महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा आजपासून ८ हजार खेळाडू सुवर्ण आणि गौरवासाठी लढणार

66

पुणे, २ जानेवारी २०२३ : प्रतिभेचा शोध आणि प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाकांक्षी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा सोमवार पासून राज्यातील ९ शहरामंध्ये रंगणार आहेत.  पुढील १० दिवसांमध्ये राज्यातील ८ हजार पेक्षा अधिक अव्वल खेळाडू ३९  स्पर्धा खेळतील. त्यापैकी २४ स्पर्धा पुण्यातील बालेवाडी स्टेडियम मध्ये पार पडतील. २२ वर्षानंतर या खेळाचे आयोजन महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या भागीदारीने संपन्न होत आहेत.

या संदर्भात राज्याचे क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्तरावरील खेळामध्ये महाराष्ट्र दरवर्षी प्रथम किंवा द्वितीय क्रमांकावर असतो.आमच्या खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक स्तरावरही जिंकण्याची प्रतिभा आणि क्षमता आहे. त्यांना ओळखण्यासाठी व त्यांचे पालनपोषण करण्यासाठी खेळ हे एक सर्वोत्तम आदर्श व्यासपीठ आहे. तळागळातील प्रतिभेला चालना देण्यासाठी शालेय स्तरापासूनच १६ हजार पेक्षा अधिक एथलीट्सचा डेटा बेस तयार करू अशी आशा आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर म्हणाले, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे खेळ होत असल्याने आनंद आहे. प्रतिभावन खेळाडूंना शीर्षस्थानी येण्यासाठी हे योग्य व्यासपीठ असेल.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरव राव म्हणाले. पुणे ही आपल्या देशाची क्रीडा राजधानी आहे. त्यामुळे आम्ही येथे अशा सुंदर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करीत आहोत.राज्यातील सर्व प्रतिभावान खेळाडू एका अनोख्या अनुभवासाठी एकत्र येतील आणि त्यांची उत्कृष्टता दाखवतील.

ही स्पर्धा सोमवारी (कुस्ती) सॉफ्टबॉल (जळगाव), बॅडमिंटन (नागपूर) आणि योगासन (नाशिक) या स्पर्धाना सुरूवात होणार आहे. बारामती, औरंगाबाद, अमरावती, मुंबई आणि सांगली ही तर यजमान शहरे आहेत.

खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकार्‍यांसह सर्व सहभागींसाइी सरकार राहण्याची आणि निवासची व्यवस्था करीत आहेत. त्यांचाही विमा उतरवण्यात आला आहे.

——————————————————————————————————

स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन ५ जानेवारी रोजी

या स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन ५ जानेवारी रोजी पुण्यात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यातील ८ विभागात एकाच वेळी खेळाची मशाल प्रज्वलित करण्यात आली आहे. ५ जानेवारी रोजी पुणे शहरात दाखत होणार असून तेथे ज्योत प्रज्वलित होणार आहे.

——————————————————————————————————

खेळासाठी १९ कोटी रूपयांची तरतूद 

खेळाचे बजेट या संदर्भात डॉ. दिवसे म्हणाले की, दोन वर्षापूर्वी या खेळांसाठी राज्यसरकारने ने १९ कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु साथीच्या रोगामुळे ते होऊ शकले नाही. आता सरकार आणखी निधी जारी करण्याचा विचार करीत आहे.

——————————————————————————————————