पुणे, ३ डिसेंबर २०२२ : एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी ही भारतातील आघाडीच्या सर्वसाधारण विमा कंपनी असून कंपनीला महाराष्ट्र सरकार कडून रिस्ट्रक्चर्ड व्हेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम (आरडब्ल्यूबीसीआयएस) च्या अंमलबजावणीची जाबाबदारी देण्यात आली असून जालना, औरंगाबाद, अकोला, हिंगोली, बीड, परभणी, सांगली, सातारा, लातूर, कोल्हापूर, ठाणे आणि वर्धा जिल्ह्यांतील २०२२ च्या रब्बी पिकांसाठी कर्ज घेतलेल्या आणि कर्ज न घेतलेल्या शेतकर्यांसाठी ही योजना लागू असेल. रिस्ट्रक्चर्ड व्हेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम (आरडब्ल्यूबीसीआयएस) अंतर्गत असलेली सर्व उत्पादने ही महाराष्ट्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ हॉर्टिकल्चर ॲन्ड फार्म फॉरेस्ट्री द्वारा मान्यताप्राप्त आहेत.
आरडब्ल्यूबीसीआयएस अंतर्गत विशेष संकटे जसे अतिवृष्टी/अवर्षण, तापमान, सातत्याने पडणारे कोरडे दिवस आणि रिलेटिव्ह ह्युमिडीटी कव्हर यांचा सामवेश असून हे निकष महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने आखून दिलेले आहेत. या योजने अतर्गत येणार्या पिकांमध्ये केळी- टिश्यु कल्चर, द्राक्ष, आंबा, मोसंबी (गोड संत्री), संत्री, पपई, डाळींब आणि काजू यांचा समावेश आहे. या योजने मध्ये सहभागी होण्यासाठी असलेली शेवटची तारीख खालील तक्त्यात दर्शवण्यात आली आहे. विम्याचे दावे हे व्हेदर इंडेक्स आणि परिशिष्ट २ मधील निकषांनुसार पूर्ण करण्यात येतील.
जालना, औरंगाबाद, अकोला, हिंगोली, बीड, परभणी, सांगली, सातारा, लातूर, कोल्हापूर, ठाणे आणि वर्धा जिल्ह्यांतील शेतकरी त्यांची पिके आरडब्ल्यूबीसीआयएस योजने अंतर्गत नोंदणी करुन त्यांचा विमा काढू शकतात. त्याच बरोबर या योजनेत सहभागी होण्यासाठी ते जवळची वित्तीय संस्था उदा. राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्राथमिक कृषी सहकारी सोसायटी (पीएसीएस), स्थानिक ग्रामीण बँक/कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) किंवा अधिकृत एचडीएफसी अर्गोच्या एजंटशी संपर्क साधू शकतात. तसेच या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी फार्मर ॲप वर जाऊन तसेचhttps://pmfby.gov.in/ farmerLogin या वेबसाईटवर जाऊन स्वयंनोंदणी ही करु शकतात.