भारतीय शुगर फ्लोरिस्ट अश्विनी साराभाई ठरल्‍या केक ऑस्कर्स २०२२ च्‍या विजेत्‍या

86

पुणे,१६ नोव्‍हेंबर २०२२ : महामारीनंतर ३ वर्षांनी पहिल्‍यांदाच बर्मिंगहॅम, यूके येथे ‘केक ऑस्‍कर्स’चे आयोजन करण्‍यात आले. द ड्रीम केक्स च्या संस्थापिका भारतातील अश्विनी साराभाई यांना जगभरातील इतर अनेक प्रतिभावान आर्टिस्‍ट्समध्ये शुगर फ्लॉवर्स पुरस्‍कार विजेत्या म्हणून घोषित करण्यात आले. होलसेल शुगर फ्लॉवर्सचे सीईओ कीरा ब्रूक्स यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०१२ मध्ये संकल्पित केक मास्टर्स मॅगझीन अवॉर्ड्स हा सर्वात मोठा आणि प्रथम-स्थापित उद्योग पुरस्कारांपैकी एक आहे, जो परीक्षकांच्‍या प्रख्‍यात पॅनेलसह केक डेकोरेटिंग आणि शुगरक्राफ्ट यांसारख्या विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट प्रतिभांना सन्‍मानित करण्‍याप्रती समर्पित आहे.

हे वर्ष अश्विनी साराभाई यांचे जगातील अव्‍वल चार शुगर फ्लॉवर आर्टिस्ट्सपैकी एक म्हणून स्थान मिळवण्याचे तिसरे वर्ष होते. त्‍यांनी एक उत्कृष्ट आर्टिस्‍ट म्हणून आपल्या सर्जनशील प्रतिभेने संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आणि २०२२ च्‍या विजेत्‍या ठरत प्रतिष्ठित पुरस्कार मिळवला.

द ड्रीम केक्‍सच्‍या संस्थापिका अश्विनी साराभाई म्‍हणाल्‍या की, आजचा हा दिवस एखाद्या स्वप्नपूर्तीपेक्षा कमी नाही कारण यामधून माझा आपल्‍या ध्‍येयांना पूर्ण करण्‍याच्‍या दिशेने अधिक मेहनत घेत राहण्‍यावरील विश्‍वास अधिक दृढ झाला आहे. आपण करणारे प्रत्‍येक काम आवडीने केले पाहिजे आणि आपण ठाम निर्णय घेतला असेल तर मोठ्या उंचीवर पोहोचण्‍यास कोणताच अडथळा येणार नाही. मला अशा प्रतिष्ठित व्‍यापीठावर माझा देश भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी करण्‍याचा आणि मायदेशी बहुमूल्‍य पुरस्‍कार घेऊन येण्‍याचा आनंद होत आहे.’’

केक आर्टिस्‍ट अश्विनी यांनी एक दशकाहून अधिक काळ केक आर्टवर काम करत आहेत आणि केक सजवण्याची त्‍यांची शैली अनोखी असून जगभरात ओळखली गेली आहे. वास्तववादी दिसणारे शुगर फ्लॉवर्स तयार करण्यात त्‍यांची कुशलता आहे. नवप्रवर्तक म्‍हणून त्‍या भारतातील पहिली ऑनलाइन केक अकादमी सुरू करण्‍यामध्‍ये अग्रणी आहेत आणि त्यांनी जगभरातील हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाढवत शुगर फ्लॉवर्स व केक डिझाइन्स बनवण्यामध्‍ये अपारंपरिक पद्धतीने प्रशिक्षित केले आहे.