भारतातील गायन प्रतिभा शोध स्पर्धा रेडियो सिटी सुपर सिंगर सीझन १४ ची घोषणा

129

पुणे १३ डिसेंबर २०२२  भारतातील आघाडीचे रेडियो नेटवर्क रेडियो सिटी आपल्या ‘रेडियो सिटी सुपर सिंगर’ या आपल्या पहिल्या प्रॉपर्टीच्या सीझन १४ ची घोषणा करताना आनंदीत होत आहे. देशभरातील होतकरू गायकांना सर्वात मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता ‘रेडियो सिटी सुपर सिंगर ओळखली जाते. रेडियो उद्योगात गायन प्रतिभा स्पर्धेची सुरुवात करणारे म्हणून रेडियो सिटीला ओळखले जाते. यंदाची स्पर्धेची टॅगलाईन अगर है म्युजिक से प्यारतो बनो सिटी के अगले सिंगिंग स्टार ही असून त्याद्वारे आपला वारसा कायम राखण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे.

सर्वोत्कृष्ट गायकांचा शोध घेऊन त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्धीसाठी तयार करण्यासाठी भारताचे सुफी मेधावी गायक म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री कैलाश खेर हे मेंटॉर म्हणून सलग तिसऱ्या वर्षी परत येत आहेत. देशभरातील गायन प्रतिभा सादर करण्याच्या १३ यशस्वी सीझननंतर रेडियो सिटी सुपर सिंगरचा सीझन 14 ऑन-एअर आणि ऑन-ग्राउंड कार्यक्रमांसह सर्व प्रमुख डिजिटल व्यासपीठांवरही आपली उपस्थिती मजबूत करणार आहे.

याच्या ऑडिशन्स  डिसेंबरपासून सुरू झाल्या असुन त्याला वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या किंवा गायन करण्याची व आपली प्रतिभा दाखविण्याची आंतरिक इच्छा असलेले कोणीही स्त्री वा पुरुष हे या स्पर्धेचा लक्ष्य वर्ग आहे. याच्या व्होटिंग लाईन्स १८ ते २० डिसेंबर पर्यंत खुल्या असतील आणि रेडियो सिटी सुपर सिंगरचा फिनाले हा २१  ते २३ डिसेंबरला घेण्याचे नियोजन आहेप्रत्येक मार्केटमधील सर्वोत्तम  गायकांना शॉर्टलिस्ट करण्यात येईल आणि प्रत्येक मार्केटमधील विजेता व उपविजेत्यांची घोषणा केली जाईल.

रेडियो सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशित कुकियान म्हणाले की रेडियो सिटी सुपर सिंगरच्या सीझन १४ च्या आरंभाची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. देशभरातील होतकरू गायकांना पुढे येऊन आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग करण्याची संधी देण्याची आमची कटिबद्धता त्यातून दिसून येते. अगर है म्युजिक से प्यारतो बनो सिटी के अगले सिंगिंग स्टार’ ही आमची यंदाची टॅगलाईन ही या विश्वासाला अनुरूप आहेकी संगीताबद्दलचा तुमचा ध्यास हा तुम्हाला शहरातील पुढचा गाणारा सुपरस्टार बनवू शकतोअनेक सर्जनात्मक मार्गाने आणि वेगवेगळ्या संस्कृतीपर्यंत पोचून शहरातील सर्वोत्कृष्ट प्रतिभावंतांना पुढे आणण्याचा वारसा या उपक्रमातून रेडियो सिटी पुढे चालवत आहे.”

रेडियो सिटी सुपर सिंगरचा भाग बनल्याबद्दल कैलाश खेर म्हणालेगायकांच्या प्रतिभांना ओळख मिळवून देण्यासाठी मंच उपलब्ध करून देणारा रेडियो सिटी हा एकमेव रेडियो मंच आहेया वारशाचा भाग बनने ही अत्यंत सन्मानाची बाब आहेमाझा रेडियो सिटी सुपर सिंगरशी गेल्या दोन सीजनपासून संबंध आहे आणि यंदाहीऑडिशन्ससाठी भारतभरातील सर्वोत्कृष्ट गायकांचा शोध आम्ही घेऊ.