मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून विस्तार योजनेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण

86
मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून विस्तार योजनेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण

पुणे, २२ जानेवारी२०२३ : देशातील सर्वात मोठ्या सोने आणि हिरेजडित आभूषणांच्या किरकोळ विक्री साखळींपैकी एक मलाबार गोल्ड अँड डायमंड्सनेअमेरिकेतील डलासटेक्सास येथे त्यांचे ३०० वे जागतिक शोरूम सुरू केले आहे. प्रेस्टन रोड येथे असलेले हे कंपनीचे अमेरिकेतील तिसरे शोरूम आहे. या शोरूमच्या अनावरणातून मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला १० देशांमध्ये ३०० शोरूमच्या मजबूत विक्री जाळ्यासह जागतिक स्तरावरील सहाव्या क्रमांकाचे आभूषण विक्रेते म्हणून स्थान कमावता आले आहे.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून विस्तार योजनेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण

कॉलिन काउंटीच्या कमिशनर सुजॅन फ्लेचर,  आणि फ्रिस्कोटेक्सासचे महापौरजेफ चेनी यांनी संयुक्तपणे मलाबारच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक शामलाल अहमद यांच्या उपस्थितीत या शोरूमचे उद्घाटन केले. उद्घाटन कार्यक्रमाला मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एमपी अहमदमलाबार ग्रुपचे उपाध्यक्ष केपी अब्दुल सलामभारतातील व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक ओ आशरसमूह कार्यकारी संचालक – निर्मिती आणि बी२बी व्यवसाय विभागाचे प्रमुख ए.के. निषादइतर व्यवस्थापनातील सहयोगीहितचिंतक आणि मान्यवर यांची उपस्थिती होती.

शोरूमच्या अनावरणाबाबत बोलतानामलाबार ग्रुपचे अध्यक्षएमपी अहमद म्हणाले, आम्ही डलासमधील या नवीन शोरूमसहएकूण विस्तारात ३०० व्या क्रमांकाला गाठले हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. आम्ही आमचा प्रवास कोझिकोडकेरळ येथे एका छोट्या शोरूमपासून सुरू केला आणि ३० वर्षांपेक्षा कमी कालावधीतआम्ही १० देशांमध्ये ३०० शोरूमसह मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. आम्ही आमचे ग्राहकभागधारककर्मचारी आणि इतर सहभागींचे त्यांच्याकडून मिळालेल्या निरंतर पाठबळासाठी आभार मानू इच्छितो.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या भारतातही किरकोळ विस्ताराच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत ज्यात भोपाळ आणि सुरत सारखी प्रमुख शहरे तसेच इरिट्टीअनाकपल्लेनांदेडवापीवसई आणि विझीयानगरम सारख्या प्रमुख द्वितीय श्रेणी बाजारपेठांचा समावेश आहे.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची ब्रिटनबांगलादेशऑस्ट्रेलियाइजिप्तकॅनडातुर्कस्तान आणि दक्षिण आफ्रिकेत दालने उघडण्याची योजना आहे. या विस्तारामुळे किरकोळ विक्रीउत्पादनतांत्रिक आणि व्यवस्थापन क्षेत्रात अंदाजे ६,००० रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. समूहाच्या ओम्नी चॅनेल उपक्रमात आणखी वाढ साधण्यासाठीमलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून मायक्रोसॉफ्टआयबीएमअॅक्सेंच्युअरई अॅण्ड वायडेलॉइट या सारख्या प्रमुख तंत्रज्ञान भागीदारांकडून सेवांचा लाभ घेतला जात आहे.

जागतिक स्तरावर अतुलनीय दर्जा आणि सेवा हमीच्या १० मलाबार हमीं सोबतविविधांगी सुविधांसह अतुलनीय दागिने खरेदीचा अनुभव आणि ग्राहक-अनुकूल धोरणांसाठी मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ओळखली जाते. या मलाबार हमींमध्ये आजीवन मोफत देखभालमोफत विमाहमीपत्र खरेदीआयजीआय आणि जीआयए-प्रमाणित हिरेजागतिक मानकांची २८-सूत्री गुणवत्ता तपासणीशून्य घटीसह सोने विनिमयसंपूर्ण पारदर्शकता९१६ हॉलमार्क प्रमाणित शुद्ध सोनेजबाबदार सोर्सिंगवाजवी किंमत धोरण आणि न्याय्य श्रम पद्धती यांचा समावेश आहे.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने जबाबदार सोर्सिंगनैतिक व्यवसाय पद्धती आणि पारदर्शक आणि व्यावसायिक व्यवस्थापनाद्वारे अनुपालनही सुनिश्चित केले आहे. मलाबार समूहाचा विश्वास आहे की सर्वात यशस्वी कंपन्या अशा आहेत ज्या त्यांच्या मूळ व्यवसायांमध्ये जबाबदारी आणि टिकाऊपणा यांचा मेळ साधतात. भारत आणि परदेशात सामाजिकदृष्ट्या जबाबदार उद्देशांनी प्रेरित उपक्रमांना समर्थन देण्यासाठी समूहाने त्यांच्या नफ्यातील ५ टक्के हिस्सा खर्च करण्याची कटिबद्धता दर्शविली आहे. ही पद्धत समूहाने १९९३ मध्ये स्थापनेपासून स्वीकारली आहे. भूकआरोग्यशिक्षणमहिला सक्षमीकरणगृहनिर्माण आणि पर्यावरण हे समूहाच्या उपक्रमांची मुख्य कार्यक्षेत्रे आहेत.

Read  More  :

‘महाराष्ट्र केसरी’सह विजेत्या मल्लांना बक्षिसांचे वितरण