पुणे : आईसक्रीमच्या दुकानांच्या जगातील सर्वात मोठ्या शृंखलांपैकी एक, बास्किन रॉबिन्सची आईसक्रीम्स पुण्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असून त्यांची मागणी सातत्याने वाढत असल्याचे ब्रँडच्या निदर्शनास आले आहे. आपल्या ग्राहकांच्या मागण्या आणि आवडीनिवडी ध्यानात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी बास्किन रॉबिन्सने आपल्या उत्पादनांमध्ये नवीन फॉरमॅट्स आणि स्वादांची भर टाकली आहे. यंदाचा उन्हाळा आपल्या ग्राहकांसाठी सुसह्य व्हावा यासाठी अनेक नवीन उत्पादन विभाग व नवे स्वाद सुरु केल्याची घोषणा या ब्रँडने नुकतीच केली होती.
पुणे शहरभरात अनेक मोक्याच्या ठिकाणी बास्किन रॉबिन्सची २५ पार्लर्स आधीपासून आहेत. उर्वरित महाराष्ट्रात त्यांची अजून १७ पार्लर्स आहेत. पुणे शहर आणि आजूबाजूच्या भागांमध्ये अजून ८ ते १० पार्लर्स सुरु करून जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्या आईसक्रीम्सचा आनंद घेता यावा अशी ब्रँडची योजना आहे. बास्किन रॉबिन्स आपल्या नेटवर्कमध्ये सातत्याने वाढ करत असून, उत्पादने व मार्केटिंग उपक्रमांची विचारपूर्वक निवड करून युवा ग्राहकांमध्ये ब्रँडविषयीची आवड अधिकाधिक वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. सर्व आघाडीच्या सुपरमार्केट शृंखला, मॉडर्न ट्रेड स्टोर्स, जनरल ट्रेड स्टोर्स तसेच हॉटेल, रेस्टोरंट्स, केटरर्स यासारख्या खाद्यसेवा पुरवठादारांमार्फत देखील हा ब्रँड ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो.
पार्लर्सना भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्याच नव्हे तर ऑनलाईन विक्रीमध्ये देखील हा ब्रँड सातत्यपूर्ण वाढ अनुभवत आहे. आताच्या घडीला या ब्रँडची एक तृतीयांश विक्री ऑनलाईन व स्वीगी, झोमॅटो, इंस्टामार्ट, बिग बास्केट, झेप्टो यासारख्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्समार्फत होते.
ग्राहकांच्या आवडीनिवडींबाबत ग्रॅव्हिस फूड्स प्रायव्हेट लिमिटेड – बास्किन रॉबिन्सचे सीईओ श्री. मोहित खत्तर यांनी सांगितले की, “पुण्यामध्ये चॉकलेट बेस्ड फ्लेवर्स सर्वाधिक आवडीचे असून त्यापाठोपाठ फ्रुट बेस्ड फ्लेवर्सना पसंती दिली जाते. संडेज आणि आईस्क्रीम केक्सना देखील सातत्यपूर्ण व वाढती मागणी असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. शहरात युवा ग्राहकांची संख्या जास्त आहे, वेगवेगळी, नवनवीन, सीझनल उत्पादने चाखण्यासाठी ग्राहकवर्ग उत्साही असतो. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात आम्ही सादर केलेल्या नवीन उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.”
यंदाच्या उन्हाळ्यासाठी बास्किन रॉबिन्सने १७ नवीन उत्पादने सादर केली आहेत. यामध्ये कॅरॅमल मिल्क केक, ब्ल्यूबेरी आणि व्हाईट चॉकलेट तसेच फ्रुट निन्जा यांचा समावेश आहे. आईसक्रीम फॉरमॅट्समध्ये आईसक्रीम रॉक्स नवीन आहे, यामध्ये स्वादिष्ट चॉकलेटचा थर असलेली बाईट साईझ आईस्क्रीम्स आहेत, आईस्क्रीम पिझ्झा, आईसक्रीम फ्लोट्स, फ्रुट क्रीम संडे आणि फेरीटेल संडे यांचा देखील त्यामध्ये समावेश आहे.
यंदा बास्किन रॉबिन्स भारतात आपल्या कारकिर्दीची ३० वर्षे पूर्ण करत आहे. देशभरातील २३९ पेक्षा जास्त शहरांमध्ये त्यांची ८५० पेक्षा जास्त स्टोर्स आहेत. नवीन उत्पादने सर्व पार्लर्समध्ये उपलब्ध असणार आहेत. आईसक्रीम रॉक्ससारखी उत्पादने आघाडीच्या रिटेल स्टोर्समध्ये, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर तसेच डिलिव्हरी पार्टनर्समार्फत देखील उपलब्ध आहेत.