बीपीसीएलने भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘सायलेंट व्हॉइसेस’ हा उपक्रम चालू केला

30
BPCL launched the initiative 'Silent Voices' on the occasion of India's 77th Independence Day

मुंबई, ऑगस्ट १६, २०२३: भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (“BPCL”) ने मिळून ‘सायलेंट व्हॉइसेस’ हा उपक्रम चालू करण्यासाठी युथ४जॉब्स (Youth4Jobs) सोबत हातमिळवणी केली. सर्वसमावेशकता आणि विविधतेला चालना देऊन मुख्य प्रवाहातील कर्मचाऱ्यांमध्ये दिव्यांग तरूणांनादेखील समान संधी उपलब्ध करवून त्यांचे सामाजिक-आर्थिक स्वातंत्र्य जपणे व वाढवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

आशा आणि समृद्धी जागवण्याची स्वप्नदृष्टी घेऊन ‘सायलेंट व्हॉइसेस’चे उद्दिष्ट संपूर्ण देशभरातील ९० बीपीसीएल इंधन केंद्रांवर २५० पेक्षा जास्त तरुण मुकबधिरांना चमकण्याची संधी देणे हे आहे. दिल्ली, मुंबई, नवी मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबाद, गुरुग्राम, नोएडा आणि कोलकाता यांसारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये हे बुद्धिमान तरुण हावभाव आणि सांकेतिक भाषा वापरुन ग्राहकांना उत्तम इंधन अनुभव देत सेवा देतील.

या उपक्रमाचे उद्घाटन मुंबईतील घाटकोपर येथील पोलिस इंधन केंद्रात बीपीसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. जी. कृष्णकुमार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विपणन विभागाचे संचालक श्री. सुखमलकुमार जैन, वित्त विभागाचे संचालक श्री. वेत्सा रामकृष्ण गुप्ता, मानव संसाधन विभागाचे संचालक श्री. राज कुमार दुबे आणि रीफायनरिजचे संचालक श्री. संजय खन्ना, रिटेल विभागाचे कार्यकारी संचालक (I/c) श्री. संतोष कुमार हे मान्यवर उपस्थित होते. याशिवाय बीपीसीएल (BPCL), युथ४जॉब्स (Youth4Jobs) आणि डीलर्सच्या क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व सन्माननीय सदस्यांनी देखील यावेळी हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

प्रत्येक व्यक्तीमधील क्षमता ओळखून, तिचा आदर करून त्यास जतन करणारी कामाची ठिकाणे निर्माण करण्याच्या बीपीसीएलच्या वचनबद्धतेला ‘सायलेंट व्हॉइसेस’ हा उपक्रम अजून जास्त दृढ करतो. वैयक्तिक समस्या असल्या तरीही त्याची पर्वा न करता व्यक्तींमधील पुढे न येऊ शकलेल्या क्षमतांवर बीपीसीएल ठाम विश्वास ठेवते. कामाच्या ठिकाणी सर्वसमावेशकता आणि विविधता आणल्याने तेथे नवीन उत्साह आणि चैतन्य निर्माण होऊन उद्याचे भविष्य अधिक चांगले होईल.

बीपीसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. जी. कृष्णकुमार यांनी त्यांच्या ओघवत्या भाषेत या उपक्रमाचे सार सांगितले. ते म्हणाले,

Bharat petrolium

“बीपीसीएल विविधतेला प्रोत्साहन देऊन सामाजिक-आर्थिक समावेशन आणण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या राष्ट्र उभारणीमधील एक अविभाज्य भाग असलेल्या या कुशल तरुणांचे मूल्य आम्ही जाणतो आणि #‘सायलेंट व्हॉइसेस’ च्या माध्यमातून त्यास कौतुकास्पद प्रोत्साहन देण्याची आशा करतो.”

बीपीसीएलच्या विपणन विभागाचे संचालक श्री. सुखमलकुमार जैन या उपक्रमामागील आपले दृष्टिकोन सांगताना म्हणाले की, “सर्वसमावेशकतेला चालना देत असतानाच हा उपक्रम या तरुणांना निश्चितच ज्या संधींसाठी ते पात्र आहेत अशा संधी उपलब्ध करवून देऊन अनेक पर्याय व शक्यता ही उलगडतो. आपल्या देशातील या चैतन्यशील गटाला सशक्त केल्याने केवळ हा समुदायच नाही तर संपूर्ण राष्ट्रच मजबूत होईल. चला, आपापल्या प्रभावक्षेत्रात या उदात्त कारणासाठी एकत्र येऊ.”

नुकतेच, बीपीसीएल (BPCL) आणि युथ४जॉब्स (Youth4Jobs) यांनी या उपक्रमासाठी सामंजस्य कराराद्वारे त्यांची भागीदारी औपचारिक केली. दिव्यांग तरुणांना सक्षम करण्यासाठी समर्पित असलेली आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणारी एक प्रतिष्ठित संस्था युथ४जॉब्स (Youth4Jobs) ही बीपीसीएलसोबत खऱ्या अर्थाने समानता आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सज्ज आहे.

पूर्वग्रह आणि आपल्या पूर्वीच्या धारणांच्या अडथळ्यांना पार करत ‘सायलेंट व्हॉइसेस’ आता जोमाने गर्जना करत कृती करायला सज्ज झाला असल्याने तरुणांना या अतुलनीय संधी सक्षम बनवतील आणि त्यांना समानता, सशक्तीकरण व सन्मान प्रदान करतील.