“बादशाह मसाला”  पुन्हा नव्या स्वरुपात घेऊन आला आहे आपली जुनी लोकप्रिय जिंगल ‘स्वाद सुगंध का राजा’ 

75

पुणे : भारतातील  मसाल्यांसाठीचा सर्वात पसंतीचा ब्रॅंण्ड बादशाह मसाला ने  आपली  जुनी आणि सर्वात लोकप्रिय जिंगल ‘स्वाद सुगंध का राजा, बादशाह मसाला’ चे नवीन वर्जन लॉन्च केले आहे. ज्यात त्यांनी  आपल्या जुन्या लोकप्रिय जिंगलला एक नवीन स्परूप दिले असुन एका नवीन जाहिरातीद्वारे आणि कौटुंबिक काहनीच्या माध्यमातुन प्रस्तृत केले आहे. यात त्यांनी दाखवले आहे की कश्याप्रकारे  बादशाह मसाला आपल्या अनोख्या चवीसह विविध कौटुंबिक प्रसंगांना  खास बनवतो.  ही जाहिरात त्याच जुन्या ट्यूनच्या आठवणी  नव्या स्वरूपात परत  घेऊन आली आहे .

गत वर्षी डाबरने हा लेगेसी ब्रँड खरेदी केला असुन बादशाह मसाला  ने आता आपल्या प्रोडक्ट रेंज मध्ये मोठे बदल केले आहेत, आणि विश्वासाची परंपरा आणि आपल्या वचनबद्धत्तेसह अनेक  नवीन मसाले (मसाले आणि स्पाईस मिक्स) आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत.

बादशाह मसाला चे चीफ़ एक्ज़क्टिव ऑफिसर रेहान हसन म्हणाले, “भारतातील मसाले आणि मसाला श्रेणीचा विचार केल्यास बादशाह मसाला हे प्रत्येक घराघरात पोहचलेले एक प्रसिद्ध नाव आहे. ही जिंगल ब्रँडशी अनेक दशकांपासून जोडली गेली आहे. जिंगल चे नवीन वर्जन दाखवते की कश्या प्रकारे या ब्रँडने भारताचा समृद्ध पाककलेचा वारसा जपला आहे, आणि ग्राहकांना दर्जेदार मसाले  उपलब्ध करून दिले आहेत. आम्हाला खात्री आहे की  ही नवीन जिंगल पुन्हा एकदा ग्राहकांसाठी हृदयस्पर्शी बनेल आणि ग्राहकांना  बादशाह मसाल्याच्या अस्सल भारतीय चवची आठवण करून देईल.ही  नवीन जिंगल बादशाह मसालाच्या सर्व जाहिरातींमध्ये ऐकू येईल, जी दूरदर्शन, रेडिओ आणि सोशल मीडियासह सर्व मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जाईल.

हावस वर्ल्डवाइड इंडिया ने हे क्रिएटिव्ह कॅम्पेन  तयार केले आहे. जुन्या जिंगलला सुधारित स्वरुपात आणताना  या एजन्सीने एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

यावेळी बोलताना, हावस वर्ल्डवाईड इंडियाच्या चिफ क्रिएटिव्ह ऑफिसर अनुपमा रामास्वामी म्हणाल्या, “गेल्या ४० वर्षांपासून आमच्या सर्वांच्या हृदयात खास स्थान असलेल्या आयकॉनिक जिंगलचे नवीन वर्जन आमच्या प्रेक्षकांसमोर सादर करताना आम्हाला खरोखरच खूप आनंद होत आहे. आधुनिक कुटुंबाच्या दृष्टिकोनातून, शिक्षणाच्या नव्या युगाबरोबर कुटुंबातील सर्व सदस्यांच्या भूमिकेतही बदल झाला आहे, हे लक्षात घेऊन ही जाहिरात बनवण्यात आली आहे. बादशाह मसालाची ही नवीन जाहिरात आधुनिक आहे यात शंका नाही पण त्याच बरोबर ती ब्रँडच्या गेल्या दशकांच्या जुन्या सुंदरतेला देखील अधोरेखित करते.”

“बादशाह मसाल्यास डाबर फूड पोर्टफोलिओमध्ये  जोडताना आम्हाला खूप आनंद होत आहे. प्रीमियम दर्जाचे मसाले आणि मसाल्यांच्या मिश्रणासह ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे आमचे ध्येय आहे. डाबरने गेल्या वर्षी  हा ब्रँड खरेदी केला असुन, बादशाह मसालाने आता त्यांच्या उत्पादन श्रेणीत सुधारणा केली आहे आणि विश्वासाचे वचन देऊन अनेक नवीन मसाले (मसाले आणि स्पाईस मिक्स) त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत,”  असे रेहान हसन यांनी पुढे सांगितले.

TVC लिंक- https://www.youtube.com/watch?v=Vqr0EJQ170M