सनातन संस्थेचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त पुणे येथील विविध मंदिरांमध्ये साकडे !

पुणे – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्था ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवत आहे. वर्ष २०१७ पासून या अभियानांतर्गत हिंदू समाजात हिंदु राष्ट्र आणि आदर्श राष्ट्र उभारणीविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक धर्माभिमानी हिंदू, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांच्या प्रयत्नांना ईश्वराच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. या कार्याला देवतांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी संपूर्ण भारतभर साकडे घालण्यात येत आहे. पुणे येथील समविचारी हिंदूंनी एकत्र येऊन पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये देवतेला साकडे घातले जात आहे. पिंपरी चिंचवड मधील,चिंचवड थेरगाव, चिखली, प्राधिकरण, भोसरी अश्या विविध ठीकणि तसेच मंचर भोर, तळेगाव दाभाडे असे एकूण 75 हुन अधिक ठिकाणच्या मंदिरांमध्ये देवतेला साकडे घालण्यात आले आहे.अजूनही साकडे घालण्याचे अभियान चालू आहे.

या वेळी हिंदुत्वनिष्ठ,धर्मप्रेमीआदींसह समाजातील बहुसंख्य लोक उपस्थित होते. या वेळी देवतेच्या चरणी भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, तसेच विश्वकल्याण व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. हिंदूंच्या मनात हिंदु राष्ट्र स्थापनेचा विचार वारंवार रुजवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात आध्यात्मिक बळ देणारे संत-महंत यांनाही उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, यासाठीही प्रार्थना करण्यात आली.