फ्यूचर ऑफ द इंटरनेट इज अपॉन अस’बाबत नमस्ते वेब३ उपक्रमात चर्चा

62
'फ्यूचर ऑफ द इंटरनेट इज अपॉन अस’बाबत नमस्ते वेब३ उपक्रमात चर्चा

पुणे : फ्यूचर ऑफ द इंटरनेट इज अपॉन अस’बाबत नमस्ते वेब३ उपक्रमात चर्चा कॉईनडीसीएक्‍स या भारतातील अग्रगण्‍य क्रिप्‍टो एक्‍स्‍चेंजने पुण्‍यामध्‍ये वेब३ जागरूकता उपक्रम ‘नमस्‍ते वेब३’च्‍या तिसऱ्या चॅप्‍टरचे आयोजन केले. या एडिशनसाठी थीम ‘द फ्यूचर ऑफ द इंटरनेट इज अपॉन अस’ होती. प्रख्‍यात प्रवक्‍त्‍यांनी इंटरनेटचे भविष्‍य, वेब२ च्‍या मर्यादा याबाबत चर्चा केली, तसेच लोकांना वेब३ ची आणि वेब३ मधील विविधतेच्‍या महत्त्‍वाची माहिती दिली.

या सत्रामध्‍ये उद्योगातील प्रमुख व तंज्ञांच सहभाग होता त्यामध्ये  कॉईनडीसीएक्‍स च्‍या डीईएफआयचे एसव्‍हीपी गौरव अरोरा, विप्रो लिमिटेडमधील लॅब४५ येथील ब्‍लॉकचेनचे प्रमुख वरूण दुबे, नीअर फाऊंडेशनचे भारत, आग्‍नेय आशिया व मध्‍य पूर्व येथील व्‍यवस्‍थापकीय संचालक अर्पित शर्मा, ड्राइफचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी फिरदोश शेख, पॉलिगॉनच्‍या विकासाचे संचालक रवीकांत अग्रवाल, कोटो येथील संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी तरूण कटियाल आणि हॅशमेलच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक स्‍वप्निका नाग या वक्त्यांनी वेब३ आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या संभाव्य फायद्यांवर, तसेच लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी त्याच्या अनुप्रयोगांवर एकमताने सहमती दर्शवली.  या सर्वांनी नावीन्यपूर्णतेच्या महत्त्वावर आणि भारत व जगभरात वेब३ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याला चालना देण्यावर भर दिला.

कॉईनडीसीएक्‍सच्‍या डीईएफआयचे एसव्‍हीपी गौरव अरोरा म्‍हणाले, ‘‘फायनान्‍स, गेमिंग, प्रवासामध्‍ये विक्रेंद्रीकरण शाखेचे युज केसेस आणि आपण या क्षेत्राचा अधिकाधिक वापर केला आहे. भारतात या वाढत्‍या इकोसिस्‍टमप्रती योगदान देण्‍यास आवश्‍यक असलेले मनुष्‍यबळ, इंटरनेट उपलब्‍धता व इतर घटक आहेत आणि त्‍यांचा लाभ देखील घेत आहे. या परिवर्तनाच्‍या अग्रस्‍थानी असण्‍याचा आनंद होत आहे. पण टेक इनोव्‍हेशन विकेंद्रीकरण व केंद्रीकरणाचे संयोजन आहे. केंद्रीकरण ओपन एआय किंवा चंद्रावर जाणे यांसारख्‍या प्रकल्‍पांची चांगली कामगिरी करते, तर विकेंद्रीकरण कंपोझिबिलिटी आणि नवीन आर्थिक मॉडेलसाठी चांगले काम करते. विकेंद्रीकरणासह अधिक नवान्‍मेष्‍कारासाठी वाव आहे, ज्‍यामुळे फेलरची शक्‍यता वाढण्‍यासोबत काहीतरी अद्भुत उदयास येण्‍याची शक्‍यता देखील वाढते.’’