फ्लॅशने केली श्री. रजनीश दिवाण यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती

35

पुणे, : पुण्यातील फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स या अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादक कंपनीने श्री. रजनीश दिवाण यांची कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीची घोषणा केली आहे. हा निर्णय कंपनीच्या विकासाच्या मार्गाला गती देण्यासाठीच्या, नाविन्यपूर्णतेला चालना देण्याच्या आणि उद्योगक्षेत्रातील पसंतीचे ऑटोमोटिव्ह घटक उत्पादक म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करण्याच्या कंपनीच्या धोरणाशी सुसंगत आहे.

श्री. दिवाण यांना ३८ वर्षांचा सर्वसमावेशक अनुभव असून व्यवसायात त्यांनी यशाची अनेक शिखरे गाठली आहेत. त्यांच्यामुळे संस्थेला ज्ञानाचा खजिनाच मिळत आहे. रणनीती, व्यवसायाची पुनर्रचना आणि कार्यप्रदर्शनातील परिवर्तन यातील त्याच्या कौशल्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या कंपन्यांचे कामकाज उंचावले आहे. त्यांच्या विलक्षण नेतृत्वगुणांसह त्यांनी सतत कार्यात्मक उत्कृष्टता, ग्राहकांचे समाधान आणि संघटनात्मक विकास यांना चालना देण्यासाठी दृढ बांधिलकी दर्शविली आहे.

नियुक्तीबद्दल भाष्य करताना फ्लॅशचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव वसदेव म्हणाले, “आम्ही श्री. रजनीश दिवाण यांचे टीममध्ये मनापासून स्वागत करतो आणि आम्हाला विश्वास आहे की या क्षेत्रातील त्यांच्या व्यापक कौशल्यातून ते व्यवसायाला अधिक यश मिळवून देतील. ऑटोमोटिव्ह उद्योग एका विशिष्ट टप्प्यात असून उत्पादन आणि प्रक्रिया तंत्रज्ञानामध्ये बदल आवश्यक आहेत. फ्लॅश त्याच्या मार्गक्रमणाच्या एका रोमांचक टप्प्यावर आहे आणि श्री. दिवाण यांच्यासोबत, आम्ही ऑटो घटक उत्पादन उद्योगाच्या भविष्याला आकार देण्यासाठी उत्सुक आहोत.”

सीईओ म्हणून आपल्या नवीन भूमिकेत श्री. रजनीश दिवाण हे नवीन ऑटोमोटिव्ह व्यवसाय ट्रेंडसाठी, म्हणजेच् कनेक्टेड, स्वायत्त, सामायिक आणि इलेक्ट्रिफाईड मोबिलिटी सोल्यूशन्ससाठी भारतातील फ्लॅश कामकाजाची धोरणात्मक दिशा ठरविण्यासाठी जबाबदार असतील. नवीन व्यावसायिक क्षेत्रांमध्ये विस्तार करण्यासाठी ते धोरणात्मक सहयोगाचा विकास करतील आणि राबवतील.

शिवाय, ते कंपनीच्या एकूण कामकाजाचे व्यवस्थापन, नावीन्यपूर्णतेला चालना आणि ग्राहक, पुरवठादार आणि इतर भागधारकांशी महत्त्वाचे संबंध जोपासणार आहेत. ते प्रतिभावान व्यावसायिकांच्या टीमचे नेतृत्व करतील आणि कंपनीचे बाजारपेठेतील स्थान मजबूत करण्यासाठी आणि उत्पादन पोर्टफोलिओ वाढविण्यासाठी सहकार्याने कार्य करतील. तसेच कंपनीच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) आणि शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) याकडेही लक्ष देतील.

आपल्या नियुक्तीबद्दल श्री. रजनीश दिवाण म्हणाले, “मी फ्लॅशची मूलभूत मूल्ये पुढे नेण्यासाठी, नवीन युगातील व्यवसाय विकसित करण्यासाठी, स्पर्धात्मक कार्यक्षमता निर्माण करण्यासाठी आणि व्यवसाय शाश्वततेसह कंपनीच्या विकासात योगदान देण्यासाठी उत्सुक आहे. फ्लॅशमध्ये आम्ही जे काम करतो त्याच्या केंद्रस्थानी ग्राहक, कर्मचारी आणि पुरवठा साखळी भागीदार आहेत. आम्ही आमच्या लोकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी आमचे प्रयत्न उंचावू तसेच समाज आणि आपल्या सभोवतालच्या समुदायांचे आपण जे देणे लागतो त्याची परतफेड करू.”

फ्लॅशच्या आधी ते डेन्सो कॉर्पोरेशन जपानचा अविभाज्य भाग होते. डेन्सोच्या व्यवसायाची भारतात स्थापना आणि विस्तार करणाऱ्या सुरुवातीच्या सदस्यांपैकी ते एक होते. भारतात डेन्सो मधील कार्यकाळात त्यांनी जटिल आणि वैविध्यपूर्ण बोर्डांचे व्यवस्थापन आणि कामकाजाचा समृद्ध अनुभव मिळवला. त्यांच्या ऑटोमोटिव्ह कारकीर्दीत त्यांनी आयशरसारख्या नामांकित ब्रँडसोबतही काम केले आहे.

आयआयएम कोलकाता मधील मेकॅनिकल इंजिनीअर आणि व्यवस्थापन तज्ञ असलेल्या श्री. दिवाण यांनी भारताच्या ऑटोमोटिव्ह उद्योगातील नामांकित ओईएम आणि टियर १ कंपन्यांमध्ये वैविध्यपूर्ण तांत्रिक-व्यावसायिक अनुभव घेतला आहे.