पुणे, २५ नोव्हेंबर २०२२ : एक भारतीय वैद्यक-तंत्रज्ञान (मेडटेक) कंपनी आता जागतिक बाजारपेठ जिंकण्यास सज्ज झाली आहे. भारतातील एसएस इनोव्हेशन्स अमेरिकेच्या नॅसडॅकमध्ये सूचीबद्ध असलेली कंपनी अॅव्हरा मेडिकल रोबोटिक्समध्ये नियंत्रक हिस्सा मिळविला आहे. त्यामुळे कंपनीला जागतिक भांडवल आणि बाजारपेठेपर्यंत प्रवेश मिळणार आहे. येथे हे उल्लेखनीय आहे, की जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेले रोबोटिक कार्डियक सर्जन डॉ. सुधीर पी. श्रीवास्तव यांच्या कल्पनेतून निर्माण झालेल्या एसएसआय मंत्रा या कंपनीने भारतात शस्त्रक्रियेच्या प्रांतात एका नव्या युगाला सुरूवात केली असून देशातील लोकांसाठी रोबोटिक सर्जरी सहजसुलभ आणि परवडणारी केली आहे.
रोबोटिक सर्जरीचे जनक डॉ. फ्रेडरिक मोल यांनी सन्माननीय पाहुणे म्हणून या घोषणेच्या कार्यक्रमाची शोभा वाढविली. डॉ. मोल हे जगातील पहिल्या सर्जिकल रोबोट ‘दा विंची सर्जिकल सिस्टिम’चे संस्थापक असून ते जगातील ख्यातनाम वैद्यकीय उपकरणांचे विकसक आणि उद्योजक आहेत. रोबोटिक सर्जरी ही त्यांची खासियत आहे. रोबोटिक सर्जरीचे महत्त्व आणि पारंपरिक शस्त्रक्रियेच्या पद्धतींपेक्षा या पद्धतीचे अनेक फायदे यांवर त्यांनी भर दिला.
इन्ट्यूटिव सर्जिकलचे संस्थापक असलेले डॉ. फ्रेडरिक मोल म्हणाले, एका नव्या रोबोटिक प्रणालीच्या प्रगती आणि विकासाचा साक्षीदार होण्याचा अत्यंत आनंद आहे. वैद्यकीय शस्त्रक्रियेच्या क्षेत्रातील वैद्यकीय शुश्रुषेच्या साधारण वितरणाच्या दृष्टीने हे महान पाऊल आहे, असे मला वाटते. पूर्व आणि पश्चिमेतील जगभरातील रुग्णांना ही प्रणाली अत्यंत विकसित तंत्रज्ञान प्रदान करेल. आशिया आणि त्याच्या सीमेपलीकडेही उत्तम शुश्रुषा आणि कल्याण यांमध्ये महत्त्वाचा बदल घडवून आणण्याची हे तंत्रज्ञान म्हणजे एक संधी आहे.”
संपूर्णपणे भारतात बनविलेला पहिला सर्जिकल रोबोट एसएसआय मंत्रा तयार करून एसएस इनोव्हेशन्स ने भारताची मान गर्वाने उंचावली आहे. हे करणारी ती दक्षिण आशियातील पहिली कंपनी आहे. ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत रोबोटिक प्रणाली असून सध्याच्या प्रणालींपेक्षा तिच्यात अधिक आणि खूप चांगल्या सुविधा व अॅप्लिकेशन्स आहेत. ही मशीन देशात आणि जगातही अचूकता, तांत्रिक प्रगती आणि किंमतीतील घट याबाबतीत शस्त्रक्रियेच्या पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणेल. त्यामुळे महागड्या रोबोटिक शस्त्रक्रियासुद्धा सर्वसामान्य लोकांसाठी सुलभ होतील.
या महत्त्वाच्या प्रसंगी एसएस इनोव्हेशन्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर पी. श्रीवास्तव म्हणाले, या खरेदीमुळे आम्हाला जागतिक बाजारपेठेपर्यंत पोचणे सोपे होईल. आमचे नवीन आविष्कार व्यापक प्रमाणात वापरले जातील. वैद्यक-तंत्रज्ञान क्षेत्राचे भविष्य हे शस्त्रक्रियेच्या अचूकतेवर अवलंबून असेल, हे आपल्याला माहीत आहे आणि या खरेदीमुळे आम्हाला हे ‘मेड इन इंडिया’ तंत्रज्ञान जागतिक व्यासपीठावर नेण्यास मदत होईल. अॅव्हरा मेडिकल रोबोटिक्स आणि एसएसआयच्या एकत्र येण्याने जगभरात वैद्यकीय सेवांमध्ये क्रांती घडेल आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळ मिळेल. रोबोटिक्स सर्जरीचे जनक डॉ. मोल यांच्यासारख्या असामान्य व्यक्ती आज आमच्यासोबत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. त्यांनी २५ वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात साकार होत आहे. या प्रकल्पाचा भाग असल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. एक भारतीय मेडटेक स्टार्ट-अप नॅसडॅकमध्ये असेल, हा संपूर्ण राष्ट्रासाठी खरोखर अभिमानाचा क्षण असेल.”
अत्यंत अनुभव आणि कुशल असे मेडिकल रोबोटिक्स शास्त्रज्ञ ब्रायन क्नोडेल आणि अॅव्हरा मेडिकल रोबोटिक्स इनकॉर्पोरेटेड, अमेरिकाचे संस्थापक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी बॅरी एफ. कोहेन हेही या महत्त्वाच्या घोषणेच्या प्रसंगी उपस्थित होते.
या एकत्रीकरणावर भाष्य करताना अॅव्हरा मेडिकल रोबोटिक्स इनकॉर्पोरेटेड, अमेरिकाचे संस्थापक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी बॅरी एफ. कोहेन म्हणाले, “भारतात असणे हा एक वेगळाच अनुभव असतो. गेल्या पन्नास वर्षांत मी या देशत अनेकदा आलेलो आहे. आजचा प्रसंग हा माझ्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा प्रसंग आहे. माझा इतिहास, कार्य आणि औषधे यांपैकी अनेकांना एकत्र आणणारा हा प्रसंग आहे. डॉ. श्रीवास्तव यांच्या एसएसआय इनोव्हेशन्स आणि माझी कंपनी अॅव्हरा मेडिकल रोबोटिक्सचे एकत्रीकरण करताना मला खूप आनंद होत आहे.
अॅव्हरा मेडिकल रोबोटिक्स ही शुश्रुषा क्षेत्रामध्ये असिस्टिव्ह उपचारांकडून अर्ध-स्वायत्त उपचारांकडे संक्रमण नेत आहे. तिचा प्रारंभिक भर सौंदर्यशास्त्रावर आहे. कंपनी अर्ध-स्वायत्त प्रणालींवर सातत्याने काम करत आहे. अॅव्हरा रोबोटिक ट्रीटमेंट सिस्टिम (एआरटीएस) या प्रणालीमुळे उपचाराची योजना आणि ते उपचार रोबोटद्वारे केले जाताना प्रगत मार्गदर्शक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाहणे शक्य होते. अचूक स्कॅनिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, टारगेटिंग, उपचार आणि माहिती संकलन यांच्या माध्यमातून त्यांची प्रणाली शुश्रुषा क्षेत्राला लक्ष्य, निदान आणि उपचार याबाबत अनंत शक्यता उपलब्ध करून देते. या एकत्रीकरणामुळे शुश्रुषा क्षेत्रामध्ये लवकरच एक नवे युग पाहायला मिळेल. त्यामुळे जगभरात रोबोटिक सर्जरीच्या क्षेत्रात भविष्यात क्रांती घडून येईल.