महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या इंद्रायणी थडी जत्रेत नवोदितांना संधी

68
Processed with VSCOcam with f2 preset

पिंपरी, ९ जानेवारी २०२३ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सर्वात मोठी म्हणून लौकिक प्राप्त “इंद्रायणी थडी” जत्रेतील स्टॉल नोंदणीकरिता तब्बल ५ हजारहून अधिक इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे यावर्षीसुद्धा ही जत्रा मोठ्या दिमाखात साजरी होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

  •  भोसरीत येत्या दि. २५ जानेवारीपासून पाच दिवस जत्रा
  • तब्बल ५ हजराहून अधिक इच्छुकांचे स्टॉल बुकिंगसाठी अर्ज

महिला सक्षमीकरण उद्योजकता विकास आणि नवोदितांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून, तसेच शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी “इंद्रायणी थडी” जत्रेचे आयोजन केले जाते.

यावर्षी जत्रेमध्ये एकूण ८०० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यासोबतच ग्राम संस्कृती, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक दस्तावेज प्रदर्शन, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कलाकृती यासह नवोदित कलावंतांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विविध प्रकारातील शंभरहून अधिक मनोरंजन प्रबोधन आणि आरोग्य विषयक कार्यक्रम उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यामुळे यावर्षी संपूर्ण राज्यभरातून सुमारे २५ लाखहून अधिक नागरिक जत्रेला भेट देतील, अशी अपेक्षा समन्वयक संजय पटनी यांनी व्यक्त केली.

—————————————————————————————————

नवोदितांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ…..

पिंपरी-चिंचवड शहर आणि राज्यभरातील नवोदित कलावंत यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे. या हेतूने यावर्षी इंद्रायणी थडी जत्रेमध्ये सुमारे ४० प्रकारच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यामुळे कलाक्षेत्रातील संस्था अथवा व्यक्ती कला-कौशल्यांच्या स्पर्धा घेण्यात इच्छुक असेल, तर जत्रा संयोजकांकडून पुरेशी जागा, स्टेज, ब्रॅण्डिंग, प्रशस्तीपत्रक,  बक्षिसे, प्रमुख पाहुणे यांचे नियोजन करून देण्यास तयारी संयोजकांनी ठेवली आहे. केवळ स्पर्धेचे नियोजन आणि परीक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असलेल्या संस्था अथवा व्यक्तींनी अमोल देशपांडे 87 96 43 44 32 त्यांच्याशी संपर्क करावा किंवा https://forms.gle/5CNeZtuJq11vMuHb7 या गुगल फॉर्ममध्ये माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.