पुणे, २ फेब्रुवारी २०२३ : बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या हस्ते ‘येस मॉम्स’ चे उद्घाटन. मिलेट-आधारित चिल्ड्रेन्स फूड ब्रॅण्ड स्लर्प फार्मने आज मातांना एकमेकांशी संलग्न होण्यामध्ये, एकमेकींकडून शिकता येण्यामध्ये आणि एकमेकींना पाठिंबा देण्यामध्ये सक्षम करण्यासाठी मातांचा डिजिटल-फर्स्ट समुदाय ‘येस मॉम्स’ लॉन्च केला. मुंबईतील उच्चस्तरीय कार्यक्रमामध्ये माता, बॉलिवुड अभिनेत्री व स्लर्प फार्म गुंतवणूकदार अनुष्का शर्मा यांच्या हस्ते येस मॉम्सचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला देशभरातून १५० हून अधिक माता उपस्थित होत्या.
माता विशेषत: आपल्या मुलांना भरवण्याच्या बाबतीत सतत विचार करत आहेत आणि त्यांना त्याबाबत चिंता भेडसावत आहे. पण या प्रवासाला सुलभ करणारी बाब म्हणजे याच अनुभवांमधून जात असलेल्या इतर मातांकडून संवाद आणि पाठिंबा मिळणे. मातांचा सिस्टरहूड भाव त्यांना प्रबळ पाठिंबा मिळण्याचा सर्वात मोठा आधारंस्तंभ आहे आणि याच माहितीच्या आधारावर येस मॉम्सची मुलभूत तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.
येस मॉम्स मातांसाठी त्यांच्या मुलांच्या तान्ह्या अवस्थेपासून बालपण ते पुढील टप्प्यापर्यंत अन्न व पोषणासंबंधित विषयांबाबत एकमेकींचा शोध घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि एकमेकींशी संलग्न होण्यासाठी सुरक्षित जागेची निर्मिती करेल. ते मातांना मातृत्वाच्या सिस्टरहूड भावाशी कनेक्ट, शेअर व साजरा करण्यामध्ये आणि एकमेकींच्या अनुभवांमधून शिकवण घेण्यामध्ये सक्षम करेल. न्यूट्रिशनिस्ट्स व पेडिएट्रिशियन्सचे पॅनेल मातांना योग्य माहिती मिळण्यास साह्य करेल.
येस मॉम्स समुदायाचा मातांसाठी सक्षमकर्ता बनत त्यांच्या जीवनात आणि पौष्टिक-संपन्न सुपरफूड्सचा वापर करत त्यांच्या मुलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करण्याच्या माध्यमातून त्यांच्या मुलांच्या जीवनात देखील आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा मनसुबा आहे.
येस मॉम्सचे लॉन्च यूएन-नियुक्त इंटरनॅशनल इअर ऑफ मिलेट्सशी देखील सुसंगत आहे. समुदाय मातांना नाचणी, ज्वारी, राजगिरा, बाजरी यांसारख्या सुपरग्रेन्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्यासपीठ प्रदान करेल. संशोधनात असे दिसून आले आहे की बाजरी सारखी न्यूट्रिसेरल्स आरोग्य आणि पोषण सुधारण्यात खूप मदत करतात, विशेषत: जीवनाच्या सुरूवातीच्या टप्प्यामध्ये सेवन केल्यास खूप फायदा होतो. स्लर्प फार्मच्या ब्रॅण्डच्या प्रस्तावाचा मुख्य भाग म्हणजे मुलांच्या आहारामध्ये बाजरीचा समावेश करणे, ज्यामुळे ते आरोग्यदायी व आनंदी भविष्यासाठी सशक्त बनतील.
दीर्घकाळापासून आरोग्यदायी व नैसर्गिक आहाराच्या समर्थक असलेल्या अनुष्का शर्मा यांनी कार्यक्रमामध्ये उपस्थित मातांना आपला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, ‘‘मी आई आहे आणि माझ्या मुलीच्या आहाराची काळजी घेणे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य सहयोगींचे साह्य मिळणे महत्त्वाचे असते हे मला समजले आहे. माझ्या सहयोगी इतर माता आहेत, ज्या याच अनुभवामधून जात आहेत, आपल्या मुलांना आनंदी व आरोग्यदायी ठेवण्यासाठी नवीन मार्ग तयार करण्यासोबत त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘येस मॉम्स’ माझ्यासारख्या मातांना एकमेकींशी संलग्न करण्यामध्ये आणि प्रयत्न केलेल्या व वापरलेल्या क्लुप्त्या शेअर करण्यामध्ये सक्षम करण्यासाठी स्लर्प फार्मचा सर्वोत्तम उपक्रम आहे. तसेच आम्ही मातांना अत्यंत उत्तम धान्य बाजरीच्या फायद्यांबाबत माहिती देऊ. मी स्वत: बाजरी खात मोठी झाली आहे. मला बाजरीमुळे मुलांचे आरोग्य व स्वास्थ्यामध्ये भर होणाऱ्या पौष्टिकतेबाबत माहित आहे. वयाच्या सुरूवातीच्या टप्प्यापासूनच आपल्या आहारामध्ये या धान्याचा समावेश केला तर खूप फायदा होतो. मी येस मॉम्सच्या माध्यमातून भारतभरातील मातांनी या अद्भुत धान्यांबाबत अधिक माहिती करून घेताना पाहण्यास अत्यंत उत्सुक आहे.’’
स्लर्प फार्मची मूळकंपनी व्होलसम फूड्सच्या सह-संस्थापिका शौरवी मलिक व मेघना नारायण म्हणाल्या, ‘‘आम्ही स्वत: आई असल्यामुळे आम्हाला मुलांना योग्य सकस आहार भरवण्याचे आणि आपल्या अनुभवांशी जुळू शकणाऱ्या इतर मातांच्या सुरूवातीच्या आधारस्तंभ असण्याचे महत्त्व माहित आहे, तसेच आम्ही त्यावर अधिक भर देखील देतो. आमचा दृढ विश्वास आहे की, फक्त आईलाच दुसऱ्या आईचा प्रवास समजू शकतो आणि ती त्यामध्ये अधिक मूल्याची भर करू शकते. येस मॉम्ससह आमचा आमच्यासारख्या मातांना एकमेकींकडून शिकण्यासाठी, मदत मिळण्यासाठी आणि एकमेकींना पाठिंबा देण्यासाठी, तसेच मुलांना भरवण्याबाबतच्या समान अनुभवासह एकमेकींशी संलग्न होण्यासाठी व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. मुलांना भरवणे हा आई-मुलाच्या नात्यामधील महत्त्वाचा भाग आहे आणि आपल्या मुलांना योग्य आहार मिळण्याबाबत मातांवर मोठा दबाव असतो. आमची सर्व मुलांचे भविष्य आरोग्यदायी, आनंदी असण्याकरिता वर्तनीय बदल घडवून आणण्याची इच्छा आहे. तसेच आमचा प्रबळ सिस्टरहूडसह मातांना पुन्हा उत्साहित करण्याचा प्रयत्न आहे. येस मॉम्स मातांना शिक्षित करेल, त्यांच्यावरील तणाव कमी करेल, त्यांना सक्षम करेल आणि त्यांचा आहार आनंदी, आरोग्यदायी व स्वादिष्ट असण्यास साह्य करेल.’’