बँक ऑफ इंडियातर्फे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र २०२३ लाँच

61
Bank of India

मुंबई जुलै २०२३ – बँक ऑफ इंडिया या भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकांपैकी एका बँकेने अधिकृतपणे महिला  सन्मान बचत प्रमाणपत्र २०२३ लाँच केले आहे. या समारंभाचे उद्घाटन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केले. यावेळी ईडी श्री. पी. आर. राजगोपाल, श्री. एम कार्तिकेयन, सीजीएम, कॉर्पोरेट ऑफिसचे जीएम आणि नॅशनल बँकिंग समूहाच्या सर्व कार्यालयांचे प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.

  • सर्व शाखांमध्ये ही योजना राबवणारी पहिलीच बँक
  • या योजनेअंतर्गत वार्षिक पातळीवर . टक्के व्याजदरत्रैमासिक चक्रवाढ  

व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक यांनी ही योजना आपल्या शाखांमध्ये कार्यान्वित करणारी पहिलीच बँक असल्याकडे लक्ष वेधले. या सर्व शाखा आता अधिकृतपणे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र २०२३ अंतर्गत खाती सुरू करू शकणार आहेत.

माननीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी आर्थिक वर्ष २०२३- २३ रोजी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात ही प्रमुख योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत मुली किंवा स्त्रियांना तसेच अल्पवयीन मुलींच्या वतीने पालकांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र सुरू करता येईल. यासाठी किमान १००० रुपयांची गुंतवणूक आवश्यक असून त्यानंतर १०० च्या पटीत पैसे जमा करता येईल. त्यासाठीची कमाल मर्यादा २००,००० रुपये आहे. एकापेक्षा जास्त खाती उघडता येणार असून प्रत्येक खात्यामध्ये तीन महिन्यांचे अंतर आवश्यक आहे. त्यासाठीची कमाल मर्यादाही २००,००० रुपये आहे.

या योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेल्या ठेवीवर प्रती वर्ष ७.५ टक्के व्याज दर मिळेल व तो तिमाही पातळीवर चक्रवाढ पद्धतीने खात्यात जमा केला जाईल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्राअंतर्गत मिळालेले सर्व उत्पन्न सध्या लागू असलेल्या प्राप्ती कर तरतुदीनुसार करपात्र असेल. मात्र, या योजनेअंतर्गत टीडीएस लागू केला जाणार नाही.

हे खाते सुरू केल्यानंतरच्या दोन वर्षांत परिपक्व होईल. या योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२५ पर्यंत खाते सुरू करता येणार आहे. या खात्याअंतर्गत नॉमिनेशन सुविधाही देण्यात आली आहे. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खाते मुदतीआधी बंद करता येईल. अनुकंपा तत्वावर उदा. खातेधारकाला गंभीर आजार झाल्यास किंवा पालकांचा मृत्यू झाल्यास खाते सुरू ठेवणे अवघड झाल्यास ते मुदतपूर्व बंद करण्याची सोय आहे.

वर नमूद केलेल्या परिस्थितीनुसार खाते मुदतपूर्व बंद करायचे झाल्यास मूळ रकमेवर व्याजदर योजनेच्या व्याजदरानुसार म्हणजेच ७.५ टक्क्यांनुसार मोजला जाईल. ग्राहकाला संकटकालीन परिस्थितीमध्ये किंवा त्यांच्या परिस्थितीनुसार खाते सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनी २ टक्के दंड भरून बंद करता येईल. अशा परिस्थितीमध्ये व्याजर ५.५ टक्के असेल. खातेधारकांना अंशतः रक्कम काढता येणार आहे. त्यासाठीची मर्यादा पात्र रकमेच्या ४० टक्के असून ही रक्कम खाते सुरू झाल्यानंतर वर्षभराने काढता येईल.

आतापर्यंत केवळ पोस्ट ऑफिसेसना महिला सन्मान बचत प्रमाणपत्राअंतर्गत खाते सुरू करण्याची परवानगी होती, मात्र सरकारने शेड्यूल्ड बँकांनाही २७-६-२०२३ अंतर्गत गॅजेट नोटिफिकेशनद्वारे ही सुविधा उपलब्ध करण्याचा अधिकार दिला आहे. ही सुविधा उपलब्ध करणारी बँक ऑफ इंडिया ही पहिलीच बँक आहे.