फोक्सवॅगन इंडियाकडून ६००,००० कार्सच्या निर्यातीचा टप्पा पूर्ण

34

मुंबई / पुणे, ऑगस्ट २०२३: स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल)ने चाकणपुणे येथील उत्पादन सुविधेत उत्पादित केलेल्या ६००,००० गाड्यांच्या निर्यातीचा एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. 

फोक्सवॅगन ग्रुपच्या ब्रँड्सचे भारतातील कार्यान्वयन हाताळणारे ब्रँड्स स्कोडाफोक्सवॅगनऑडीपोर्शे आणि लँम्बोर्गिनी यांनी व्हीडब्ल्यू ग्रुपचे भारतात आघाडीचे युरोपियन कार उत्पादक व्हायचे स्वप्न पूर्ण केले आहे. या निर्यातीच्या कामगिरीमुळे भारतीय प्रदेशाचे स्थान व्हीडब्ल्यू ग्रुपचे एक प्रमुख निर्यात केंद्र म्हणून अधोरेखित केले आहे आणि ते भारतीय बाजारपेठेतही वेगाने आपले स्थान काबीज करत आहेत. 

ग्रुपच्या निर्यातीचा प्रवास २०११ मध्ये फोक्सवॅगन व्हेंटो आणि फोक्सवॅगन पोलोपासून सुरू झाला. 

हाच वारसा पुढे चालवताना ग्रुपच्या फोक्सवॅगन तैगुनफोक्सवॅगन व्हर्चस आणि स्कोडा कुशाक यांना जगभरात व्यापक मान्यता मिळाली आहे. 

जागतिक दर्जाची उत्पादन क्षमता आणि भौगोलिक फायद्यामुळे मेक्सिकोएजीसीसीउत्तर आफ्रिका आणि अतिपूर्व बाजारपेठांमध्ये भारतातून गाड्यांची निर्यात. 

व्हीडब्ल्यू ग्रुपच्या निर्यातीच्या यशाचा प्रवास फोक्सवॅगन पोलो आणि फोक्सवॅगन व्हेंटो मॉडेल्सपासून सुरू झाला. हे दोन्ही मॉडेल्स आपापल्या क्षेत्रात अग्रणी होते. या मॉडेल्सनी भारताचा ग्रुपचे निर्यातीचे प्रमुख केंद्र म्हणून पुढे येण्याचा मार्ग प्रशस्त केला. यावरच विस्तार करत असताना फोक्सवॅगन व्हर्चसफोक्सवॅगन तैगन आणि स्कोडा कुशाक यांनी हाच वेग कायम ठेवला आहे. त्यांनी डावीकडील स्टेअरिंग आणि उजवीकडील स्टेअरिंग या दोन्ही प्रकारांमध्ये आपली नावीन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण वैशिष्टे आणली आहेत. भारतात तयार केलेल्या या मॉडेल्सना मेक्सिकोजीसीसी देशउप सहाराउत्तर आफ्रिका आणि इतर आशियाई बाजारपेठांमध्ये मोठी मागणी निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनी ग्रुपचा जागतिक पाया आणखी मजबूत केला आहे. महत्त्वाचे म्हणजे कुशाक हे भारतातून निर्यात होणारे स्कोडाचे पहिले वाहन देखील आहे. 

या घोषणेबाबत बोलताना स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियूष अरोरा म्हणाले की, “आमच्या जागतिक धोरणाचा भारतातून होणारी निर्यात हा एक अविभाज्य घटक आहे. सहा लाख गाड्यांचा टप्पा पार करणे ही एक खूप मोठी कामगिरी आहे. भारताचे धोरणात्मक भौगोलिक स्थान आणि अभियांत्रिकी क्षमता या आमच्या वाढत्या निर्यातीसाठी महत्त्वाच्या आहेत. भारतात तयार करण्यात आलेल्या व्हीडब्ल्यू पोलो आणि व्हीडब्ल्यू व्हेंटो यांनी निर्यातीचा पाया रचला होता. त्याचा वारसा फोक्सवॅगन तैगनफोक्सवॅगन व्हर्चुस आणि स्कोडा कुशाक या गाड्या पुढे चालवत आहेत आणि त्यांना भारताइतकेच प्रेम व कौतुक जागतिक पातळीवरही मिळत आहे. लवकरच स्कोडा कुशाक आणि स्कोडा स्लाव्हिया या गाड्या त्याचे भाग आणि घटकांच्या माध्यमातून व्हिएतनाममध्येही दाखल होतील. याद्वारे आमच्या देशांतर्गत बाजारपेठ आणि जागतिक बाजारपेठेसाठी “मेक इन इंडिया” या वचनबद्धता दिसून आली आहे आणि आम्ही प्रत्येक उत्पादनाची निर्मिती आंतरराष्ट्रीय दर्जानुसार करण्यावर लक्ष केंद्रित करतो.

इंडिया २.० गाड्यांचे जगभरात खूप चांगले स्वागत झाले आहे. डिझाइनदर्जासुरक्षितता आणि कामगिरी यांचे एक सुंदर मिश्रण या गाड्या देतात. त्यामुळे त्यांचे विविध खंडांमध्ये ग्राहकांकडून चांगले स्वागत झाले आहे. भारतात निर्मिती झालेली स्कोडा कुशाक आणि स्कोडा स्लाव्हिया मॉडेल्स २०२४ पासून भाग आणि घटकांच्या माध्यमातून व्हिएतनामला निर्यात होण्यासाठी सज्ज आहेत. या विस्ताराला सुविधा देण्यासाठी यांच्या उत्पादनासाठी खास चाकणपुणे येथे १६,००० चौ. मीटरचा प्लान्ट सध्या बांधला जात आहे. 

इंडिया २.० ची चारही मॉडेल्स प्रौढ आणि लहान प्रवाशांसाठी जागतिक एनसीएपीकडून पंचतारांकित सुरक्षा रेटिंग प्राप्त आहेत. त्यामुळे त्या भारतात तयार केलेली सर्वांत सुरक्ष‍ित कार्स ठरतात. फोक्सवॅगन तैगन आणि फोक्सवॅगन व्हर्चुस या गाड्या जागतिक बाजारपेठेसाठी येथे तयार करण्यात आल्या आहेत आणि त्यांनाही लॅटिन एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये पंचतारांकित सुरक्षा रेटिंग देण्यात आले आहे.

या गौरवांमुळे स्कोडा ऑटो फोक्सवॅगनच्या संपूर्ण वाहनांच्या श्रेणींमध्ये सर्वाधिक सुरक्षा मानके देण्याची बाब अधोरेखित होते. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाने नावीन्यपूर्णतादर्जा आणि शाश्वतता या बाबींवर लक्ष केंद्रित करून भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात आघाडीची युरोपियन कार उत्पादक म्हणून आपले स्थान प्रस्थापित केले आहे.