भारतीय ईव्ही ब्रँड, ईव्हियमद्वारे पुण्यात दुसऱ्या एक्सपिरियन्स हबचा शुभारंभ

86

पुणे, ०५ जानेवारी, २०२३ : ईव्हियम स्मार्ट मोबिलिटी- एलिगंट आणि प्रीमियम ईव्हीच्या भारतीय ब्रँडने महाराष्ट्रातील पुणे शहरात नवीन एक्सपिरियन्स हबचा शुभारंभ केला आहे. या एक्सपिरियन्स हबमध्ये, ग्राहकांना ब्रँडद्वारे देऊ करण्यात आलेल्या भव्य मालिकेतील उत्पादनांची आणि तंत्रज्ञानाची माहिती दिली जाईल. हे हब, सरनोत ऑटोलाइन्स या डीलरशिप नावाखाली असेल.”

हे हब, ऑटोमोबाईल्स शोरूमचे हब असलेल्या, शहरामधील सर्व्हे नंबर 694(ए), प्लॉट नंबर 10ए आदर्श को. ऑप हाऊसिंग संस्था लि., ढोणे ऑटोमोबाईल्स जवळ, पुणे 411037 येथे मार्केटयार्डच्या प्राइम एरियामध्ये स्थित आहे. ब्रँडद्वारे वाहनांची आकर्षक श्रेणी प्रदर्शित केली जात असताना, या हबद्वारे ग्राहकांना दर्जेदार अनुभव प्रदान केला जातो.

या एक्सपिरियन्स हबचा शुभारंभ, ढोणे ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक, श्री. संतोष ढोणे, ईव्हियम स्मार्ट मोबिलिटीच्या  विक्री आणि विपणन विभागाचे उपाध्यक्ष, श्री. आदित्य रेड्डी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

ईव्हियम – सरनोत ऑटोलाइन्सच्या डीलरशिप अंतर्गत असलेल्या या एक्सपिरियन्स हबद्वारे, ब्रँडच्या सर्व 3 प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरचे प्रदर्शन केले जाते, ज्यात पुढील इलेक्ट्रिक स्कूटर्सचा समावेश आहे:

  • कॉस्मो – टॉप स्पीड – 65 कि.मी. प्रतितास; रेंज – एका चार्जवर 80 कि.मी.; किंमत – रु. 1,39,200
  • कॉमेट – टॉप स्पीड – 85 कि.मी. प्रतितास; रेंज – एका चार्जवर 150 कि.मी.; किंमत – रु. 1,84,900
  • झार – टॉप स्पीड – 85 कि.मी. प्रतितास;  रेंज – एका चार्जवर 150 कि.मी.; किंमत – रु. 2,07,700

सर्व किंमती, एक्स-शोरूम, भारत, आहेत. (जीएसटी शिवाय)

भारतात ई-मोबिलिटी संकल्पना सादर करताना, सरनोत ऑटोलाइन्स आणि ईव्हियम स्मार्ट मोबिलिटीच्या समान भावना आणि मूल्ये आहेत.

या शुभारांभाच्या वेळी, सरनोत  ऑटोलाइन्सचे श्री. सुयश निलेश सरनोत म्हणाले, “बरेच ब्रँड, ग्राहकांना तडजोड करणारी उत्पादने प्रदान करत आहेत. या दरम्यान, आम्ही काहीतरी प्रीमियम आणि दर्जेदार शोधत होतो. ईव्हियमची उत्पादने आणि तंत्रज्ञान, अशा परिस्थिती अगदी योग्य आहेत. नावीन्य, शैली आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या ब्रँडसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद होत आहे.”

एक्सपिरियन्स हबच्या शुभारंभाच्या प्रसंगी, ईव्हियम स्मार्ट मोबिलिटीच्या विक्री आणि विपणन विभागाचे उपाध्यक्ष, श्री. आदित्य रेड्डी यांनी पुष्टी केली, “आमच्यासाठी पुण्यातील ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. पुणे हे शहर, ईव्हीच्या बाबतीत सर्वात जागरूक शहरांपैकी एक आहे. या शहराने  सिद्ध केले आहे की ते, ईव्हीसाठी इनोव्हेशन हब आहे आणि आम्हाला उत्पादनाच्या स्वीकृतीच्या बाबतीत या शहरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, म्हणून आम्ही एका तिमाहीत दुसरी डीलरशिप सुरू करण्याचा विचार केला आहे. आमचे पंख, शहरात आणि हळूहळू राज्यभरात पसरवण्याचे आमचे ध्येय आहे. आम्हाला इतर शहरांमधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्ही भारताच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये ठसा उमटवला आहे, याचीच आम्हाला अपेक्षा करत होतो.”

ईव्हियमद्वारे तिच्या वाहनांमध्ये एम्बेड केलेले तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, जेणेकरून ईव्हीशी संबंधित कोणतेही गैरसमज खोडून टाकले जातील.