भारतातून प्रथमच एव्हीगॅस १०० एलएल ची निर्यात

117
IndianOil exports first consignment of AVGAS 100 LL to Papua New Guinea from JNPT

पुणेफेब्रुवारी २०२३ :  भारतातून प्रथमच एव्हीगॅस १०० एलएल ची निर्यात. इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्री. एस. एम. वैद्य यांनी एव्हीगॅस १०० एलएल च्या पापुआ न्यू गिनीला जाणाऱ्या पहिल्या निर्यातीला (एक्सपोर्ट कन्साइनमेंट) जेएनपीटी च्या जीटीआय टर्मिनलवर शनिवारी दुपारी हिरवा झेंडा दाखविला. या कन्साइनमेंट मध्ये ८० बॅरल्समधुन भरलेला १६ किलोलिटर एव्हीगॅस ची निर्यात करण्यात आली. भारताने एव्हीगॅस ची निर्यात करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

IndianOil exports first consignment of AVGAS 100 LL to Papua New Guinea from JNPT

यावेळी श्री. वैद्य म्हणाले की ,जागतिक हवाई इंधनाच्या बाजारपेठेत दरवर्षी ५ टक्के संयुक्त वार्षिक वाढ दराने वाढण्याचा अंदाज आहे. भारतातील हवाई वाहतूकसुद्धा ७ टक्के दराने वाढण्याची  शक्यता आहे. या उत्पादनाच्या निर्मितीसोबत खुल्या झालेल्या संभाव्य व्यवसायाच्या संधींचा शोध घेण्यासाठी इंडियन ऑईल सज्ज आहे. उत्कृष्ट दर्जाचे निकष आणि स्पर्धात्मक किमतींमुळे  इंडियन ऑईलने लक्षणीय प्रमाणात बाजारपेठेत वाटा मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एव्हीगॅस १०० एलएलच्या स्वदेशातील उत्पादनामुळे भारताला आयातीवर खर्च होणाऱ्या परदेशी चलनाची बचत करण्यास मदत तर होईलच शिवाय उगवत्या वैमानिकांना प्रशिक्षण देणे हे देशांतर्गत विमानोड्डाण प्रशिक्षण संस्थांच्या दृष्टीने किफायतशीर होईल.


एव्हीगॅस १०० एलएल हे इंधन भारतात मुख्यतः फ्लाईंग ट्रेनिंग इंस्टिट्यूट्स (एफटीओ) आणि संरक्षण दलांमध्ये वापरले जाते. अगदी अलीकडेपर्यंत कित्येक दशकांपासून ते युरोपियन देशांमधून महागड्या दराने आयात केले जात असे. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत’ या दृष्टिकोनानुसारइंडियन ऑईलने एव्हीगॅस १०० एलएल या हवाई इंधनाचे स्वदेशी उत्पादन २६ सप्टेंबर २०२२ रोजी हिंदान येथील एअर फोर्स स्टेशन येथे सुरू केले. आता ते देशांतर्गत बाजारपेठेत व्यापकरीत्या वापरले जात आहे. सध्या  एव्हीगॅस १०० एलएल चे उत्पादन हे इंडियन ऑईलच्या गुजरात येथील रिफायनरीमध्ये केले जात असून तिची वार्षिक क्षमता ५ टीमटी प्रति वर्ष एवढी आहे. इंडियन ऑईलच्या गुजरात येथील रिफायनरीमध्ये उत्पादन केल्या जाणाऱ्या  एव्हीगॅस १०० एलएलमुळे भारतात तसेच परदेशात विमानोड्डाणाचे प्रशिक्षण देणे अधिक स्वस्त होईल.  


दक्षिण अमेरिकाआशिया पॅसिफिकमध्य पूर्वआफ्रिका आणि युरोपमधील देशांमध्ये एव्हीगॅसचा वापर लक्षणीय प्रमाणात केला जातो. त्यामुळे भारताबाहेरसुद्धा एव्हीगॅसची निर्यात करण्यासाठी मोठी संधी आहे. या दिशेने पहिले पाऊल म्हणून भारतात उत्पादन झालेल्या एव्हीगॅसची पहिली कन्साइनमेंट या दिवशी निर्यात करण्यात आली. 

इंडियन ऑइल: बदलांच्या अग्रभागी 

एव्हिएशन गॅसोलीनचा मुख्य ग्रेड असलेले एव्हीगॅस १०० एलएल हे रेसिप्रोकेटिंग पिस्टन इंजिन असलेल्या विमानांमध्ये वापरण्यासाठी तयार करण्यात आले असून प्रामुख्याने एफटीओ आणि संरक्षण दलांमध्ये त्याचा वापर वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो.

वडोदरा येथील इंडियन ऑइलच्या फ्लॅगशिप रिफायनरीमध्ये उत्पादन करण्यात आलेल्या एव्हीगॅस १०० एलएलची भारतातील नागरी विमान वाहतुकीचे नियमन करण्यासाठी असलेली भारत सरकारची वैधानिक संस्थानागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चाचणी केली असून त्याला प्रमाणपत्र दिले आहे. हे एक हाय-ऑक्टेन एव्हिएशन इंधन आहे. ते आयात केलेल्या ग्रेडच्या तुलनेत  उत्कृष्ट कामगिरीच्या गुणवत्ता निकषांची पूर्तता करून उत्पादनाच्या वैशिष्ट्यांची पूर्तता करते.


एव्हीगॅस १०० एलएल हे देशांतर्गत उपलब्ध झाल्यामुळे आयातीवर अवलंबून राहणे कमी होईल आणि त्यामुळे संबंधित लॉजिस्टिक आव्हानांना तोंड देण्यास मदत होईल. या उत्पादनाच्या देशांतर्गत उपलब्धतेमुळे देशाचे मौल्यवान परकीय चलन वाचविणे शक्य होईल. यामुळे संपूर्ण भारतातील ३५ हून अधिक एफटीओंनाही फायदा होईल. नागरी विमान वाहतूक मंत्रालय देशात आणखी प्रशिक्षण संस्था उघडण्याच्या विचारात असून विमान वाहतुकीतील वाढ पाहता प्रशिक्षित वैमानिकांची गरज वाढण्याचा अंदाज आहे.