पुणे, ८ डिसेंबर २०२२ : जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि जिंकण्याची ही संधी आहे. ऑरा फाइन ज्वेलरी आणि रजनीगंधा पर्ल्स द्वारे सह संचालित मणिपूर टुरिझम द्वारे आयोजित करण्यात आलेल्या व्हीएलसीसी आणि ट्रेंड्स सह-उपस्थित फेमिना मिस इंडिया २०२३ च्या ५९व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आता प्रवेशिका स्वीकारल्या जात आहेत.
सहभागासाठी निवड संरचनेसाठी ऑनलाइन नाव नोंदणी करण्यासाठी डब्लु डब्ल्यु डब्ल्यु डॉट मिस इंडिया डॉट कॉम (www.missindia.com) वर लॉग इन करून आजच अर्ज भरा. मोफत फिटनेस प्रमाणपत्र आणि मोफत सेवांसाठी अर्जदार त्यांच्या जवळच्या व्हीएलसीसी केंद्राला भेट देऊ शकतात.
जानेवारी आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, गुवाहाटी आणि कोलकाता या पाच शहरांमध्ये विभागीय ऑडिशन होतील. ३० राज्य विजेते स्पर्धा बूट शिबिरात सहभागी होतील, ज्यामध्ये कार्यशाळा, फोटो शूट, उप-शीर्षक स्पर्धा, अवॉर्ड नाईट गाला इव्हेंट आणि वैयक्तिक मुलाखती यासह अनेक उपक्रमांचा समावेश असेल,
प्रतिभावान सहभागींच्या स्पर्धात्मक भावनेला चालना देत विविधतेतील सौंदर्य आणि सर्वसमावेशक भारतीय संस्कृती साजरी करणे हा असोसिएशनचा मुख्य हेतू आहे. भारतातील सर्वात विश्वासार्ह स्पर्धा, फेमिना मिस इंडिया आमच्या तरुणींना एक व्यासपीठ देत आहे जे त्यांना सक्षम बनवते आणि त्यांचा आवाज लाखो लोकांपर्यंत पोहोचवते. मणिपूर राज्याचा देखील आपल्या महिलांना विकासात समान भागीदार होण्यासाठी सक्षम करण्यात विश्वास आहे. त्यामुळे ही भागीदारी विचारधारा आणि दूरदृष्टीचा नैसर्गिक कळस आहे.
मिस इंडिया स्पर्धेच्या सर्व इच्छुकांसाठी येथे काही रोमांचक बातम्या आहेत. द ग्रुमिंग स्कूल – द हाऊस ऑफ मिस इंडियाचा एस युवर पेजेंट कोर्स आता सर्व अर्जदारांसाठी त्यांच्या फेमिना मिस इंडिया २०२३ स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रियेचा एक भाग म्हणून आकर्षक किमतीत उपलब्ध आहे. ऑडिशनसाठी तुमची तयारी वाढवा आणि कोर्समध्ये नावनोंदणी करून स्पर्धा जिंकण्याची संधी मिळवा.