पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंगिकृत शारीरिक सेना पुणे शहर च्या वतीने मनसे शारीरिक सेना कार्यालय येथे “एक सही संतापाची” उपक्रम नुकताच राबवण्यात आला. यामध्ये परिसरातील युवक- युवतींनी, जिम व्यवसायिक, फिटनेस ट्रेनर, सप्लिमेंट व्यवसायिक यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपला संताप व्यक्त करत सह्यांची मोहीम राबवली.
सन्मानीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र राज्य शारीरिक सेनेचे अध्यक्ष ऋषी शेरेकर, मनसे नेते वसंत मोरे तसेच शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली ही सह्यांची मोहिम राबविण्यात आली.
“एक सही संतापाची” या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत तात्या मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी त्यांनी सही करून उपक्रमाचा शुभारंभ केला.
कार्यक्रमाचे आयोजन मनसे शारीरिक सेना पुणे शहराध्यक्ष निलेश काळे, मनसे कार्यकर्ते दीपक टकले, सागर वेताळ, समीर शिंदे, अविनाश वायफळ, प्रियंका धुमाळ आदींनी केले.