बालशिक्षण मंदिरच्या शताब्दीनिमित्त मनीषा साठे यांचा ‘नृत्यार्पण’ कार्यक्रम

107

पुणे : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भांडारकर रस्त्यावरील बालशिक्षण मंदिर शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेच्या माजी विद्यार्थिनी व प्रसिद्ध कथक नृत्यांगना मनीषा साठे यांच्या नृत्याचा ‘नृत्यार्पण’ हा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. २३ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. 

शाळेच्या विकास कामाकरिता निधी उभारण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम होत असून, देणगी प्रवेशिका बालशिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे उपल्बध आहेत. अधिक माहितीसाठी ०२०-२५६५४९८२ किंवा ७३५००००५७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शाळा समितीच्या अध्यक्षा आनंदी पाटील व मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांनी कळविले आहे.