बडोदा बीएनपी परिबा म्यूचुअल फंडने एनएफओ लॉन्च केला

56

पुणे, ७ डिसेंबर  २०२२: बडोदा बीएनपी परिबा म्यूचुअल  फंडाने ‘बडोदा  बीएनपी परिबा मल्टी अॅसेट फंड’, इक्विटी, डेट आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणारी ओपन-एंडेड योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या निधीचे व्यवस्थापन  श्री. जितेंद्र श्रीराम (२५ वर्षांहून अधिक अनुभव) आणि श्री. विक्रम पमनानी (१२ वर्षांहून अधिक अनुभव) यांच्याद्वारे केले जाईल. हा निधी निफ्टी ५०० टीआरआयच्या ६५ टक्के अधिक निफ्टीचा २० टक्के समावेश असलेला संमिश्र कर्ज निर्देशांक आणि सोन्याच्या भारतीय रुपयाच्या १५ टक्के, अशा सानुकूलित निर्देशांकाविरुद्ध बेंचमार्क केला जाईल. किमान गुंतवणूक रक्कम रुपये ५ हजार आणि त्यानंतर १ रुपयांच्या पटीत करता येईल. हा एनएफओ २८ नोव्हेंबर २०२२ रोजी उघडेल आणि १२ डिसेंबर २०२२ रोजी बंद होईल

आरईआयटी आणि आयएनव्हीआयटीच्या युनिट्समध्ये १० टक्क्यांपर्यंत समभागासाठी ६५ ते ८० टक्के, निश्चित उत्पन्नासाठी आणि सुवर्ण ईटीएफमध्ये प्रत्येकी १० ते २५ टक्के दराने गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवली वाढ मिळवणे, हे या योजनेतील गुंतवणुकीचे उद्दिष्ट आहे. हा फंड, समभाग, निश्चित उत्पन्न आणि सुवर्ण ईटीएफची ताकद एकत्र करण्याचा प्रयत्न करतो, जे भिन्न मालमत्ता वाटप-आधारित खाते धोरण ऑफर करते. याचा उद्देश हा चढ-उताराच्या वेळी वाढ प्रदान करणे आणि बाजारातील घसरणीवेळी संरक्षण प्रदान करणे आहे.

बडोदा बीएनपी परिबा मल्टी अॅसेट फंड गुंतवणूकदारांना अशा ऑफरमध्ये जोखिमीविरुद्ध सुरक्षितता घेण्याची संधी प्रदान करते, जी सर्व मालमत्ता वर्गांमध्ये चांगली वैविध्यपूर्ण आहे. नवोदीत आणि अनुभवी, अशा दोन्ही गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय आहे. कारण हा निधी विविध गुंतवणुकीची सातत्याने माहिती घेत राहण्याच्या व अनेक धोरणांमधील गुंतवणुकीचा त्रास वाचवतो’, असे सुरेश सोनी, सीईओ, बडोदा बीएनपी परिबा म्यूचुअल फंड यांनी सांगत पुढे म्हणाले की, ‘हे सोन्याच्या वाटपासह मालमत्ता वर्गातील विविधता आणि पोर्टफोलिओच्या शोधत असलेल्या अनुभवी गुंतवणूकदारांसाठीदेखील सुयोग्य असे आहे.’

या फंडचे उद्दिष्ट मजबूत संशोधनाद्वारे समर्थित मल्टी कॅप गुंतवणूक पद्धतीचे अनुसरण करणे, विविध क्षेत्रांमध्ये विविध वाटपासह सुमारे ४५-५५ समभाग धारण करणे आहे. जेव्हा निश्चित उत्पन्नाचा विचार केला जातो, तेव्हा हा फंड, तुलनेने कमी पत जोखमींसह उत्पन्न मिळविण्यासाठी कर्ज आणि मार्केट साधनांच्या उच्च-गुणवत्तेच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो. गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीद्वारे हा फंड सोने गुंतवणुकीतील संरक्षण प्रदान करतो.