पुणे, ०५ जानेवारी २०२३ : ब्रिटानिया मारी गोल्डच्या माय स्टार्टअप मोहिमेने यशस्वीरित्या तीन सीझन्स राबवले आहेत. या माहिमेच्या माध्यमातून भारतीय गृहिणींना त्यांचा उद्योजकता प्रवास सुरू करण्यासाठी आर्थिक साह्य व कौशल्य विकास सेवा दिल्या जात आहेत. सीझन २ मध्ये एनएसडीसीसोबतच्या सहयोगांतर्गत मोहिमेने १०,००० गृहिणींना मुलभूत संप्रेषण कौशल्ये, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) उपलब्ध करण्याच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता, तसेच सामाजिक व आर्थिक स्वावलंबनासाठी सूक्ष्म उद्योजकता कौशल्ये दिली.
सीझन ३ मध्ये ब्रिटानिया मारी गोल्ड माय स्टार्ट-अप मोहिमेने गृहिणींना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी इंटनेटचा लाभ घेण्यामध्ये मदत करण्याकरिता आपल्या ऑफरिंग्ज वाढवल्या. मॉम्सप्रेसोसह इंडियन होममेकर्स आंत्रेप्रीन्युअरशीप रिपोर्ट २०२१ नुसार स्वत:चा उद्यम स्थापित करण्याची इच्छा असलेल्या ७७ टक्के गृहिणींनी त्यांच्या प्रवासामधील प्रमुख सक्षमकर्ता म्हणून तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले.
सीझन ४ ची खासियत म्हणजे सर्व सहभागींना गुगलचा विमेनविल प्रोग्राम उपलब्ध होईल. हा एक व्यवसाय साक्षरता प्रोग्राम आहे, जो व्यवसायामधील रूची वाढवणे, उद्योगाचे व्यवस्थापन आणि विकासासाठी व्यवसायाचा प्रचार करणे यांसदर्भातील ‘हाऊ टू’ अभ्यासक्रम देतो. शिक्षण प्रवास पूर्ण केलेल्या सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल.
ब्रिटानिया मारी गोल्ड माय स्टार्टअप कॉन्टेस्ट ४.० च्या लॉन्चबाबत बोलताना ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमुख विपणन अधिकारी अमित दोशी म्हणाले, ‘‘ब्रिटानिया मारी गोल्डचा भारतातील गृहिणींशी अनेक दशकांपासून घनिष्ठ संबंध आहे.
मारी गोल्ड माय स्टार्टअप उपक्रमाचे तीन यशस्वी सीझन चालवल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्या बदल्यात महिला इच्छुक महिलांकडून ४ दशलक्ष प्रवेशिका मिळाल्या, ज्यापैकी जवळपास ६० टक्के प्रवेशिका नॉन-मेट्रो प्रदेशांमधून आहेत. या वर्षी, आम्हाला गुगलसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे आणि आम्हाला खात्री आहे की, त्यांचे कौशल्य लक्षावधी महिला उद्योजकांना त्यांच्या उद्योजकीय प्रवासाचे लोकशाहीकरण करण्यास आणि शाश्वत बनवण्यास मदत करतील, तसेच आमच्याकडून सतत मार्गदर्शन व पाठिंबा मिळेल. सहयोगाने आम्ही प्रत्येक महत्त्वाकांक्षी महिला उद्योजकाच्या विकासाचा भाग बनण्याची आशा करतो.’’
ब्रिटानिया सोबतच्या सहयोगाबाबत बोलताना गुगल इंडियाच्या गुगल कस्टमर सोल्यूशन्सच्या संचालक शालिनी पुचालपल्ली म्हणाल्या, ‘‘तंत्रज्ञान व्यवसायाला विकसित होण्यास मदत करू शकते, पण व्यवसायांचे नेतृत्व करण्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये योग्य कौशल्ये असणे गरजेचे आहे. हे विशेषत: बोर्डमधील महिला उद्योजकांच्या बाबतीत प्रकर्षाने दिसून येते, मग लहान व्यवसाय, क्रिएटर्स, विकासक किंवा स्टार्ट-अप्स असो, तसेच आमची उत्पादने व व्यासपीठांच्या माध्यमातून आणि विमेनविल सारख्या कौशल्य उपक्रमांसह त्यांच्या प्रवासामध्ये या समुदायाला पाठिंबा देण्याप्रती आमच्या कटिबद्धतेमधून प्रेरणा असो.
आम्हाला दुसऱ्या सलग यशस्वी सीझनसाठी ब्रिटानियाच्या माय स्टार्टअप कॉन्टेस्टच्या माध्यमातून होमप्रीन्युअर्सच्या या नवीन समुदायाला हा विशेष डिझाइन केलेला अभ्यासक्रम देण्याचा आनंद होत आहे.’’