मंत्राने पुण्यातील १६०० हून अधिक ग्राहकांना १००% ईव्ही चार्जिंगसह शाश्वत जीवन जगण्यास केले सक्षम

50
Rohit-Gupta-CEO-Mantra

शाश्वत विकास आणि गतिशीलतेला चालना देऊन स्वच्छ आणि हरित शहरांसाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांना सुसंगत पुण्यातील आघाडीच्या लक्झरी डेव्हलपर – मंत्राने एक सक्रिय आणि उद्योगक्षेत्रात पायंडा पाडू शकणारा दृष्टिकोन स्वीकारला आहे. शाश्वत जीवनाचा अंगीकार करून राहणाऱ्या नागरिकांना कार आणि बाईक दोन्हीसाठी संपूर्ण कार्यक्षम ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा पुरवत सक्षम करून सरकारच्या उद्देशाला पुढे नेले जात आहे.

मंत्राच्या नव्याने विकसित केलेल्या आकुर्डीतील मेराकी, मुंढव्यातील मिरारी, मुंढवा येथील मंत्रा बिझनेस सेंटर, केशव नगरमधील मेस्मेर या प्रीमियम प्रकल्पांमध्ये ही सेवा दिली जात आहे. यामध्ये १६०० हून अधिक रहिवासी आहेत.

निवासी सोसायट्यांमधील सरकारची ३०% ची आवश्यकता पार करत मंत्राने १००% ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा सादर करून शाश्वत जीवनासाठी एक नवीन मापदंड निर्माण केला आहे. मंत्राचा उपक्रम महाराष्ट्रातील प्रभावी ईव्ही वापराशी सुसंगत असून हे प्रमाण १०% पेक्षा जास्त आहे. भारतीय राज्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. एकट्या पुणे शहराचा ईव्ही वाहनाचा वाटा १९% आहे आणि पिंपरी चिंचवड भागाचा ११% आहे.

ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा प्रदान करण्याची मंत्राची वचनबद्धता ईव्ही मालकांच्या त्यांच्या चार्जिंग गरजा पूर्ण करण्यासाठी घरातील चार्जरवर अवलंबून राहण्याच्या प्रवृत्तीला पूरक आहे. पुढे जाऊन वृक्ष लागवड, पावसाच्या पाण्याची साठवण आणि सच्छिद्र काँक्रीटचा वापर यासारखी विकसकाची शाश्वततेसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे हरित समाज तयार करण्यात आणि सरकारच्या F.A.M.E योजनेला पाठिंबा देण्यासाठी योगदान देतात.

“मंत्रा येथे, आमचा ठाम विश्वास आहे की शाश्वत विकास हा प्रगती आणि पर्यावरण यांच्यातील व्यापार वा तडजोड नाही. प्रत्येक पार्किंगच्या जागेत ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा पुरवून आम्ही शाश्वत समाज निर्माण करण्यासाठी आणि आमच्या रहिवाशांना स्वच्छ जीवन जगण्याची संधी देण्यासाठी वचनबद्ध आहोत.

आमचे प्रयत्न २०३० पर्यंत नेट-शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहेत आणि आम्हाला आशा आहे की इतर विकसकांना हरित भविष्य निर्माण करण्यासाठी आमच्यात सामील होण्यासाठी प्रेरणा मिळेल.”- श्री. रोहित गुप्ता, मंत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी.