बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शनिवारी (ता. १०) १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचा समारोप

83

पुणे, ९ डिसेंबर २०२२ : श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजिलेल्या १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचा समारोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. उद्या शनिवारी (ता. १०) दुपारी १२ वाजता काँग्रेस भवन येथे बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे संयोजक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी कळवली आहे.

मोहन जोशी म्हणाले, “गेली १८ वर्षे श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २ ते ९ डिसेंबर या कालावधीत हा सप्ताह साजरा केला जातो. विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. आरोग्य शिबिरे, शालेय साहित्याचे वाटप, शिष्यवृत्तीचे वाटप, जनजागृतीचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी हा सप्ताह दरवर्षी एका वेगळ्या उंचीवर जात आहे. यंदा सप्ताहाचा समारोप बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होत असून, काँग्रेसभवन येथे ते सर्वाना मार्गदर्शन करतील.”