भटक्या कुत्र्यांनी केला महिलेवर हल्ला ; महिलेचा मृत्यू शरीराचे लचकेही तोडले!

108

भोपाळ : रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर भीषण हल्ला केल्याची घटना मध्य प्रदेशातील मुंदराई इथं घडली आहे. या हल्ल्यामध्ये या महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या मृतदेहाचे लचके कुत्रे तोडत असल्याचं भयानक दृश्यही काही ग्रामस्थांनी पाहिलं. (Madhya Pradesh Woman Killed By Dogs Locals Saw Strays Eating Body)

रस्त्यानं जाणाऱ्या एका व्यक्तीला हे भयानक दृश्य दिसल्यानंतर त्यानं ग्रामस्थांना याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनाही माहिती दिली गेली. खबर मिळता पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पण महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. याचा रिपोर्ट आल्यानंतर त्यात स्पष्ट झालं की, महिलेच्या शरिरावर कुत्रांनी चावा घेतल्यानं खोलवर जखमा झाल्यानं तिचा मृत्यू झाला. कारण इतर कुठल्याही जखमा तिच्या शरिरावर आढळलेल्या नाहीत. या घटनेचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आल्यानंतर या मृत्यूबाबतचं खरं कारणंही समोर येईल.

दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलं की, मृत्यू पावलेली महिला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शेताकडं कामांसाठी निघून गेली होती. पण त्यावेळी काही भटकी कुत्री तिच्या मार्गातील झाडांभोवती घुटमळत होती. यानंतर काही वेळातच रस्त्यानं जाणाऱ्या एका व्यक्तीनं पाहिलं की, कुत्रे या महिलेच्या शरिराचे लचके तोडत आहेत. त्यानंतर ही घटना समोर आली.