भाजपाच्या ‘पश्चिम महाराष्ट्र : माध्यम प्रमुख’पदी अमोल कविटकर

48

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या ‘पश्चिम महाराष्ट्र : माध्यम प्रमुख’पदी  टिव्ही पत्रकारितेत गेली ११ वर्षे कार्यरत असलेले पत्रकार अमोल कविटकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, निवडीचे पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. प्रसंगी ‘महाविजय २०२४’ अभियानाचे प्रमुख आमदार श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

कविटकर यांनी ‘एबीपी माझा’मध्ये मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘साम टिव्ही’मध्ये पुणे ब्युरोमध्ये काम केले आहे. दैनंदिन घटनांसह शहरीकरणाचे प्रश्न, ग्रामीण समस्या आणि शेती प्रश्नांच्या वार्तांकनाचा अनुभव आहे. शिवाय सांगली आणि चिपळूणच्या महापुराचे त्यांनी केलेले वार्तांकन चर्चेचा विषय ठरले होते.

‘आपला प्रसार माध्यमांशी असलेला संपर्क पक्ष संघटनेतील माध्यम विभागाच्या कामास गती देण्यास निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा विश्वास असून ही जबाबदारी पार पाडताना माध्यम विभागातील सर्वांना सोबत घेऊन भाजपाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अथक परिश्रम कराल’, अशी अपेक्षा व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कविटकर यांना शुभेच्छा दिल्या.