महासाथीनंतरची सहा आयटी-करिअर्स, जी तुम्हाला रोजगार मिळविण्यास मदत करतील

52

पुणे, ७ डिसेंबर, २०२२ : महासाथीने जगावर अनेक प्रकारे परिणाम केला. पण याच महासाथीमुळे आयटी जगताला आज असलेला आकार प्राप्त करून दिला. महासाथीनंतर एकीकडे अनेक करिअर अशाश्वत झाली, त्याचप्रमाणे आयटीमध्ये करिअर करण्यास सज्ज असलेल्या प्रोफेशनल्सची कमतरताही निर्माण झाली. लोकांना जाणीव झाली की, पारंपरिक मनुष्यबळ महासाथीसारख्या जागतिक पातळीवरील घटनांसाठी शाश्वत नाही. त्याचप्रमाणे असेही दिसून आले की, आयटी हे असे क्षेत्र आहे जे टिकून राहणार आहे. दीर्घकालीन विचार करता ज्यांना पर्यायी करिअर क्षेत्र निवडायचे आहे, त्यांच्यासाठी आयटी हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

तरुण इंजिनीअर्सनी करिअरसाठी कशा प्रकारे सज्ज व्हावे आणि त्यांच्या रोजगार संधी कशा वाढवाव्या याबद्दल प्रतिक्रिया देताना बाईटएक्सएलचे सीईओ आणि सहसंस्थापक श्री. करुण ताडेपल्ली म्हणाले, “फुलस्टॅक, पायथन(एआय/एमएल), ब्लॉकचेन, क्लाउड, आयओटी आणि सायबरसिक्युरिटी या सहा क्षेत्रांचे आयटी उद्योगक्षेत्रावर वर्चस्व आहे. या तंत्रज्ञानावरील अवलंबित्व वाढत असल्याने कौशल्ययुक्त प्रोफेशनल्सची गरज आहे. ही कौशल्ये परस्परसंबधी आहेत आणि आयटीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी उज्ज्वल संधी आहेत. हे पाहता ही कौशल्ये वाढविल्याने व पुनर्कौशल्य साध्य केल्याने महासाथीनंतरच्या काळात आयटी मनुष्यबळाला मजबुती मिळेल.”

फुलस्टॅक :

एकाच कोडिंग लँग्वेजमध्ये स्पेशलाइझ करणे हा एक पर्याय आहे. पण जेव्हा करिअरवृद्धीची व्याप्ती वाढावायची असेल तर विविध तंत्रज्ञानांची माहिती असणे हाच प्रगतीचा मार्ग आहे. येथे फुलस्टॅक थोडे सरस ठरते. फुलस्टॅक डेव्हलपर कोर्स अध्ययनकर्त्याला परिस्थिती हाताळण्यासाठीचा रिअल टाइम अनुभव घेण्यास सक्षम करतो. सातत्यपूर्ण तंत्रज्ञान बदलासह फुलस्टॅक डेव्हलपमेंट दीर्घकालीन विचार करता अधिक लाभ देतो आणि त्यात साचलेपणा येण्याची शक्यता खूप कमी आहे. हा कोर्स केल्यानंतर भारतात सुरुवातीला 7 लाख रुपयांपर्यंत पगाराची अपेक्षा केली जाऊ शकते.

पूर्वावश्यकता : एचटीएमएल5, सीएसएस3, जावास्क्रिप्ट, रिअॅक्टजेएस, अँग्युलर आणि नोडजेएस, डेटाबेसेस आणि डेव्हऑप्स कौशल्यांसारखे इतर बॅक-एंड तंत्रज्ञान

पायथनसह एआय/एमएल आणि डेटा सायन्स :

एआय/एमएल हा बहुतेक क्षेत्रांमध्ये सध्या परवलीचा शब्द आहे. एआय/एमएल अल्गॉऱ्हिदम स्क्रिप्टिंग म्हणून पायथनवर आधारित आहेत. डेटा मॅनिप्युलेशन व व्हिज्युअलायझेशनमधील या अत्यंत अष्टपैलू अॅप्लिकेशनमुळे, रिपोर्टिंग टूलचा वापर करून केलेले विश्लेषण, रिपिटेटिव्ह टास्क्स (एकच काम वारंवार करावे लागणे) कमी करण्यासाठी बहुतेक उद्योगांमध्ये पायथनला महत्त्व प्राप्त झाले आहे. फ्रेशरला सुरुवातील 5.8 लाख रुपये पगार मिळू शकतो आणि अतिरिक्त कौशल्य साध्य केल्यास हा आकडा वार्षिक रु.7 लाखांपर्यंत जाऊ शकतो.

पूर्वावश्यकता : पायथन वेब फ्रेमवर्क्स आणि एआय, एमएल, व मल्टि-प्रोसेस आर्किटेक्चरसह युझरच्या अॅक्शन्स, सेन्सर आउटपुट इत्यादींनुसार निर्धारित होणारे प्रोग्रॅमिंग.

ब्लॉकचेन

ब्लॉकचेन अॅप्लिकेशन हे आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत अत्यंत आवश्यक आहे. क्रिप्टोकरन्सी मार्केटला प्रचंड मागणी असल्याने, ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या वेब 3.0 या तंत्रज्ञानाला पारदर्शकता व गव्हर्नन्सचा विचार करता खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. ब्लॉकचेन डेव्हलपरव्यतिरिक्त क्रिप्टो एक्स्पर्ट, सोल्युशन आर्किटेक्ट किंवा विषयतज्ज्ञही होता येऊ शकते. ब्लॉकचेन तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत असताना पुढील अनेक वर्षे या क्षेत्राची भरपूर मागणी असणार आहे आणि फ्रेशर्स व मिड-प्रोफेशनल्सना चांगला मोबदला देणारे जॉब मिळतील.

पूर्वावश्यकता : क्रिप्टोग्राफी, इथेरिअम, कन्सेन्सस, हॅश फंक्शन्स, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि डिस्ट्रिब्युटेड लेजर्सचे उत्तम कौशल्य.

क्लाउड :

क्लाउडमध्ये डेटा स्टोअर केल्याने कंपन्या तो कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही वेळी वापरण्यास मदत होते. आजच्या वेगवान जगात हा डेटा सुरक्षित ठेवण्याचीही गरज असते. म्हणूनच क्लाउड अॅड डेव्हलपर्स, क्लाउड डेटा अॅनालिस्ट आणि क्लाउड डेटा सिक्युरिट एक्स्पर्ट्सची आजच्या काळात खूप मागणी आहे. यापैकी बहुतेक जॉब्जसाठी खूप संयम व चिकाटीची आवश्यकता असते. त्यामुळे या क्षेत्रातील प्रोफेशनल्सना त्यांच्या सेवांसाठी उत्तम पगार मिळतो. भारतातील लोकेशननुसार क्लाउड डेव्हलपरचा वार्षिक पगार रु.7.5 लाखांपासून रु.12.50 लाखांपर्यंत असू शकतो.

पूर्वावश्यकता : स्क्रिप्टिंग, लिनक्स, डिप्लॉयमेंट तंत्रज्ञान (डॉकर, क्युबरनिट्स, जेनकिन्स इ.) आणि एपीआय

आयओटी

क्यूआर कोड स्कॅनिंगपासून ते बँक अकाउंट्समधील बँकिंग व्यवहारांच्या प्रक्रियेपर्यंत आजच्या डिजिटल जगात प्रचंड संधी आहेत. व्यवसाय प्रक्रियांचे ऑप्टिमायझेशन सुलभ करण्यासाठी आयओटीची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आरोग्यसेवा, लॉजिस्टिक्स व फुलफिलमेंट, निर्मिती व बांधकाम या क्षेत्रांमध्ये आयओटीची भरपूर आवश्यकता असते. डेटा/इमेज अॅनॅलिटिक्समध्ये करिअर केल्याने कंपन्यांना आयओटी उपकरणांनी संकलित केलेल्या प्रचंड प्रमाणातील डेटाचे विश्लेषण करणे, क्रमवारी लावणे, डुप्लिकेट वा करप्ट डेटा शोधणे व दुरुस्त करणे यास मदत होते. नेटवर्किंग स्ट्रक्चर, डेटा सिक्युरिटी, हार्डवेअर, युझर इंटरफेस, सेन्सर्स, एम्बेडेड प्रोग्रॅमस इंजिनीअरिंग आणि एआय व एमएल यांचाही आयओटीमधील इतर स्ट्रीम्समध्ये समावेश होतो. घरातील कनेक्टेट उपकरणे, कमर्शिअल इमारतींमधील बायोमेट्रिक सायबरसिक्युरिटी स्कॅनर किंवा भुकेलेल्यांचे पोट भरणाऱ्या मिलियन मील प्रोग्रॅमसारख्या सामाजकार्यांसाठी स्मार्ट सोल्यूशनची खातरजमा करणे यासाठी आजच्या बदललेल्या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचा आयओटी हा एक मोठा भाग आहे. भारतातील आयओटी इंजिनीअरचा सुरुवातीचा वार्षिक पगार अदाजे रु.8.65 लाख आहे.

पूर्वावश्यकता : यूआय/यूएक्स, डेटा/इमेज प्रोसेसिंग, एम्बेडेड सिस्टिम्स, इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर आणि क्लाउड कम्प्युटिंग

सायबरसिक्युरिटी

2023 पर्यंत सायबरसिक्युरिटी प्रोफेशनल्सची संख्या 40 लाखांपर्यंत वाढणार आहे! डेटा उल्लंघन, प्रायव्हसीचे उल्लंघन, सायबर-आक्रमणे आणि मालवेअर आक्रमणे आजच्या जगात सर्रास आढळून येतात. सायबर गुन्हेगार भक्कम फायरवॉल तोडण्यासाठी नवे मार्ग व अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने कंपन्यांना सायबरसिक्युरिटी प्रोफेशनल्स व एथिकल हॅकर्सची अत्यंत गरज आहे. कंपन्या सतत अधिक भक्कम अँटि-मालवेअर सॉफ्टवेअर उभारण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांच्यातील कच्चे दुवे विद्यमान यंत्रणांच्या मदतीने मान्यताप्राप्त व्हाइट हॅट पद्धतीच्या माध्यमातून करत असतात. तज्ज्ञ प्रोफेशनल्सच्या कमतरतेमुळे कंपन्या या तज्ज्ञांना वार्षिक 8 ते 12 लाख पगार देण्यास तयार आहेत.

पूर्वावश्यकता : थ्रेट इंटेलिजन्स ॲनॅलिटिक्स, तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, असुरक्षा मूल्यांकन आणि जोखीम व्यवस्थापन सोल्यूशन