मणिपाल हॉस्पिटल, खराडीकडून उरूली कांचन व शिक्रापूर येथे मोफत आरोग्‍य शिबिराचे आयोजन

53

मणिपाल हॉस्पिटल, खराडीकडून उरूली कांचन व शिक्रापूर येथे मोफत आरोग्‍य शिबिराचे आयोजन देशभरात आपल्‍या आरोग्‍यसेवा विस्‍तारित करत मणिपाल हॉस्पिटल, खराडी रविवार २३ एप्रिल रोजी राजमाता जिजाऊ स्‍कूल, उरूली कांचन येथे आणि रविवार ३० एप्रिल रोजी जिल्‍हा प्राथमिक शाळा, शिक्रापूर येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत मोफत आरोग्‍य शिबिराचे आयोजन करणार आहे. या आरोग्‍य शिबिराच्‍या मदतीने रूग्‍णांना ऑर्थोपेडिक्स, न्यूरोलॉजी, युरोलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, आणि कार्डिओलॉजी यांसह विविध आरोग्यविषयक आजारांसाठी तज्ञांचा सल्ला मोफत मिळू शकतो.

अलीकडच्या काळात तरुण पिढीमध्ये आरोग्याच्या मोठ्या समस्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, समस्या नंतरच्या टप्प्यावर आढळून आल्‍या आहेत, ज्‍यामुळे जोखीम घटकांमध्‍ये वाढ झाली आहे. सामान्‍यत: जीवनाच्‍या उत्तरार्धात दिसून येणारे मणक्‍याचे व हृदयविषयक आजार आता तरूणांमध्‍ये सामान्‍यपणे दिसून येत आहेत.

इंडियन हार्ट असोसिएशनच्‍या मते, भारतीयांमध्‍ये इतर लोकसंख्‍येच्‍या तुलनेत अधिक लवकर वयात (जवळपास ३३ टक्‍के लवकर) हृदयविकाराचा त्रास दिसून येतो आणि अनेकदा कोणतीही लक्षणे न दिसून येता याचे प्रमाण वाढले आहे. भारतीय पुरूषांमध्‍ये ५० टक्‍के हार्ट अॅटॅक्‍स ५० वर्षांखाली येतात, तर ४० वर्षांखालील पुरूषांमध्‍ये हे प्रमाण २५ टक्‍के आहे.

नियमितपणे आरोग्‍य तपासणी करण्‍याचे महत्त्‍व सांगताना, मिणपाल हॉस्पिटल्स, खराडी- पुणेचे हॉस्पिटल डायरेक्टर श्री. एसजीएस लक्ष्मणन म्‍हणाले,‘‘लहान मुले व किेशोरवयीन मुलांच्‍या मृत्‍यूचे मुख्‍य कारण म्‍हणजे वाढत्‍या आरोग्‍यविषयक समस्‍या. यापैकी बहुतेक मंदगतीने निदान होण्‍याचे परिणाम आहेत. या आरोग्‍य शिबिरांचा रहिवाशांना त्‍यांच्‍या पूर्वीपासून असलेल्‍या वैद्यकीय समस्‍यांसाठी दर्जेदार केअर सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे. मणिपाल हॉस्पिटल्‍स, खराडी पुण्‍यातील व आसपासच्‍या भागांमधील व्‍यापक लोकांना आरोग्‍यविषयक आजारांच्‍या उपचारासाठी सेवा देण्‍याचा प्रयत्‍न करते, ज्‍यामध्‍ये नियमित आरोग्‍य तपासणी, विशेषत: विशिष्‍ट किंवा स्‍पेशालिस्‍ट सेवा जसे प्रत्‍यारोपण किंवा कॅन्‍सर सर्जरी यांचा समावेश आहे. आम्‍ही पुणेकरांना वैशिष्‍ट्यपूर्ण आरोग्‍यसेवा अनुभव देण्‍यास उत्‍सुक आहोत, जेथे त्‍यांच्‍यासाठी प्रत्‍येक सेवा सुलभपणे उपलब्‍ध असेल.’’