महिंद्राचा ग्लोबल ट्रॅक्टर, ज्याचं कोडनेम आहे K2, “OJA” या ब्रँडअंतर्गत लाँच केला जाणार

86
mahindra-rise

मुंबई : महिंद्रा ट्रॅक्टर्स या महिंद्रा अँड महिंद्रा लि. कंपनीच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचा भाग असलेल्या कंपनीने K2 या महत्त्वाकांक्षी जागतिक ट्रॅक्टर उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक, भविष्यवेधी ट्रॅक्टर्सच्या उत्पादन श्रेणीसाठी “OJA” हे नवे ब्रँडनेम लाँच केले आहे. “OJA” हा शब्द ‘ओजस’ या संस्कृत शब्दावरून घेण्यात आला असून त्याचा अर्थ चैतन्य, ऊर्जा आणि सामर्थ्य असा होतो.

  • महिंद्रा OJA मध्ये महिंद्राच्या अत्याधुनिक उत्पादन श्रेणीतील ४० ट्रॅक्टर्सचा समावेश असून प्रत्येकामध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात आले आहे.
  • महिंद्रा OJA च्या प्रमुख बाजारपेठेत भारत, अमेरिका, आग्नेय आशिया आणि जपान यांचा समावेश

महिंद्रा OJA हा महिंद्राचा नवा हलक्या वजनाच्या ट्रॅक्टरचा जागतिक प्लॅटफॉर्म असून त्याद्वारे देशांतर्गत तसेच अमेरिका, जपान, आग्नेय आशिया अशा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले जाते. हे मित्सुबिशी महिंद्रा अग्रीकल्चर मशिनरी, जपान आणि महिंद्रा रिसर्च व्हॅली इंडिया या महिंद्राच्या वाहन व कृषी क्षेत्रासाठीच्या आर अँड डी सेंटरने विकसित केले आहे.

महिंद्रा ओजामध्ये चार सब- ट्रॅक्टर प्लॅटफॉर्म्स असून त्यात – सब- कॉम्पॅक्ट, कॉम्पॅक्ट, स्मॉल युटिलिटी आणि लार्ज युटिलीटी या ट्रॅक्टर विभागांचा समावेश आहे. यामध्ये विविध एचपी पॉइंट्सच्या ४० मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे.

नव्या ब्रँड नावाच्या घोषणेविषयी एम अँड एम लि. च्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले, ‘K2 असे कोडनेम असलेल्या आमच्या बहुप्रतीक्षीत ट्रॅक्टर प्रोग्रॅमअंतर्गत उत्पादन आवृत्तीचे जागतिक प्रीमियर होणार असतानाच महिंद्राला आपल्या हलक्या वजनाच्या ट्रॅक्टर श्रेणीसाठी “OJA” हे नवे ब्रँडनेम घोषित करताना आनंद होत आहे. यावर्षाच्या अखेरपर्यंत लाँच होणार असलेले OJA महिंद्राचा भविष्यवेधी ट्रॅक्टर्सच्या श्रेणीचे प्रतीक असून त्यातील उत्पादनांना सुधारित कामगिरी व उत्पादनक्षमतेसाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. या उत्पादनांच्या मदतीने शेती क्षेत्राचे स्वरूप आमूलाग्र बदलण्याचे व पर्यायाने शेतकऱ्यांचे आयुष्य उंचावण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे.’

महिंद्राच्या OJA ट्रॅक्टर्सचे उत्पादन कंपनीच्या झहीराबाद येथील ट्रॅक्टर उत्पादन केंद्रात केले जाणार असून ही सुविधा आग्नेय आशियातील सर्वात मोठी आणि महिंद्राच्या ट्रॅक्टर उत्पादन कारखान्यांपैकी सर्वात अद्ययावत आहे. झहीराबादच्या या सर्वसमावेशक केंद्रात महिंद्राच्या अत्याधुनिक युवो आणि जिवो ट्रॅक्टर्सच्या श्रेणीचेही उत्पादन केले जाते व त्यात नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या प्लस सीरीज ट्रॅक्टर्सचाही समावेश आहे.

सध्या महिंद्रा ही तेलंगणातील एकमेव ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असून त्यांनी झहीराबादमध्ये आतापर्यंत अंदाजे १०.८७ अब्ज रूपयांची गुंतवणूक केली आहे. फार्म इक्विपमेंट सेक्टरद्वारे १५०० जणांना रोजगार देण्यात आला असून दुहेरी शिफ्टमध्ये काम करून प्रती वर्ष १००,००० ट्रॅक्टर्स तयार करण्याची त्याची क्षमता आहे.

झहीराबादचा कारखाना उच्च तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आला असून त्यात ३० ते १०० एचपी क्षमतेचे तब्बल ३३० वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर्स तयार करण्याची क्षमता आहे. स्थापनेपासूनच या कारखान्याने टीपीएस (टोटल प्रॉडक्टिव्ह मेन्टेनन्स) तत्वाचा अवलंब केला असून झहीराबादमध्ये होणाऱ्या ट्रॅक्टर उत्पादनापैकी ६५ टक्के भाग जगभरात निर्यात केला जातो.

हेही वाचा :

फोक्सवॅगन व्हर्च्युसने जीएनसीएपीच्या इतिहासात मिळवला सर्वोत्तम स्कोअर, ५ स्टार सेफ्टी रेटिंग प्राप्त