बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे ‘महाशक्ती’ हा मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सद्वारे समर्थित महिला कर्करोग संरक्षण कार्यक्रम सादर  

पुणे, मार्च २०२४: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने आज महाशक्ती हा मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सद्वारे समर्थित महिला कर्करोग संरक्षण कार्यक्रम सुरू केला. मणिपालसिग्ना फ्लेक्सिकेअर ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत महिलांचा कॅन्सर कव्हरेज प्रोग्राम विशेषत: बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी अत्यंत बारकाईने, काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहेयामध्ये गर्भाशयाचा कर्करोगस्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग यांच्या उपचारांसाठी सर्वसमावेशक विमा संरक्षण देण्यात आले आहे.

भारतामध्ये महिलांच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे. त्यामध्ये स्तनअंडाशय आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा समावेश आहे.  जीवनशैलीतील बदलपर्यावरणीय घटक आणि अनुवांशिक पूर्वस्थिती यासारखे घटक या आजारांच्या वाढत्या प्रसारास कारणीभूत ठरतात. शिवायकर्करोगाच्या उपचारांचा खर्च सतत वाढत आहेत्यामुळे व्यक्ती आणि कुटुंबांवर प्रचंड आर्थिक ताण पडतो. वैद्यकीय खर्चाच्या ओझ्यामुळे बऱ्याचदा विलंब किंवा अपुरा उपचार होतो आणि त्यामुळे कर्करोगाशी लढा देणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे आपल्या ग्राहकांचे आर्थिक ओझे दूर करण्यासाठी आणि अनपेक्षित आजार जडण्याआधी अधिक मनःशांती मिळवण्याकरता बँक ऑफ महाराष्ट्रने महिलांसाठी परवडणारी वाजवी किंमतीतील ‘महाशक्ती’ ही कॅन्सर केअर सुविधा सुरू केली आहे.

महिला-केंद्रित कॅन्सर केअर सुविधा सुरू करण्याप्रसंगी बोलताना बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आशीष पांडे म्हणाले, “ ‘महाशक्ती’ हे केवळ आरोग्य विमा संरक्षणापेक्षा अधिक आहे. वैद्यकीय अनिश्चिततेच्या काळात बँक ऑफ महाराष्ट्रच्या महिला ग्राहकांना सक्षम करण्याचे, स्वस्थ ठेवण्याचे आणि जीवनविषयक सर्व पाठबळ देण्याचे काम करते. मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सच्या भागीदारीत या खास तयार करून घेतलेला महिला कर्करोग कव्हरेज कार्यक्रम सुरू करूनकर्करोगाच्या उपचारांशी संबंधित आर्थिक भार कमी करण्याचेच नव्हे तर आरोग्यविषयक आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी महिलांना सक्षम बनविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक रोहित ऋषी म्हणाले, “आरोग्यसेवा खर्चाचे व्यवस्थापन आणि उपचार पर्यायांमध्ये दिशादर्शन करण्याच्या ताणामुळे महिलांमध्ये अस्वस्थता वाढू शकते. याचा परिणाम त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यावर आणि एकूणच जीवनमानावर होतो. या आव्हानांचा विचार करूनआमच्या बँकेच्या सर्व विद्यमान आणि भावी महिला ग्राहक नाममात्र प्रीमियममध्ये  हे कॅन्सर केअर सोल्यूशन मिळविण्यास पात्र आहेत. महाशक्ती – महिला कर्करोग संरक्षण कार्यक्रमांतर्गतग्राहकाचा ५ लाख ते २० लाख रुपयांदरम्यान विमा काढला जाऊ शकतो आणि या योजनेत एकरकमी पेआउट आणि स्तनाचा कर्करोगगर्भाशयाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाच्या निदानाबाबत आणखी एक वैद्यकीय मत पुरविले जाऊ शकते.”

या सादरीकरणाबाबत भाष्य करताना मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे मुख्य वितरण अधिकारी शशांक चाफेकर म्हणाले, “भारतातील महिलांमधील कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ पाहत असताना विशेष आरोग्य विमा संरक्षणाचे महत्त्व दुर्लक्षिले जाऊ शकत नाही. वैद्यकीय खर्चात वेगाने वाढ होत असताना महाशक्ती या महिला कर्करोग कव्हरेज कार्यक्रमाचा उद्देश आर्थिक अडचणींशिवाय गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध होईल हे सुनिश्चित करणे आहे. मणिपालसिग्ना येथे सानुकूलित उपायांद्वारे ग्राहकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी चांगला वित्तपुरवठा अनुभव देण्याकरता असलेल्या आमच्या बांधिलकीशी सुसंगत धोरण असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रशी सहयोग करताना आम्हाला खूप चांगले वाटत आहे. आमचे कौशल्य आणि  बँकेचे विस्तृत शाखा नेटवर्क यांच्या एकत्रीकरणातून आम्ही साधी आणि परवडणारी कर्करोग आरोग्यसेवा सुविधा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. ही सुविधा महिलांच्या आरोग्यविषयक गरजांना प्राधान्य देते आणि देशभरातील महिलांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा सुलभतेची पुर्नव्याख्या करते.”

आजच्या दिवसात आणि युगात अधिकाधिक चांगले उपचार सुनिश्चित करण्यासाठी आणि हॉस्पिटलायझेशनशी संबंधित आर्थिक भार कमी करण्यासाठी सर्वांगीण वित्तपुरवठा पर्यायांचा शोध घेणे महत्वाचे आहे. सर्वसमावेशक आरोग्यसेवेसाठीच्या आर्थिक उपायांची निवड करून महिला वैद्यकीय खर्चाचा आर्थिक ताण कमी करू शकतात आणि अधिक मनःशांतीसह उपचार, प्रकृतीत सुधारणा या गोष्टी साध्य करू शकतात.

‘महाशक्ती’ महिला कर्करोग कव्हरेज कार्यक्रमाविषयी सविस्तर माहितीसाठीकृपया आपल्या सर्वात जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेला भेट द्या. महिलांशी संबंधित कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी महाशक्ती ही बँक ऑफ महाराष्ट्रने सुरू केलेली विशेष महिला दिन मोहीम आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कडून मणिपालसिग्ना फ्लेक्सिकेअर ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत ही मास्टर पॉलिसी घेतली आहे.