पुणे : मणिपाल हॉस्पिटल, खराडीकडून अनेक वैद्यकीय फायदे असलेले सुरक्षा प्लस कार्ड लाँच. गेल्या काही वर्षांत विविध वयोगटांमध्ये आरोग्य सेवा हे महत्त्वपूर्ण म्हणून उदयास आले आहे. लोकांना जीवनाची भेट आणि उत्तम आरोग्यसेवेचे वचन देण्यासाठी मणिपाल हॉस्पिटल, खराडीने पुण्यात ५० वाहतूक पोलिसांसह सुरक्षा प्लस लाँच केले. सुरक्षा प्लस कार्ड कार्डधारकांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यसेवा फायदे आणि विशेषाधिकारांची विस्तृत श्रेणी देते. पुणे आणि जवळपासच्या शहरातील रुग्णांना या सुविधांचा लाभ घेता येईल.
समाजातील सर्व घटकांतील रुग्णांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मणिपाल हॉस्पिटल, खराडी मधील सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचा लोकांना नियमित तपासणीचे महत्त्व समजून घेण्यासाठी प्रेरित करण्याचा, वेळेवर हस्तक्षेप करण्याचा, लवकर निदान करण्याचा आणि कोणत्याही घातक आजाराच्या प्रतिबंधात्मक उपायांची खात्री घेण्याचा मनसुबा आहे. सुरक्षा प्लस आरोग्यसेवा व अत्याधुनिक सुविधांच्या विस्तृत श्रेणीसह येते आणि लोकांना ओपीडी भेटीवर २५ टक्के सूट, लॅब व डायग्नोस्टिक्सवर २५ टक्के सूट, फार्मसीवर १२ टक्के सूट आणि मोफत घरपोच डिलिव्हरी यांसारख्या सेवा देऊन त्यांना लाभ मिळतो. तसेच, रुग्णवाहिका सेवांवर २५ टक्के सूट दिली जाते.
सुरक्षा प्लसच्या लाँचची घोषणा करत मणिपाल हॉस्पिटल्स, खराडी-पुणेचे हॉस्पिटल संचालक एसजीएस लक्ष्मणन म्हणाले, ‘‘आम्हाला हा उपक्रम सुरू करताना अत्यंत आनंद होत आहे आणि आशा करतो की जास्तीत जास्त लोकांना या सेवांचा लाभ घेता येईल. मणिपाल हॉस्पिटल्स, खराडी येथे आम्ही आरोग्याला इतर कोणत्याही घटकांपेक्षा अधिक प्राधान्य देतो आणि आमच्या रूग्णांना चांगले उपचार मिळावेत याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत. सुरक्षा प्लस कार्डधारक व त्यांच्या कुटुंबियांना फायदे आणि विशेषाधिकार देते. या उपक्रमामुळे आम्हाला पुणे व जवळपासच्या शहरांतील लोकांना आमच्या सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवेसह कमी खर्चात सेवा मिळू शकेल आणि येत्या काही वर्षांत देखील आम्ही असेच प्रयत्न सुरू ठेवण्यास उत्सुक आहोत.’’