भाजपा आमदार जयकुमार गोरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

92

पुणे, ०६, जानेवारी, २०२३ : श्री गोरे यांच्यावर उपचार करणारे रुबी हॉल क्लिनिकमधील न्यूरो ट्रॉमा युनिट विभागाचे प्रमुख डॉ. कपिल झिरपे म्हणाले, “एसयूव्ही ज्या खड्ड्यात पडली तो खड्डा किमान ३० फूट खाली होता, त्यामुळे आमदारांच्या छातीत फ्रॅक्चर झाले होते. अपघातानंतर छातीत दुखापत आणि छातीचा घोट फ्रॅक्चर झाल्याने त्यांना क्लिनिक मध्ये दाखल करण्यात आले होते. छातीतील हाड फ्रॅक्चर झाल्यामुळे, आठवडाभरापूर्वी त्यांना जेंव्हा दाखल केले तेव्हा त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. तथापि, वेदना व्यवस्थापन तसेच कार्यात्मक सहाय्यासह बहु-विशेषता दृष्टिकोनासह कालांतराने, त्यांनी औषधोपचारां पलीकडे चांगला प्रतिसाद दिला. श्री गोरे यांच्या बाबतीत, फिजिओथेरपीमुळे त्यांना कार्यात्मक स्वातंत्र्य पटकन मिळण्यास मदत झाली.”

यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे म्हणाले. “रुबी हॉलमध्ये दाखल असल्याच्या या दिवसात मला वॉर्ड बॉय, नर्स, केअर टेकर, डॉक्टर्स यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे माझी काळजी घेतली. आणि या दृष्टिकोनामुळेच माझी पुनर्प्राप्ती अपेक्षेपेक्षा खूप जलद झाली. माझी अत्यंत काळजी घेतल्याबद्दल मी डॉ. पुर्वेझ ग्रांट, डॉ. झिरपे आणि न्यूरो ट्रॉमा युनिट टीमचा आभारी आहे.”

पार्श्वभूमी: जयकुमार गोरे जेव्हा पुणे-पंढरपूर महामार्गावर मलठणजवळ एसयूव्हीने  जात असताना पुलावरून घसरून खड्ड्यात पडल्याने त्यांना दुखापत झाली होती. यांच्या छातीतला हि त्यात दुखापत झाली होती. ते नागपूरहून सातारा जिल्ह्यात घरी परतत असताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खड्ड्यात पडल्याची घटना घडली होती.