“बाळकडू” व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन

133
“बाळकडू” व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन

पुणे, प्रतिनिधी – जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त (५ मे) पुण्यामध्ये “बाळकडू” या राजकीय आणि सामाजिक व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सारसबागसमोरील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे या स्पर्धेतील व्यंगचित्रांचे प्रदर्शन दिनांक ५ मे रोजी होणार आहे.

नुकतेच या स्पर्धेच्या पोस्टरचे उद्घाटन युवासेना सचिव मा वरुणजी सरदेसाई यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, युवासेनेचे राजेश पळसकर, अविनाश बलकवडे, सनी गवते, युवराज पारीख, संजय साळवी आणि शिवसैनिकांसह विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत,  व्यंगचित्रकार अमित पापळ यांनी केले आहे.

“बाळकडू” व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन

जास्ती जास्त युवकांपर्यंत ही स्पर्धा नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे वरुण सरदेसाई यांनी यावेळी सांगितले. मराठी मातीतील कुंचल्याचे फटकारे, देशातील राजकिय, सामाजिक घडामोडींवर भाष्य करणारे, निर्भीड व्यंगचित्रकारांचे एक व्यासपीठ उभे करण्याचे आमचे उदिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्पर्धकांनी सहभाग नोंदवण्यासाठी २ मे पर्यंत amit.papal19@gmail.com यावर आपले व्यंगचित्रकार पाठवावे किंवा ९०२८९०२१८० / ९९२२९२७९५९ यावर संपर्क साधावा.