फ्युएल (फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्ह्ज) ही प्रख्यात सामाजिक संस्था सुरू करत आहे फ्युएल बिझनेस स्कूल

95
FUEL (Friends Union for Energizing Lives), an eminent social organization, launches FUEL Business School

पुणे, २८ जून २०२३: फ्युएल (फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्ह्ज) ही आघाडीची सामाजिक संस्था गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत आहे. फ्युएलने भारतातील १० लाखांहून अधिक तरुणांपर्यंत दर्जेदार शिक्षण व करिअर विकासाचे उपक्रम यशस्वीरित्या पोहोचवले आहेत. पुण्यात फ्युएल बिझनेस स्कूल सुरू करत असल्याची घोषणा करताना फ्युएलला अत्यंत आनंद होत आहे. या प्रतिष्ठित संस्थेसाठी हा एक नवीन अध्याय आहे. आता फ्युएल व्यवसायविषयक अभ्यासात वारसा निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. फ्युएल बिझनेस स्कूलचे उद्घाटन २४ जून २०२३ रोजी पुणे येथील फॉरेस्ट ट्रेल वसाहतीत झाले. समाजकल्याणासाठी काम करणाऱ्या या संस्थेने या उद्घाटनाच्या माध्यमातून शिक्षणाच्या एका नवीन कक्षेत प्रवेश केला. ‘फ्युचर लीडर्स’चे व्यक्तिमत्व घडविण्याचा या नव्या उपक्रमाचा मानस आहे. प्रशिक्षणार्थींना अत्याधुनिक कौशल्ये व ज्ञानासोबतच सामाजिक संवेदनशीलतेने सुसज्ज करण्याचे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जागतिक उद्योगविश्वात जोमाने वाढण्यासाठी हे आवश्यक आहे.

राजकारण ते उद्योग अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर पाहुणे उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे, एका नवीन युगाच्या बी-स्कूलचे उद्घाटन करणाऱ्या सोहळ्याचे, आकर्षण अधिकच वाढले. या सन्माननीय पाहुण्यांमध्ये कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता खात्यांचे मंत्री माननीय श्री. मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते. त्यांनी फ्युएल बिझनेस स्कूलचे उद्घाटन केले. त्याचप्रमाणे या शैक्षणिक संस्थेला सरकारचे सहाय्य दिले तसेच या उपक्रमाची प्रशंसाही केली. मंत्रीमहोदयांनी सामाजिक भानाचे महत्त्व, संस्कृती व कौशल्य विकासाचे एकात्मिकरण यावर भर दिली. तसेच विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण फेडणे अपेक्षित आहे, असे मतही व्यक्त केले. भविष्यकाळातील महत्त्वाचे टप्पे सर करण्यासाठी सज्ज असलेल्या फ्युएल बिझनेस स्कूलची सुरुवात यामुळे उत्तम झाली.

उद्घाटनाला उपस्थित असलेल्या अन्य विख्यात व्यक्तींमध्ये फ्युएलचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सन्माननीय अशोका फेलो व यूकेतील कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे (जेबीएस) पावटे फेलो केतन देशपांडे; फ्युएलचे प्रमुख मार्गदर्शक (मेंटॉर) तसेच यूकेतील कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील (जेबीएस) पावटे फेलो संतोष हुरळीकोप्पी; फ्युएलचे उपाध्यक्ष- ऑपरेशन्स बाजीप्रभू देशपांडे आणि फ्युएल बिझनेस स्कूलच्या अधिष्ठाता तसेच ईव्यास लर्निंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक व संचालक आणि एससीएमएचआरडीच्या माजी संचालक डॉ. प्रतिमा शेवरे ह्यांचा समावेश होता. फ्युएलच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मयुरी राजेंद्र, सेवा इन्फोटेकचे सीओओ मनोज पोचट, परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेडचे संचालक अमित परांजपे आणि यश परांजपे हेही सोहळ्याला उपस्थित होते.

“फ्युएल बिझनेस स्कूल सुरू करताना आम्ही अत्यंत उत्साहात आहोत,” असे फ्युएलचे संस्थापक व अध्यक्ष केतन देशपांडे उद्घाटन सोहळ्यात म्हणाले. “आजच्या वेगाने बदलणाऱ्या उद्योगविश्वामध्ये, केवळ व्यवसायाचे ज्ञान न देता विद्यार्थ्यांना नवे बदल करण्यास, नवनव्या गोष्टींचा शोध लावण्यास आणि आत्मविश्वासाने नेतृत्व करण्याच्या कौशल्यांनी सुसज्ज करणारी, शिक्षणसंस्था आवश्यक आहे हे आमच्या लक्षात आले. सिद्धांतांवर आधारित ज्ञान व प्रत्यक्ष उपयोग यातील तफावत दूर करण्याचे तसेच उद्योगविश्वातील व समाजातील उद्याचे नेते घडण्याचे उद्दिष्ट आमच्या बिझनेस स्कूलपुढे आहे.”

अध्ययन आणि अध्यापनातला नावीन्यपूर्ण दृष्टिकोन, सामाजिक विकास आणि शाश्वततेवर भर देत आपला वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविण्याचा फ्युएल बिझनेस स्कूलचा निर्धार आहे. प्रत्यक्ष जगातील, व्यावहारिक उपयोगावर आणि उपाययोजनांवर भर देत या बी-स्कूलतर्फे सर्वसमावेशक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येतील. एखाद्या विषयाबद्दल विश्लेषणात्मक विचार करणे, समस्यांचे निराकरण करणे आणि निर्णयक्षमतेला चालना देण्याच्या दृष्टीने हे अभ्यासक्रम विकसित करण्यात आले आहेत. शिवाय, विद्यार्थ्यांना परिपूर्ण व्यावसायिक, उद्योजक आणि आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ अशा वैविध्यपूर्ण अध्यापकांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे. हे सर्व आपापल्या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि अनुभवसंपन्न असल्याने विद्यार्थ्यांच्या या अध्यापकांच्या अनुभवाचाही फायदा होईल.

फ्युएल बिझनेस स्कूल अनेक पदवी अभ्यासक्रम देऊ करणार आहे. यात व्यवसायाच्या विविध शाखांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. शिवाय, काम सुरू केलेल्या व्यावसायिकांसाठी खास तयार करण्यात आलेले एग्झिक्युटिव शिक्षण अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. आपल्या कौशल्यांमध्ये अधिक सुधारणा करू इच्छिणाऱ्या तसेच करिअर आणखी पुढे नेऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतील. विद्यार्थ्यांना सर्वांगीण उद्योगविषयक विचारवंत होण्यास प्रवृत्त करणाऱ्या बिझनेस स्कूलच्या अभ्यासक्रमांमध्ये अनेक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. उद्योजकता, वित्त, मार्केटिंग, स्ट्रॅटजी, नेतृत्व व तंत्रज्ञान आदी विषयांचा समावेश अभ्यासक्रमांमध्ये आहे. अनुभवाधारित अध्ययन संधींच्या माध्यमातून विद्यार्थी प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये, केस स्टडींमध्ये भाग घेऊ शकतील, इंटर्नशिप्स करू शकतील तसेच उद्योगांशी सहयोगाद्वारे त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. यातून एक सर्वांगीण कौशल्यसंच विकसित होईल.

फ्युएल ही संस्था दीर्घकाळापासून समाजकार्य करत असल्यामुळे, बी-स्कूलचा भर सामाजिक विकास, उद्योजकता आणि प्रत्यक्ष जगातील अध्ययनावर आहे. सामाजिक कार्याचा वारसा असल्याने विद्यार्थ्यांसाठी एक ठोस पार्श्वभूमी तयार झाली आहे. जगात परिवर्तन घडवून आणण्यासाठी व मूल्यनिर्मितीसाठी प्रेरणा देणारी ही पार्श्वभूमी आहे. त्याचप्रमाणे संस्था सामाजिक उपक्रमांत सहभागी असल्यामुळे विद्यार्थ्यांना समाजाबद्दलची खरीखुरी धारणा मिळेल. त्यातून त्यांना भारतीय बाजारपेठेचे खरेखुरे चित्र समजून घेण्यातही मदत होईल.

भविष्यकाळासाठी उच्च कौशल्यप्राप्त मनुष्यबळ विकसित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, फ्युएल बिझनेस स्कूलसाठी केलेली जमवाजमव आगामी फ्युएल स्किलटेक अँड आँत्रप्रेन्युरशिप युनिव्हर्सिटीच्या दुसऱ्या टप्प्याच्या स्थापनेसाठीही उपयुक्त आहे. शिवाय, या घटनाक्रमातच, कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता व नवोन्मेष खात्यांचे माननीय मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा ह्यांनी या आगामी संस्थेतच महाराष्ट्र सरकारचे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा मानस व्यक्त केला. यासाठी हेतूपत्र (एलओआय) जारी करण्यात आले आहे. त्यामुले फ्युएल स्किलटेक अँड आँत्रप्रेन्युरशिप युनिव्हर्सिटीसारख्या संस्थांच्या उद्दिष्टांनाही चालना मिळेल. महाराष्ट्रातील कौशल्य विकास परिसंस्थेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे.

फ्युएल बिझनेस स्कूल सुरू होत असताना निवडक गणुवान विद्यार्थ्यांना संपूर्ण शिष्यवृत्ती देऊ करत आहे. उत्कृष्ट शैक्षणिक यश, नेतृत्वाची संभाव्यता व समाजावर सकारात्मक प्रभाव करण्याप्रती बांधिलकी दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचा या शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाईल. भारतातील दुर्लक्षित व वंचित समुदायातील गुणवान विद्यार्थ्यांना यामुळे संधी मिळेल अशी आशा फ्युएलला वाटत आहे.

संभाव्य विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया तसेच शिष्यवृत्तीच्या संधी यासंदर्भातील अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी बी-स्कूलच्या http://fuelbschool.com/ या वेबसाइटला कृपया भेट द्यावी.