फोक्सवॅगन व्हर्च्युसने जीएनसीएपीच्या इतिहासात मिळवला सर्वोत्तम स्कोअर, ५ स्टार सेफ्टी रेटिंग प्राप्त

91
Volkswagen Virtus scores best-ever test result in GNCAP history, awarded 5-star safety rating

मुंबई : फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाने आज अद्ययावत आणि अधिक कडक ग्लोबल एनसीएपी टेस्टिंग प्रोटोकॉल्सअंतर्गत व्हर्च्युअसच्या फाइव्ह स्टार क्रॅश टेस्टचे निकाल जाहीर केले. कारलाइनला प्रौढ तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी रेटिंग देण्यात आले आहे. यामुळे फोक्सवॅगन व्हर्च्युस प्रौढ प्रवासी तसेच लहान मुले अशा दोन्ही विभागांसाठी जीएनसीएपीच्या अद्ययावत क्रॅश टेस्ट प्रोटोकॉलअंतर्गत पूर्ण फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणाऱ्या भारतातील मोजक्या कार्सपैकी एक ठरली आहे.

  • व्हर्च्युअसने सेफ्टी रेटिंगसाठी  मिळवलेला जीएनसीएपीच्या इतिहासातील आजपर्यंतचा सर्वोत्तम स्कोअर ब्रँड फोक्सवॅगनच्या मुख्य तत्वाला मिळालेली पावती आहे.   
  • ब्रँड फोक्सवॅगनला प्रौढ तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या व्यवस्थेबद्दल फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. ग्लोबल एनसीपीएच्या नव्या आणि अधिक कडक क्रॅश टेस्ट प्रोटोकॉल्सअंतर्गत देण्यात आलेल्या या रेटिंगमुळे भारतातील सर्वात सुरक्षित सेदान्सपैकी एक ठरली आहे.
  • सर्वोत्तम जर्मन इंजिनियरिंग, उच्च दर्जा आणि ४० पेक्षा जास्त सक्रिय व अप्रत्यक्ष सुरक्षा वैशिष्ट्ये इत्यादींचा समावेश असलेली फोक्सवॅगन व्हर्च्युस आणि फोक्सवॅगन तैगुनसह देशातील सर्वात सुरक्षित गाड्यांची श्रेणीय तयार करण्यास सज्ज झाली आहे.
  • ब्रँडचे ‘बिग बाय सेफ्टी’ तत्व जागतिक दर्जा आणि फोक्सवॅगनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी करण्यात आलेल्या सुरक्षा तरतुदींचे प्रतीक आहे.

आकर्षक आणि थरारक व्हर्च्युस ही या क्षेत्रातील बहुप्रतीक्षीत सेदान असून वर्ष २०२२- २३ मध्ये तिला भारताच्या वाहन उत्पादन क्षेत्रातील पब्लिकेशन्सद्वारे १२ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे

हे प्रतिष्ठित रेटिंग मिळवणाऱ्या फोक्सवॅगन तैगुन या, ब्रँडच्या पहिल्या भारत २.० प्रकल्पातील कारसह ही कारही उपलब्ध होणार आहे.

दर्जेदार, सुरक्षित आणि चालवण्यास आनंददायी असणाऱ्या कार्स तयार करणे हे ब्रँडचे प्रमुख उद्दिष्ट आहे. फोक्सवॅगन व्हर्च्युसला मिळालेले क्रॅश टेस्ट रिझल्ट्स या तत्वाची पोचपावती देणारे आहे. या निमित्ताने २०२२-२३ मध्ये भारतीय वाहन क्षेत्रातील पब्लिकेशन्सद्वारे १२ पुरस्कार मिळवणाऱ्या या सेदानच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेलेला आहे.

या रेटिंगसह व्हर्च्युस या विभागात नवे मापदंड तयार करण्यासाठी तसेच या क्षेत्रात नवा आदर्श घालून देण्यासाठी सज्ज आहे.

फोक्सवॅगन व्हर्च्युसने नुकत्याच मिळवलेल्या या सन्मानाविषयी फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्ता म्हणाले, ‘सुरक्षितता, दर्जेदार बांधणी आणि कामगिरी हे जागतिक स्तरावरील फोक्सवॅगनची प्रमुख वैशिष्ट्ये आहे. तैगुननंतर आता व्हर्च्युसनेही ग्लोबल एनसीएपीचे फाइव्ह स्टार रेटिंग मिळवल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. हा फोक्सवॅगनसाठी निश्चितपणे मोठा सन्मान असून दर्जा व सुरक्षेच्या मापदंडांचे कसून पालन करण्याच्या ब्रँडच्या बांधिलकीचे निर्देशक आहे. तैगुन तसेच व्हर्च्युसला प्रौढ तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी फाइव्ह स्टार रेटिंग मिळाल्यानंतर आता फोक्सवॅगन भारतात जागतिक पातळीवरील बेस्टसेलर तियागुन व इतर सुरक्षित कार्सची श्रेणी उपलब्ध करून देणार आहे.’

Volkswagen Virtus scores best-ever test result in GNCAP history, awarded 5-star safety rating

टीएसआयची ताकद

आकर्षक, उठावदार आणि जर्मन इंजिनियरिंग असलेल्या फोक्सवॅगन व्हर्च्युसला जागतिक पातळीवर नावाजल्या गेलेल्या टीएसआय (टर्बो स्ट्राटीफाइज इंजेक्शन) इंजिनची ताकद मिळालेली आहे. कारलाइनमध्ये आरामदायीपणा, सोयीस्करपणा, कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला असून त्याशिवाय भरपूर जागा व दर्जेदार ड्रायव्हिंग ही तिची खास वैशिष्ट्ये आहेत.

‘बिग बाय सेफ्टी’

फोक्सवॅगन व्हर्च्युसतर्फे ४० पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये दिली जातात व त्यात सहा एयरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, मल्टी- कोलायजन ब्रेक्स, हिल होल्ड कंट्रोल, रियर व्ह्यू कॅमेरा, रियर फॉग लॅम्प, टायर प्रेशर डिफ्लेशन वॉर्निंग, आयएसओफिक्स चाइल्ड सीट अँकरेज, ब्रेक डिस्क वायपिंग यांचा समावेश आहे. या सुरक्षा वैशिष्ट्यांना MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या दणकट बांधणीची जोड मिळाली आहे. अखेर, सुरक्षा हा प्रत्येक फोक्सवॅगनचा महत्त्वाचा भाग आहे.

जुलै २०२२ मधअये ग्लोबल एनसीएपीने टेस्टिंगचे नवे नियम तयार केले आहेत, जे फ्रंटल ऑफसेट, साइड मोबाइल बॅरीयर आणि पोल साइड इम्पॅक्ट टेस्टसाठी बंधनकारक आहेत. त्याशिवाय कारच्या चाचणी घेतल्या जाणार असलेल्या सर्व व्हेरीएंटमध्ये युएनच्या गरजांप्रमाणे फाइव्ह स्टार रेटिंग मिळवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी) आणि पेडस्ट्रीयन प्रोटेक्शन इक्विपमेंट असणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

कूलिंग उत्पादनांमध्ये सर्वात आघाडीचा ब्रँड व्होल्टासने २०२३ च्या उन्हाळ्यासाठी प्रस्तुत केली इन्व्हर्टर एसीची सर्वात नवी अत्याधुनिक श्रेणी