महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भिमथॉन स्पर्धेचे आयोजन

62
The great man Dr. Bhimathon competition organized on the occasion of Babasaheb Ambedkar's birth anniversary

पुणे, प्रतिनिधी :  महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिमथॉन स्पर्धेचे दुसऱ्यांदा आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर यांचे विचार समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचवण्यासाठी तसेच सामाजिक एकता आणि समानतेचा संदेश देणारी हि स्पर्धा मॅरेथॉनच्या धर्तीवर आधारित आहे.

१४ एप्रिल रोजी सकाळी ६:३० वा. सारसबाग जवळील सणस मैदानापासून सुरु होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन येथे समारोप होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. महिला, पुरुष व १८ वर्षाखालील युवा गटात लढत होणार आहे. विजेत्यांना ट्रॉफ़ी, मेडल, सर्टीफिकेट मिळणार असून सहभागी सर्व स्पर्धकांना सर्टीफिकेट व मेडल मिळणार आहे. पुणे जिल्हा हौशी अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने हि स्पर्धा घेण्यात येते. यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे.

The great man Dr. Bhimathon competition organized on the occasion of Babasaheb Ambedkar's birth anniversary

या स्पर्धेमध्ये शाळा, कॉलेजसह इतर स्वयंसेवी संस्थां व मंडळांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

देश अमृतमहोत्सवी बर्ष साजरे करित असताना समाज्यातील जातीय, धार्मिक बंधुभाव जपून सामाजिक एकता – समानतेचा संदेश देण्यासाठी भिमथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संविधान जनजागृती, ऐक्याचा संदेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी मांडलेले विचार समाज्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्यासाठी भिमथॉनचे आयोजन करण्यात आले असल्याचे माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत म्हणाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामाजिक क्रांती घडवून आणू शकतात, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे स्पार्क फांउडेशचे किशोर कांबळे म्हणाले.