोपर्यंतचा सर्वोत्तम पे- लोड यांचा समावेश आहे. त्याचशिवाय यात देण्यात आलेल्या इंधन टाकीची क्षमता ७५ लीटर्स असून गाडीचे मायलेजही चांगले आहे. नव्या सुप्रो सीएनजी ड्युओने रेंजची पूर्ण चिंताच मिटवली आहे. या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे महिंद्राचे हे अद्ययावत स्मॉल कमर्शियल व्हिइकल परत एकदा ग्राहक आणि चालकांसाठी फायदेशीर ठरेल.’
सुप्रो सीएनजी ड्युओ त्यात दिलेल्या काही खास वैशिष्ट्यांमुळे इतरांपेक्षा वेगळी ठरली आहे. त्यात ७५० किलोपर्यंतची पे- लोड क्षमता, ३२५ किमीची रेंज आणि ७५ लीटर्सची सीएनजी टाकी आणि रेंजच्या काळजीपासून मुक्तता यांचा समावेश आहे. यामुळे व्यावसायिक संधी तसेच मिळकत वाढण्यास मदत होईल.
नव्या एससीव्हीमध्ये २०.०१ केडब्ल्यू (२७बीएचपी) बीएस६ आरडीईचे पालन करणारे इंजिन ६० एनएम टॉर्क आणि २३.३५ किमी/किलोच्या सर्वोत्तम मायलेजसह देण्यात आले आहे. या वाहनात १४५ आर १२ ८पी आर टायर्स, १५८ एमएमचा ग्राउंड क्लियरन्स देण्यात आल्यामुळे कामगिरी जास्त चांगली होते आणि फुल लोड असतानाही पिक अप सोपे होते.
ग्राहकांना लो- डाउन पेमेंटसह नवी सुप्रो सीएनजी ड्युओ बुक करता येईल आणि सहजसोप्या खरेदीसाठी आर्थिक योजनांचा लाभ घेता येईल.
महिंद्राच्या चाकण, महाराष्ट्र येथील अत्याधुनिक प्लँटमध्ये तयार करण्यात आलेल्या सुप्रो प्लॅटफॉर्मची कामगिरी, सुरक्षा व विश्वासार्हता अशा निकषांवर कडक तपासणी करण्यात आली आहे. या गाडीवर ३ वर्ष/८००० किमीची (जे आधी येईल ते) वॉरंटी देण्यात आली आहे. ही गाडी डायमंड व्हाइट आणि डीप वॉर्म ब्लू अशा दोन रंगांत उपलब्ध करण्यात आली आहे. या गाडीला महिंद्राच्या विस्तृत सर्व्हिस नेटवर्कचा दमदार पाठिंबा मिळाला आहे.
सुप्रो सीएनजी ड्युओविषयी अधिक माहिती
दमदार कामगिरी
सुप्रो सीएनजी ड्युओमध्ये दमदार २०.०१ केडब्ल्यू (२७बीएचपी) बीएस६ आरडीईचे पालन करणारे इंजिन ६० एनएम टॉर्क आणि २३.३५ किमी/किलोच्या सर्वोत्तम मायलेजसह देण्यात आले आहे. त्याशिवाय ७५० किलोपर्यंतची पे- लोड क्षमता आणि ७५ लीटर्सची या श्रेणीतील सर्वात मोठी इंधनाची टाकी देण्यात आली आहे. ग्राहकांच्या मनःशांतीसाठी गाडीवर ३ वर्ष/८००० किमीची (जे आधी येईल ते) वॉरंटी देण्यात आली आहे.
सर्वोत्तम आणि बुद्धीमान
सुप्रो सीएनजी ड्युओमध्ये कार्यक्षमता आणि कामगिरी उंचावण्यासाठी आधुनिक ईसीयू देण्यात आले आहे. यामुळे पेट्रोल व सीएनजीमधे सहजपण बदल करता येतो. पर्यायाने इंधन वाचते आणि जास्त मायलेज मिळते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने चालकाला सीएनजीचे फायदे मिळवता येतात व त्यासाठी गाडीची ताकद किंवा कामगिरीबाबत तडजोड करावी लागत नाही. यातील व्हेंटिंग व्हॉल्व्ह आर्द्रता टिकवणाऱ्या सुविधेमुळे हा सीएनजी किट ईसीयू वाहनचालकांसाठी सर्वाधिक पसंती ठरतो.
आरामदायीपणा आणि सोयीस्करपणा
सुप्रो सीएनजी ड्युओमध्ये युजर फ्रेंडली घटक देण्यात आले आहेत. उदा. प्रेशर रेग्युलेटर देखभाल सोपी करतो आणि त्यामुळे खर्च कमी होतो. पेट्रोलचे कामकाज सहज व्हावे म्हणून देण्यात आलेला सिलेक्टेबल पियानो स्विच आणि अंतर्ज्ञानी सीएनजी लेवल इंडिकेटरमुळे इंटरफेज वापरण्यास सोपा होतो.
दर्जेदार सुरक्षा
सुप्रो सीएनजी ड्युओमध्ये काळजीपूर्वक विकसित केलेला आणि कठोर निकषांवर तपासण्यात आलेला सीएनजी व पेट्रोल किट देण्यात आला आहे. यामुळे चालकाला गाडीची कामगिरी विश्वासार्ह होण्याची खात्री मिळते. यात सीएनजीची गळती होत असल्याचे सूचित करणारे वैशिष्ट्य देण्यात आले आहे, जे ग्राहकाची सुरक्षा जपते. त्याशिवाय या किटमध्ये फायर एक्सटिंग्विशर देण्यात आले आहे, जे संकटकाळी उपयुक्त ठरते.