भारतातील गुंतवणुकीच्या भविष्यावर ‘सॅम्को’ची बाजी – सादर केला ‘सॅम्को ॲक्टिव्ह मोमेंटम फंड’

65
samco mutual fund logo

मुंबई, ७ जून, २०२३ – सॅम्को ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या एका प्रतिष्ठित गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीने भारतातील पहिला सक्रियपणे व्यवस्थापित मोमेंटम फंड सादर केला आहे. सॅम्को ॲक्टिव्ह मोमेंटम फंड असे त्याचे नाव आहे. बाजारातील सततच्या चढउतारांचा फायदा घेत लाभ मिळवून देणारा आणि जागतिक स्तरावर प्रशंसित असा हा फंड आहे. गुंतवणूकदारांची जोखीम कमी करून त्यांना यथोचित परतावा देण्याचे या फंडाचे उद्दिष्ट आहे. भारतीय बाजारपेठेत गतीमधील गुंतवणुकीच्या अफाट संधींचा फायदा या फंडामध्ये घेतला जाईल.

‘निफ्टी २०० मोमेंटम ३०’ या निर्देशांकाने गेल्या १८ वर्षांमध्ये १७.७९ टक्के असा चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर (सीएजीआर) गाठला आहे. त्याने ‘निफ्टी ५०’ आणि ‘निफ्टी ५००’ या निर्देशांकांनाही मागे टाकले आहे. त्याचप्रमाणे, ‘निफ्टी मिडकॅप १५० मोमेंटम ५०’ या निर्देशांकाने सुरुवातीपासूनच २१.२८ टक्क्यांचा भक्कम सीएजीआर गाठला आहे. दहा पटींनी परतावा देणार्‍या ‘एमएससीआय वर्ल्ड इंडेक्स’शी तुलना केल्यास, ‘एमएससीआय वर्ल्ड मोमेंटम इंडेक्स’ने २० पटींनी परतावा दिल्याचे दिसून येते.

(अस्वीकरण: भूतकाळातील परतावा हा भविष्यातील परताव्याचे कोणतेही संकेत देत नाही. निर्देशांकातील परतावा हा कोणत्याही योजनेचा परतावा दर्शवत नाही आणि तो केवळ एक घटक म्हणून मोमेंटमच्या उदाहरणासाठी येथे नमूद केला आहे. एमएससीआय वर्ल्ड इंडेक्स आणि एमएससीआय मोमेंटम इंडेक्स यांच्या जून १९९४ ते मार्च २०२३ पर्यंतच्या या किमती आहेत. निफ्टी निर्देशांकांसाठी, १ एप्रिल २००५ पासून २८ एप्रिल २०२३ पर्यंतच्या सीएजीआर परताव्याचा येथे उल्लेख केला आहे.)

बाजारपेठेतील या व्यापक संशोधनाचा आणि सिद्ध कामगिरीचा विचार करूनच सॅम्को म्युच्युअल फंडाने भारतातील हा पहिला ‘अॅक्टिव्ह मोमेंटम फंड’ सादर केला आहे. बाजारात मोमेंटम प्रदान करू शकणार्‍या वाढीच्या संधींचा लाभ यातून गुंतवणूकदारांना मिळतो.

‘एमएससीआय वर्ल्ड मोमेंटम इंडेक्स’ने केलेल्या विस्तृत ऐतिहासिक संशोधनातून हे सिद्ध झालेले आहे, की बाजारातील चढउताराची गती (मोमेंटम) हा सर्वात अधिक व सर्वात जलद परतावा देणारा घटक असतो. या शक्तिशाली घटकातील गुंतवणुकीच्या जोरावर, ‘सॅम्को अ‍ॅक्टिव्ह मोमेंटम फंडा’मध्ये, एका प्रोप्रायटरी मोमेंटम-सीकिंग अल्गोरिदमच्या आधारे, वैशिष्ट्यपूर्ण स्टॉक्सची निवड करण्यात येते. याकरीता ब्रेकआउट्स, प्राईस लीडरशिप व इतर काही घटकांचा विचार करण्यात येतो. स्टॉक्सच्या प्रचलित किंमतींचे कल लक्षात घेऊन बाजारपेठेत मिळणाऱ्या नफ्यापेक्षा जास्त नफा मिळवणे आणि गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देणे, हा यामागील उद्देश आहे.

‘सॅम्को ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’चे मुख्य गुंतवणूक अधिकारी (सीआयओ) उमेश कुमार मेहता म्हणाले, “ऐतिहासिकदृष्ट्या, मोमेंटम फॅक्टर किंवा शेअरच्या किमतीच्या ट्रेंडवर आधारित व्यवहार हा सर्वात जास्त परतावा देणारा घटक आहे. मोमेंटमच्या या गुंतवणुकीत सक्रिय व्यवस्थापनाचे धोरण राबविल्यास त्याचे अनन्य फायदे मिळतात, गुंतवणूक करण्याजोगा विस्तीर्ण पट मिळतो, आपल्या पोर्टफोलिओचे पुनर्संतुलन जलद रितीने करता येते आणि मोमेंटम नसल्याच्या काळात हेजिंगची लवचिकताही मिळते. मोमेंटमची वैशिष्ट्ये दर्शविणार्‍या समभागांमध्ये गुंतवणूक करून आमच्या गुंतवणूकदारांना जोखीम कमी करून उच्च परताव्याची क्षमता मिळवून देण्याचे आमचे ध्येय आहे.”

सॅम्को ॲक्टिव्ह मोमेंटम फंडाचे फंड मॅनेजर पारस मटालिया हे आहेत. ते एक अनुभवी गुंतवणूक व्यावसायिक आहेत आणि त्यांना मोमेंटम-आधारित व्यवहारांची सखोल माहिती आहे. आपल्या कौशल्याने आणि अनुभवाने मटालिया हे या फंडाच्या गुंतवणुकीच्या निर्णयांवर देखरेख करतील आणि गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा देण्याच्या दिशेने काम करतील.

या फंडाविषयी माहिती देताना ‘सॅम्को ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विराज गांधी म्हणाले, “सॅम्को ॲक्टिव्ह मोमेंटम फंडाच्या रुपाने भारतातील पहिला सक्रियपणे व्यवस्थापित होणारा मोमेंटम फंड सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. भारतीय गुंतवणुकीच्या परिप्रेक्ष्यात हे एक जोमदारपणे टाकलेले पाऊल आहे. आमचा विश्वास आहे की हा फंड वेगवान गुंतवणुकीचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी नवीन मार्ग उघडेल. आमचा समर्पित अधिकारीवर्ग आणि समर्थ असे गुंतवणूक धोरण यांच्या आधारे गुंतवणूकदारांना मूल्य वितरीत करण्याचा आत्मविश्वास आम्ही बाळगतो.”

सॅम्को ॲक्टिव्ह मोमेंटम फंडाची ही नवीन फंड ऑफरिंग (एनेफओ) येत्या १५ जून रोजी सुरू होईल आणि २९ जून रोजी संपेल. या कालावधीत, मोमेंटम फॅक्टरचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदार आपला पोर्टफोलिओ निर्माण करू शकतात. गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवण्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, एनएफओच्या कालावधीनंतर पुढील सूचना मिळेपर्यंत फंडामध्ये सदस्यत्व स्वीकारले जाणार नाही. तसेच, या एनएफओ कालावधीत नोंदणी करण्यात आलेलेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) स्वीकारले जातील. एनएफओ कालावधीनंतर नवीन एसआयपींची नोंदणी पुढील सूचना मिळेपर्यंत तात्पुरती प्रतिबंधित केली जाईल.

मोमेंटम गुंतवणूकीमध्ये सक्रिय व्यवस्थापनाच्या ऑफरचे अनेक फायदे आहेत : तपशील

तपशील सक्रिय व्यवस्थापन निष्क्रिय व्यवस्थापन
मोमेंटम आणि अँटी-मोमेंटम काळातील एक्सपोजर व्यवस्थापन केवळ मोमेंटमच्या काळात गुंतवणूक केली जाते; अँटी-मोमेंटमच्या वेळी हेज केले जाते. शंभर टक्के वेळा गुंतवणूक केली जाते.
पुनर्संतुलनात गती आणि चपळता जशी आणि जेव्हा गरज असेल, त्याप्रमाणे. सध्या 6 महिने मागे
रिलेटिव्ह आणि अॅबसोल्यूट मोमेंटमच्या आधारावर स्टॉक्सची निवड रिलेटिव्ह आणि अॅबसोल्यूट या दोन्ही मोमेंटमचा लाभ घेतला जातो केवळ रिलेटिव्ह मोमेंटमचाच लाभ घेतला जातो.
पोर्टफोलिओमधील स्टॉक्सची संख्या निश्चित नाही; भांडवल आणि पोझिशन साईझिंगवर अवलंबून सध्या ५० इतकी मर्यादा
संधी साधण्यासाठीचा पट निफ्टी ७५० स्टॉक्स मर्यादीत पट

 

हा अनेकदा सिद्ध झालेला गुंतवणुकीचा मार्ग भारतीय गुंतवणुकदारांसाठी सादर करताना सॅम्को ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडला मोठा अभिमान वाटत आहे. मोमेंटम गुंतवणुकीची क्षमता उपलब्ध होण्याची संधी यातून गुंतवणूकदारांना मिळणार आहे.