बिग बॉस 16 मधील शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी 13’ च्या स्पर्धकांमध्ये दाखल. मनात धडकी भरवणारा थरार बघण्यासाठी सज्ज व्हा, कारण भारताचा लाडका स्टंट-आधारित रियालिटी शो कलर्सचा ‘खतरों के खिलाडी’ आपली 13 वी आवृत्ती घेऊन दणक्यात पुनरागमन करत आहे. यावेळी नवीन थीम आणि नवीन आव्हानांसह हा शो आणखीनच मोठा, जबरदस्त आणि धाडसी असणार आहे.
हा शो त्यातील स्पर्धकांना एका अविस्मरणीय प्रवासाला घेऊन जाईल. खतरनाक साहसांसाठी आपल्या मनाची तयारी करा कारण, विविध क्षेत्रातून आलेले धाडसी स्पर्धक अत्यंत भयानक परिस्थितीचा सामना करताना दिसणार आहेत. स्पर्धकांच्या या यादीत आता शिव ठाकरे दाखल झाला आहे. शिव आता खतरों के खिलाडी 13 मध्ये स्वतःची क्षमता सिद्ध करण्यास आणि आपल्या धैर्याची मोठी कसोटी देण्यास सरसावला आहे. हा अभूतपूर्व रोमांच अनुभवण्यासाठी तुम्ही तयार आहात ना?
बिग बॉस मंडळीतील पुढारी म्हणून ओळखला जाणारा शिव आता खतरों के खिलाडी 13 मध्ये आपली उपस्थिती प्रेक्षकांना ठळकपणे दाखवून देण्यासाठी सज्ज आहे.
तो म्हणतो, “खतरों के खिलाडी मध्ये सहभागी होण्याइतके मोठे साहस दुसरे कोणतेच नाही. हे साहस करताना तुम्ही केवळ आपल्या मनातील भीतीचा सामना करत नाही, तर तुमच्यातील शक्ती आणि दृढ निर्धार जागा करता. या शोमध्ये येणे मला स्वप्नपूर्तीचा आनंद देणारे आहे.
जीवनात मी माझ्या अनेक भीतींवर मात केली आहे. आता या शोच्या माध्यमातून अॅक्शन गुरु रोहित शेट्टीच्या मार्गदर्शनाखाली मोठमोठ्या खतऱ्यांचा सामना करण्याबाबत मी रोमांचित आहे. मला वाटते पुन्हा एकदा माझी इच्छा बाप्पाने पूर्ण केली आहे. जीवनात क्वचितच मिळणारी ही संधी आहे आणि या शोमध्ये माझी मानसिक आणि शारीरिक क्षमता जोखण्यासाठी मी तयार आहे!”
‘खतरों के खिलाडी’ लवकरच येत आहे कलर्सवर