मुंबई : भारतातील पहिल्या क्रमांकाचे हायपरलोकल सर्च इंजिन असलेल्या जस्टडायलच्या कन्झ्यूमर इन्साइटनुसार, गेल्या दशकात भारतातील टीअर-II शहरांमध्ये सौन्दर्य आणि निरोगीपणा विषयक सेवांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि या शहरांमधील लोकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हा कल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. स्वतःची काळजी घेण्याच्या महत्त्वाबाबत लोक जास्तीतजास्त जागरूक होत असल्यामुळे आता ते ब्युटी पार्लर, सलोन, स्पा, योग वर्ग, जिम, झुंबा वर्ग, पोषण तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ यांसारख्या सौन्दर्य आणि वैयक्तिक काळजी घेणाऱ्या सेवांकडे वळत आहेत.
- आर्थिक वर्ष २०२३ मध्ये सौन्दर्य आणि वैयक्तिक काळजी श्रेणीने १४%नी वाढ अनुभवली
- टीअर-I शहरांमध्ये बंगळूर, चेन्नई, हैदराबाद आणि पुणे यांनी मागणीचे नेतृत्व केले
जस्टडायल कन्झ्यूमर इन्साइटनुसार, हा कल एर्नाकुलमसारख्या मेट्रो शहर नसलेल्या लहान नगरांमध्ये सुद्धा दिसून येतो. एर्नाकुलममध्ये मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी वार्षिक ४६% वाढ झाली आहे, सूरत मध्ये २९%, पटनामध्ये २७% तर जयपूर मध्ये २६% वाढ दिसून आली. या शहरांमधील वाढती मध्यमवर्गीय लोकसंख्या आणि येथील लोकसंख्येकडे जास्त प्रमाणात असलेले खर्च करण्याजोगे उत्पन्न (कर दिल्यानंतर राहिलेले उत्पन्न-disposable income) हे वैयक्तिक काळजी आणि निरोगीपणावर अतिरिक्त खर्च करण्याच्या प्रवृत्तीला कारणीभूत आहेत. या ट्रेंडचे स्पष्ट प्रतिबिंब कोझिकोड सारख्या शहरांमध्ये देखील दिसून आले. कोझिकोडमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी वार्षिक ५०% वाढ झाली आहे, मेरठ मध्ये ३३%, पलक्कडमध्ये २९%, भुवनेश्वर मध्ये २७% आणि झासी मध्ये २५% वाढ झाली.
यावर भाष्य करताना जस्टडायलचे प्रवक्ते म्हणाले, “भारतातील टिअर II शहरांमध्ये सौन्दर्य आणि निरोगीपणा विषयक मागणीतील वाढ या शहरांमधील लोकांची बदलती जीवनशैली आणि बदलते प्राधान्यक्रम यांचे प्रतिबिंब आहे. येत्या काही वर्षात या उद्योग अशाच वाढीची अपेक्षा करीत असल्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या उद्योजक आणि गुंतवणूकदारांसाठी ही एक महत्वपूर्ण संधी आहे.”
एकूण, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जस्टडायल प्लॅटफॉर्मवर सौन्दर्य आणि वैयक्तिक काळजी श्रेणीच्या शोधांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत (YOY) १४% नी वाढ झाली आहे. मेट्रो शहरांमध्ये बंगळूर सर्वात अग्रस्थानी असून तेथे २२% ची वाढ झाली, त्यानंतर चेन्नई जेथे १९% नी वाढ झाली, नंतर हैदराबाद जेथे १८% वाढ झाली आणि नंतर पुणे जेथे १५% नी वाढ झाली.
या ट्रेंडवर कोविड महामारीचा देखील लक्षणीय परिणाम झाला आहे. दूर अंतरावरून काम करण्याच्या वातावरणाने स्वतःची काळजी आणि सक्रिय जीवन शैलीच्या आवश्यकतेवर आणि महत्त्वावर खूप जास्त भर दिला; ज्यामुळे प्रत्यक्ष आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारांमध्ये सौन्दर्य निरोगीपणा विषयक सेवांची मागणी वाढली.