ब्रेक्स इंडियाने केले टीव्हीएस गर्लिंग्जच्या १००व्या ‘Qik’ ब्रेक सेवा केंद्राचे उदघाटन

122
Brakes India inaugurated TVS Girls' 100th 'Qik' brake service center

पुणे : ब्रेक्स इंडिया ह्या ब्रेकिंग क्षेत्रातील आद्य कंपनीने २०१८ मध्ये आपल्या ग्राहकांसाठी  किक ब्रेक सर्व्हिस (क्यूबीएस) पुरवण्याची एक नवीन संकल्पना विकसित केली. ग्राहकांना त्यांच्या वाहनांच्या ब्रेकसंदर्भातील समस्यांबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने त्यांना मोफत ब्रेक निदान सेवा देण्यासाठी मान्यताप्राप्त टायर डीलर्सच्या सहयोगाने क्यूबीएस सुरू करण्यात आले. क्यूबीएसमध्ये प्रशिक्षित तंत्रज्ञ ग्राहकांच्या उपस्थितीत ब्रेकिंगच्या भागांची तपासणी करतात आणि आवश्यकता भासल्यास ब्रेक पॅड्स, ब्रेक डिस्क व ब्रेक लाइन्ड शू व ब्रेक फ्लुइड बदलून देतात.

ब्रेक्स इंडियाने पहिले क्यूबीएस केंद्र चेन्नई येथे सुरु केल्यानंतर,क्यूबीएस केंद्रांचे जाळे ६२ शहरांमध्ये विस्तारण्यात आले आहे.पुण्यात नुकतेच १०० व्या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. नवीन क्यूबीएस केंद्र पुण्यातील लोहगावमधील निंबाळकरनगर भागात डीवाय पाटील युनिव्हर्सिटी मार्गावर सुरू करण्यात आले आहे.

ब्रेक्स इंडियाचे कार्यकारी संचालक बद्री विजयराघवन म्हणाले, “ ब्रेकिंग हा घटक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्यामुळे ब्रेक प्रणालीचे काम व्यवस्थित चालणे अत्यावश्यक आहे. किक ब्रेक सेवा हा ब्रेक्स इंडियाचा, ग्राहकांना ब्रेकचे झटपट निदान करून देणारा व ते बदलून देणारा, अनन्यसाधारण उपक्रम आहे. पुण्यात १००वे क्यूबीएस केंद्र सुरू करणे आमच्यासाठी खरोखरीच अभिमानास्पद बाब आहे.”

Brakes India inaugurated TVS Girls' 100th 'Qik' brake service center

ब्रेक्स इंडियाची क्यूबीएस आज भारतातील १९ शहरांमध्ये असून, उत्तरेकडील राज्यांमध्ये २७, दक्षिणेकडील राज्यांमध्ये ३४, पश्चिमेकडील राज्यांमध्ये ३३ आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये ६ केंद्रे आहेत.