भिवंडीतील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पीडितांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर !

40

मुंबई : भिवंडी इथं आज दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. (Bhiwandi Building Collapsed 5 lakhs each to families of death persons in incident) जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांनी हे बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावं तसेच जखमींना तत्काळ रुग्णालयांमध्ये हलवून उपचार सुरू करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले आहेत. भिवंडीत वलपाडा परिसरातील ही इमारत असून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. इमारतीच्या खालच्या भगत गोदाम होते यामध्ये 20 ते 30 जण काम करत होते. तर वरती रहिवासी होते. यादुर्घटनेत आत्तापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.