बापरे! जपानमध्ये ७.५ फूट लांब तलवार सापडली

179

जपानमधील पुरातत्त्व खात्याच्या शात्रज्ञांना नारा येथील एका कबरीमध्ये ७.५ फूट लांबरीची तलवार आढळून आली आहे.

ही तलवार शेकडो वर्षांपूर्वीची असल्याचा अंदाज आहे. १६०० वर्षांपूर्वीच्या दफन भूमीतील कबरीत ही तलवार आणि ढालीच्या आकाराचा एक कांस्य आरसा सुद्धा आहे.

यासाठी नारा येथील दफनभूमीत खोदकाम करण्यात आल्याचे पुरातत्त्व संशोधन केंद्राचे तज्ज्ञ रिकु मुरासे यांनी सांगितले.

ही दफनभूमी चौथ्या शतकातील आहे. सापडलेल्या तलवारीबाबत आणखी संशोधन करण्यात येत आहे.

या भागात हजारो कबरी आहेत. या कबरी ३०० व ७२० इसवीसनमध्ये बांधण्यात आल्या होत्या. नुकत्याच केलेल्या खोदकामात फक्त एक मोठा ताबूत सापडला. त्यात मानवी सांगाडा सापडलेला नाही.